MB NEWS-*रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलमुळे शालेय जीवनातच पाया पक्का होण्यास मदत होईल- बाजीराव भैय्या धर्माधिकारी* _कोटा (राजस्थान) येथील नामांकित आणि अग्रगण्य रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलचा परळीत शुभारंभ_

  *रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलमुळे शालेय जीवनातच पाया पक्का होण्यास मदत होईल- बाजीराव भैय्या धर्माधिकारी*



_कोटा (राजस्थान) येथील नामांकित आणि अग्रगण्य रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलचा परळीत शुभारंभ_

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

         श्रीहरिकोटा (राजस्थान) येथील देशभरातील नामांकित आणि अग्रगण्य "रेजोनंस करीअर अकॅडमी "यांनी परळी मधील फाऊंडेशन इंग्लिश स्कूल येथे "इंटिग्रेटेड स्कूल" सुरु केले आहे. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना  रेजोनंस इंटिग्रेटेड स्कूलमुळे शालेय जीवनातच पाया पक्का होण्यास मदत होईल असे प्रतिपादन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले.

        फाऊंडेशन इंग्लिश स्कूल येथे झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विजयप्रकाश तोतला, रेजोनंस चे उपाध्यक्ष अजय नागर ,नागेश त्रिपाठी ,अकॅडमीक चीफ झा ,रितू तोतला ,प्रभारी मुख्याध्यावपक गजानन  यांच्यासह गुरुजन,पालक व विद्यार्थी शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले की, सध्याच्या स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये एनटीएस, ओलंपियाड, नीट,जेईई यासह अनेक स्पर्धा परीक्षा बाबत विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच पाया पक्का होणे गरजेचे आहे.मध्य भारत व उत्तर भारतातील पालक आपल्या पाल्यांचा पाया शालेय जीवनातच पक्का करतात. त्यामुळे आयुष्यात कुठलीही स्पर्धा परीक्षा ते विद्यार्थी सहज क्रॅक करु शकतात.अभ्यासक्रम आणि ज्ञान या दोन भिन्न बाबी असून आपला पाल्य केवळ "मार्कवंत" न करता "गुणवंत" कसा होईल यासाठी पालकांनी प्रयत्नशील असेल पाहिजे असे त्यांनी सांगितले.

             गेल्या दहा वर्षात रेजोनंस कोटा या संस्थेतून 18000 विद्यार्थी नीट परीक्षेतून एमबीबीएस साठी निवडल्या गेले.  2.5 लक्ष विद्यार्थी अभियांत्रिकी करीता निवडले गेले आहेत. रेजोनन्स द्वारा अनेक आयआयटीयन्स घडविल्या गेले आहेत व अनेक विद्यार्थी एम्स साठी निवडल्या गेले आहेत.परळी व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना रेजोनंसच्या फाऊंडेशन इंग्लिश स्कूल मधील इंटिग्रेटेड करीअर स्कूलमुळे खूप लाभ होणार असून विविध स्पर्धा परीक्षांचा पाया शालेय जीवनातच पक्का होण्यास मदत होणार आहे. परळी व परिसरातील विद्यार्थी पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार