MB NEWS-*संत दत्तशरणानंदजी महाराजांचे होणार गौतम खटोड यांच्या निवासस्थानी आगमन* *बीडकरांनी संत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन*

  *संत दत्तशरणानंदजी महाराजांचे होणार गौतम खटोड यांच्या निवासस्थानी आगमन*



*बीडकरांनी संत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन*


बीड (प्रतिनिधी) परम श्रद्धेय गोऋषि स्वामी संत दत्त शरणानंदन्दजी महाराज आज दि. 6 फेब्रुवारी 2022 रोजी औरंगाबादला बीड मार्गे जाणार आहेत. या दौऱ्यात ते दोन तास  बीडकरांसाठी वेळ देणार आहेत.


येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांच्या एमआयडीसीतील आकाशवाणी नजीकच्या निवासस्थानी ते सकाळी 12 ते दुपारी 3 यावेळेत थांबणार  आहेत. बीडकरांनी संत दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांनी केले आहे.


दत्तशरणानंदजी महाराज यांनी गोसेवेच्या माध्यमातून हजारो गायींचे रक्षणासाठी पुढाकार घेतला.राजस्थान पतमेढा येथे 8 ठिकाणी मिळून 1 लाख 20 हजार गोमाता व नंदीचा सांभाळ केला जातो. एकाच ठिकाणी एक सारखे १७ हजारापेक्षा पेक्षा जास्त नंदी या गोशाळेत आहेत. सर्वात मोठे गोरक्षण म्हणून या गोशाळेची गणणा आहे. तेथील गोसेवक श्री स्वामी दत्तशरणानंदजी बीड शहरात येत आहेत. बीडकरांनी संत दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार