MB NEWS-भरदिवसा-भरबाजारातून दहा लाखाचे दागिने केले लंपास ;चोरांचे सोन्यासह स्कुटी घेऊन पलायन

  भरदिवसा-भरबाजारातून दहा लाखाचे दागिने केले लंपास ;चोरांचे सोन्यासह स्कुटी घेऊन पलायन 

 


अंबाजोगाई ,एमबी न्युज वृत्तसेवा.........

       एका सराफा व्यावसायिकांनी स्कुटीच्या डिक्कीत ठेवलेले दहा लाखाचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना भरदिवसा-भरबाजारात घडली आहे. अंबाजोगाई येथील सराफा  व्यापार्याचे डिक्कीत ठेवलेल्या सोन्याच्या बॅगीसह भर चौकातून स्कुटी घेऊन मेवाड हॉटेलच्या पाठीमागच्या बोळीत स्कुटी नेऊन सोडली व डिग्गीतील दहा लाखाची दागिण्याची बॅग लंपास केली. 

        शहरातील गुरूवार पेठ भागामध्ये राठौर ज्वेलर्सचे दुकान मालक राहुल राठौर हे सोमवारी सकाळी दहा वाजता घरातुन येवून आपले दुकानाचे शटरला लावलेले कुलूप उघडू लागले मात्र शटरच्या कुलपा मध्ये कोणीतरी  फेविक्विक व खडे टाकलेचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कुलूप उघण्यासाठी शिवाजी चौकातील कूलपाची चावी  बनवणाऱ्या कारागिराकडे धाव घेतली.आपली प्लेजर स्कुटी एमएच. ४४-एफ-४३१ क्रमांकाच्या डिग्गी मध्ये दोनशे ग्रॅम वजनाचे सोन्याची दागिने त्याची किंमत ९ लाख, ९२ हजार २९३ डिग्गीत ठेवलेले चोरट्यांनी लंपास केले. चौकात वर्दळीच्या ठिकाणी स्कुटी उभी करून चावी कारागिरांना बोलत असतानाच कोणीतरी अज्ञात तरुणाने डुप्लिकेट चावी लावून सोन्याचे दागिने, दुकानातील व्यवहाराच्या डायरीसह गाडी गाडी चोरून धुम ठोकली. एकाबोळीत स्कुटी मिळुन आली मात्र डिक्कीतील बॅग लंपासझाली.  या प्रकरणी शहर पोलिसात सोमवारी रात्री उशिरा राहुल राठौर यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाळ सुर्यवंशी करीत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !