इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-जगाला युद्धाची नव्हे, तर बुद्धाची गरज - केशव गायकवाड

  जगाला युद्धाची नव्हे, तर बुद्धाची गरज - केशव गायकवाड

फुले नगर येथील सांची बुद्ध विहारात बुद्धाच्या मूर्तीची स्थापना


परळी (प्रतिनिधी) - जगाला युद्धाची नव्हे, तर बुद्धाच्या शांती मार्गाच्या धम्माची गरज असल्याचे प्रतिपादन नगरसेवक केशव गायकवाड यांनी दि ०७ फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त परळी शहरातील फुले नगर येथील सांची बुद्ध विहारात बुद्धाच्या मूर्तीची स्थापना भन्ते संगमित्र (गौतमबुद्ध विहार परभणी) यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव कांबळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नेते जरिचंद्र मस्के, ज्ञानोबा गायकवाड, महादेव गवारे, भगवान साकसामुद्रे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक ऍड. दिलीप उजगरे यांनी केले. तर सूत्रसंचालन अनंत तूपसामुद्रे यांनी केले. या विहाराचे नूतनीकरण, रंगरंगोटी आदी या भागाचे नगरसेवक केशव गायकवाड यांनी केले तर तथागत भगवान बुद्धाची मूर्ती समाजातील नामांकित व्यक्ती उत्तम कांबळे यांनी दिली. या वेळी भन्ते संगमित्र यांनी त्रिशरण पंचशीलाचे सामूहिक ग्रहण केले. या वेळी मोठ्या संख्येने महिला, युवक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबन धाटे, दीपक शिंदे, किरण वाघमारे, अशोक गवळी, धम्मा शिंदे, सानी देवडे, सचिन गायकवाड, आकाश वाघमारे, राम भोसले, पिऊडू सिरसट, बाळू कांबळे, बबलू दांडे, ओम पैठणे, राहुल पैठणे सह आदींनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!