MB NEWS-*यु.पी.च्या रेवडी विक्रेत्यांची गाण्यातून साद.......अशी अभिनव कला की हातोहात होते विक्रमी विक्री !*(आवश्य पहा-वाचा VIDEO -NEWS)

  *यु.पी.च्या रेवडी विक्रेत्यांची गाण्यातून साद.......अशी अभिनव कला की हातोहात होते विक्रमी विक्री !



परळी वैजनाथ,एमबी न्युज वृत्तसेवा......

       एखादा फेरीवाला कितीसं कमावत असणार असा विचार आपण करतो पण आपल्या मेहनतीने व व्यावसायिक अभिनव शैलीचा अंगिकार करुन यश मिळवले जाऊ शकते याचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील रेवडीची  रस्त्यावर फेरी करून विक्री करणाऱ्या दोन युवकांनी दाखवून दिला आहे.विशेष म्हणजे गाण्याच्या काही ओळी एका वेगळ्या लहेजात गात  ते ग्राहकांना आकर्षित करतात.त्यांच्या त्या गुणगुणण्याचे अनेकजण फॅन झाले आहेत.

        उत्तर प्रदेशातील रेवडीची परळीत सध्या मोठी डिमांड आहे. दोन युवक आपल्या रेवडीची विक्री  रस्त्यावर फेरी करून करतात. खांद्यावर दोन डब्यांची कावड,त्यावर दोन ठेल्यात आकर्षक मांडणी केलेली रेवडी ची रास व रस्त्यावर साद घालत ते रेवडीची विक्री करतात.परळीत गेल्या दीड महिन्यांपासून हे विक्रेते रेवडी विक्री करत आहेत. अल्पावधीतच रेवडी ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.रेवडीपेक्षाही गाण्याच्या काही ओळी एका वेगळ्या लहेजात गात  ते ग्राहकांना आकर्षित करतात.त्यांच्या त्या गुणगुणण्याचे अनेकजण फॅन झाले आहेत. ग्राहक मुद्दामहून या गाण्याच्या ओळी म्हणायला लावतात. सध्या हे रेवडी विक्रेते परळीतील नागरीकात लोकप्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

(आवश्य पहा VIDEO NEWS)





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !