इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-डॉ.दिपांजली देशमुख यांनी केला प्रसूतिपूर्व मानसिक आरोग्य विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण

  डॉ.दिपांजली देशमुख यांनी  केला प्रसूतिपूर्व मानसिक आरोग्य विषयाचा अभ्यासक्रम  पूर्ण 

...........................................

परळी (प्रतिनिधी)- येथील बाबासाहेब देशमुख गुरुजी यांची नात तर विधीतज्ञा जीवनराव देशमुख यांची भाची डॉ . दिपांजली देशमुख यांनी "प्रसूतिपूर्व मानसिक आरोग्य " या विषयाचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केला आहे.सदरील अभ्यासक्रम इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ आणि न्यूरोसायन्सेस संस्थेमार्फत चालवला जातो. एक सर्वसमावेशक अभ्यासक्रम होता ज्यामध्ये प्रसूतिपूर्व काळात आईच्या मानसिक समस्यांचे व्यवस्थापन, विविध हस्तक्षेप, फार्माकोथेरपीचा तर्कशुद्ध वापर, आसक्तीचे महत्त्व, जिव्हाळ्याचा भागीदार , हिंसाचार आणि वडिलांचे मानसिक आरोग्य आणि इतर अनेक विषयांचा समावेश होता. रुग्णांच्या हितासाठी हे ज्ञान वापरण्यास उत्सुक आहे.हा यशस्वी अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी त्यांचे कुटुंबाकडून आणि शिक्षकांकडून अभिनंदन केले जात आहे. तसेच, सर्व अभ्यासक्रम समन्वयक आणि सर्व शिक्षकांचे त्यांनी आभार मानले.सध्या डॉ . दिपांजली देशमुख औरंगाबाद येथील प्रेरणा इस्पितळात कार्यरत आहेत.त्या दर मंगळवारी  विशेष प्रसूतिपूर्व मानसिक आरोग्य तपासणी असते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!