MB NEWS- *शाळकरी मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करा* *पंकजाताई मुंडे यांची मागणी*

 *शाळकरी मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल  करा*

*पंकजाताई मुंडे यांची मागणी*


बीड ।दिनांक ०८।

नदीपात्रात अवैधरित्या केलेल्या वाळू उपशामुळे खड्ड्यात पडून गेवराई तालुक्यातील चार शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. या संतापजनक घटनेस जबाबदार असणाऱ्या संबंधित वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करून तातडीने कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. या घटनेस सातत्याने दुर्लक्ष करणारे प्रशासनही तितकेच दोषी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  


  गेल्या कांही महिन्यांपासून  जिल्हयात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. नदीपात्रात अवैधरित्या   खड्डे खोदून वाळूचा सर्रास उपसा चालू आहे.  सत्ताधारी किंवा प्रशासन त्यांचेवर कसलीच कारवाई करत नसल्याने त्यांचे धारिष्टय वाढले आहे. वाळू माफियांनी खोदलेल्या नदीपात्रातील खड्डय़ात पडून गेवराई तालुक्यातील शहाजानपूर येथील चार शाळकरी मुलांचा नुकताच दुर्दैवी मृत्यु झाला, ही घटना अतिशय संतापजनक आहे, प्रशासन आणि वाळू माफिया अजून किती जणांचे बळी घेणार आहे ? असा सवाल करत पंकजाताई मुंडे यांनी प्रशासनाने मुलांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. मृत्यु झालेल्या त्या मुलांच्या कुटुंबियाप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. 

•••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !