पोस्ट्स

MB NEWS -परळीत मतदार याद्यांच्या सर्वेक्षणात अनागोंदी; वास्तविक सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे- जुगलकिशोर लोहिया

इमेज
  परळीत मतदार याद्यांच्या सर्वेक्षणात अनागोंदी;  वास्तविक सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे- जुगलकिशोर लोहिया परळी वैजनाथ  (प्रतीनिधी)÷ येथील नगर परिषदेचा अनागोंदी कारभार चव्हाटय़ावर आला असून नगर परिषद च्या होउ घातलेल्या निवडणुकीतील मतदार यादीतही मोठे घोळ घातले असुन अनेकांची नावे गायब झाली आहेत तर अनेकांची नावे दुसऱ्याच प्रभागात गेली आहेत तसेच कुटुंबातील मतदारामधेही फोड करण्यात आली आहे तसेच मतदार यादीतील पाने च गायब झाली आहेत यासंदर्भात मा.जिलहाधिकारी यांनी यासंदर्भात तातडीने लक्ष घालून मतदारांना त्याचाच प्रभागातील मतदार यादी मधे नाव समाविष्ट करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी निवेदनाद्वारे मा.जिल्हाधिकारी ,मा.उपविभागीय अधिकारी ,मा.मुख्याधिकारी यांच्या कडे केली आहे.            अंतिम प्रभाग रचना जाहिर झाल्या नंतर  प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर प्रत्येक प्रभागात जाउन मतदारांचे सर्वेक्षण करणे आवश्यक असताना सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून व त्या प्रभागातील सत्ताधारी कार्यकर्त्याला हाताशी धरून मतदार यादयाचे सर्वेक्षण

MB NEWS-झालं नामांतर :आता संभाजीनगर आणि धाराशिव...ठराव मंजूर

इमेज
  झालं नामांतर :आता संभाजीनगर आणि धाराशिव...ठराव मंजूर  शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय भूकम्प आला.शिंदे आणि शिवसेना यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात गेला.न्यायालयाने 12 जुलै पर्यंत बंडखोर आमदारांना दिलासा दिला.त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांची भेट घेत सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला. रात्री उशिरा राज्यपालांनी ठाकरे सरकारला 30 जून रोजी विशेष अधिवेशनात विश्वास दर्शक ठराव मांडण्याचे आदेश दिले.त्यानंतर या विरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. दरम्यान आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद चे नामकरण संभाजीनगर, उस्मानाबाद चे धाराशिव करण्याचा ठराव मांडला.हे ठराव मंजूर करण्यात आले आहेत. 

MB NEWS -एकनाथ शिंदेंच्या घोषणेनंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांचे मराठीतून आभार

इमेज
  एकनाथ शिंदेंच्या घोषणेनंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांचे मराठीतून आभार  शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकार विरुद्ध बंड केलं आहे.आठवडाभर हे महा सत्तानाट्य चालू आहे. सध्या आसाम राज्यातील गुवाहाटी मध्ये त्यांच्या समर्थनार्थ ४० हुन अधिक आमदार असल्याची माहिती दिली जाते.राज्यात सरकार अस्थिर झाल्याची परिस्थिती उदभवली आहे. आसाम राज्यात सुद्धा महापुरामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत गुवाहाटीतील बंडखोर आमदारांचा हॉटेल मधील खर्च यावर आसाम राज्यातून संताप व्यक्त झाला होता ,या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आसाम मधील पूरग्रस्त बांधवांसाठी मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याचे ट्विट केले होते ."आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय."असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं होत .त्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केलं आहे . मराठी भाषेतून त्यांनी आपल्या ट्विटरवर शिंदेंना धन्यवाद देणार ट्विट केलं आहे . "मा. श्री. शिंदे साहेब व शिव

MB NEWS- परळी शहर पोलिसांनी केला २५ते ३० हजारांचा दंड वसुल

इमेज
 परळी शहर पोलिसांनी केला २५ते ३० हजारांचा दंड वसुल परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       विविध वाहनांवर दंडात्मक कारवाई करत शहर पोलीसांनी एका दिवसात जवळपास २५ते ३० हजारांचा दंड वसुल केला आहे.       वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी घालून दिलेले नियम मोडणाऱ्या वाहन व वाहनधारकांना परळी शहर पोलिसांनी कायदेशीर बडगा उगारला आहे.शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडात्मक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे.काल दि.२८ रोजी सायंकाळी नियमभंग करणार्‍या वाहनांवर कारवाई करत जवळपास २५ते ३० हजारांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

MB NEWS- एकनाथ शिंदे यांना मोठा दावा, `बहुमत चाचणीची चिंता नाही` !

इमेज
  एकनाथ शिंदे यांना मोठा दावा, `बहुमत चाचणीची चिंता नाही` ! बहुमत चाचणीची चिंता नाही, दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार असल्याचा शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे. कामाख्या देवीचे दर्शनानंतर आता सर्व बंडखोर आमदार गोव्याकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर उद्या ते मुंबईत  दोन तृतीयांशहून अधिक आमदार आमच्याकडे आहेत, त्यामुळे आम्हाला बहुमत चाचणीची चिंता नाही, अस एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मुंबईत उद्या दाखल झाल्यावर बंडखोर आमदार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत, बहुमत चाचणी आम्ही सहज विजयी होऊ अशी गर्जना एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  ठाकरे सरकारची उद्या अग्निपरीक्षा आहे. त्याआधी आज बंडखोर आमदारांनी गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. आमदारांनी सकाळी रॅडीसन हॉटेलमधून बाहेर येत बसने कामाख्या देवीचं मंदिर गाठले. कामाख्या देवीकडे राज्यातल्या जनेतच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलंय. दुपारी तीननंतर आमदार गुवाहाटीहून रवाना होणार आहेत. आमदार थेट मुंबईत येतात की गोव्यात दाखल होतात याबाबत उत्सुकता कायम आहे.  

MB NEWS-मुख्यमंत्री ठाकरेंचा राजीनामा ?

इमेज
  मुख्यमंत्री ठाकरेंचा  राजीनामा ? मुंबई- राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती आणि राज्यपाल यांनी 30 जून रोजी विश्वास दर्शक ठरावाचे दिलेले आदेश लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळ बैठकीनंतर राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.औरंगाबाद चे नामकरण संभाजीनगर करण्यावरून ते राजीनामा देतील अशी माहिती आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय भूकम्प आला.शिंदे आणि शिवसेना यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात गेला.न्यायालयाने 12 जुलै पर्यंत बंडखोर आमदारांना दिलासा दिला.त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांची भेट घेत सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला. रात्री उशिरा राज्यपालांनी ठाकरे सरकारला 30 जून रोजी विशेष अधिवेशनात विश्वास दर्शक ठराव मांडण्याचे आदेश दिले.त्यानंतर या विरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. दरम्यान आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद चे नामकरण संभाजीनगर करण्याचा ठराव मांडला जाईल अन त्याला काँग्रेसचा विरोध आहे तो काँग्रेसचे मंत्री प्रकट करतील .या बैठकीत महाविकास आघाडीत मतभेद हो

MB NEWS-Big breaking : आमदारांना घेऊन मी उद्या मुंबईत येतोय! बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची घोषणा

इमेज
  Big breaking : आमदारांना घेऊन मी उद्या मुंबईत येतोय! बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची घोषणा गुवाहाटी  : आम्ही उद्या मुंबईत येणार असल्याची घोषणा बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत केली आहे. गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनानंतर बोलताना शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेसाठी सुख-समृध्दी शांतीसाठी नवस मागितलं. सर्व आमदारांसोबत बहुमतासाठी उद्या मुंबईत पोहोचणार आहे. दरम्यान, बंडखोर आमदार एकनाथ शिंदे हे गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू हॉटेलमधून बाहेर पडले. त्यानंतर ते प्रसिद्ध कामाख्या मंदिराच्या दिशेने रवाना झाले. मंदिरात जाऊन त्यांनी देवीचे दर्शन घेतले. शिंदे यांच्यासोबत काही आमदारदेखील होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाने पाठिंबा काढून घेतल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. याच दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि विधानभवन सचिवालयाला पत्र पाठवले आहे. त्यासाठी उद्या विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहे. उद्या सकाळी ११ ते ५ दरम्यान विशेष अधिवेशन होणार

MB NEWS-मोठी बातमी : ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा! उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे आदेश

इमेज
  मोठी बातमी : ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा! उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे आदेश मुंबई;  एकनाथ शिंदे यांच्या गटाने पाठिंबा काढून घेतल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. याच दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि विधानभवन सचिवालयाला पत्र पाठवले आहे. त्यासाठी उद्या विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहे. उद्या सकाळी ११ ते ५ दरम्यान विशेष अधिवेशन होणार असून यादरम्यान ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, गुवाहाटीत असलेले बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आम्ही उद्याच मुंबईत परतणार असल्याचे जाहीर केले आहे. बहुमत चाचणीसाठी आमदार उद्या मुंबईत येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी आज गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सर्व आमदारांना घेऊन बहुमत चाचणीसाठी जाणार असल्याचे सांगितले. अल्पमतात आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा, अशी मागणी करणारे पत्

MB NEWS-आजचा दिवस महत्वाचा, राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष; शिंदे गट परतणार?

इमेज
  आजचा दिवस महत्वाचा, राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष; शिंदे गट परतणार? एकनाथ शिंदे रेडिसन ब्लू हॉटेलमधून बाहेर पडले एकनाथ शिंदे सकाळी साडेसातच्या सुमारात रेडिसन ब्लू हॉटेलमधून बाहेर पडले असून ते गुवाहाटीमधील कामख्या देवीच्या दर्शनाला जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.           शिंदे गट आज राज्यपालांना पत्र देणार भाजपाकडून काल राज्यपालांकडे बहुमत चाचणी घेण्याची मागणी करण्यात आल्यानंतर आज शिंदे गटाकडूनही राज्यपालांना महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला असल्याचं पत्र पाठवलं जाण्याची शक्यता आहे.  राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात असतानाच पर्यायी सरकार देण्याच्या जोरदार हालचाली विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केल्या. दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याबरोबरच त्यांनी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशीही फोनवर यासंदर्भात चर्चा केली.  २१ जूनपासून सुरू झालेल्या नाट्याची अखेर करण्यासाठी भाजप सरसावला आहे. सेनेच्या बंडखोर गटाने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावल्यानंतर भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत हलला. कोर्टाने बंडखोरांना काहीसा दिलासा दिला असून, येत

MB NEWS-मंत्री छगन भुजबळांना कोरोना

इमेज
  मंत्री छगन भुजबळांना कोरोना  मुबई, 27 जून:   गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राला राजकीय ग्रहण लागल्याचं चित्र दिसून येतंय. नगविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल नऊ मंत्री हे गुवाहाटीला जाऊन बसले आहेत. त्यामुळे राज्यात सत्तासंघर्ष पाहायला मिळतो आहे. त्यात दुष्काळात तेरावा म्हणून कोरोनाही एका एकाचा समाचार घ्यायला विसरत नाहीये. आधी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि आज उपमुख्यमंत्री यांना कोरोनची लागण झाल्याची माहिती समोर येते आहे. त्यात आता मंत्री छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली आहे. "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी बरा होईल. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ टेस्ट करून घ्यावी" असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

MB NEWS-थेरगावचे जवान सूर्यकांत तेलंगे पठाणकोटमध्‍ये शहीद

इमेज
  थेरगावचे जवान सूर्यकांत तेलंगे पठाणकोटमध्‍ये शहीद शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील थेरगाव येथील जवान सूर्यकांत शेषराव तेलंगे (वय ३५ वर्षे) हे पठाणकोट जिल्ह्यातील मिरथल छावणी परिसरात (कैंटोनमेट) आज सोमवारी (दि.२७) रोजी झालेल्या चकमकीत शहीद झाले. त्यांचे पार्थिव उद्या मंगळवारी (दि.२८) त्यांच्या मूळ गावी आणले जाणार असल्याची माहिती त्यांच्या वडिलांनी दिली आहे. सूर्यकांत यांच्या निधनाची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली. गावकऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून सूर्यकांत तेलंगे यांना आदरांजली वाहिली आहे. सूर्यकांत तेलंगे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील श्री. प्रेमनाथ विद्यालयात तर बारावीपर्यंतचे शिक्षण रापका येथील लोकजागृती विद्यालयात झाले होते. सूर्यकांत याच्या वडील दुसऱ्याच्या शेतावर सालगडी म्हणून काम करतात. आई रोजंदारीवर कामाला जातेसर्यकांत यांनी कै. रवींद्र करिअर ॲकडमी पोलादपूर महाड येथे भरती पूर्व प्रशिक्षण घेतले होते. रायगड येथे २००७ मध्ये ते सैन्य दलात भरती झाले होते. २०१४ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई- वडील, दोन भाऊ पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

MB NEWS-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कोरोनाची लागण

इमेज
  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कोरोनाची लागण          राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. आपली प्रकृती चांगली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू असल्याचे अजितदादा यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. क्लिक करा: 🔴   *महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षात आज सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे निर्देश ;११ तारखेला पुढील सुनावणी* अशीआहे अजितदादांची ट्विटरवर पोस्ट....        काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. 🔵  हे देखील वाचा पहा  क्लिक करा: 🔴   🛑 वारीतील वारकर्‍यांना सध्याच्या राजकीय घडामोडींशी ना देणं ना घेणं........! क्लिक करा: 🔴   🥏 *शिवसेनेला आणखी एक धक्का क्लिक करा: 🔴 यापुर्वी आपण संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असे मनमोहक दृश्य पाहिलेच नसेल.......! क्ल

MB NEWS -परळी फोटोग्राफर असोसिएशनचे कार्य महाराष्ट्रातील फोटो ग्राफरसाठी प्रेरणादायी-आनंद वाघ

इमेज
  परळी फोटोग्राफर असोसिएशनचे कार्य महाराष्ट्रातील फोटो ग्राफरसाठी प्रेरणादायी-आनंद वाघ परळी वैजनाथ:- एसएससी एचएससी या बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण होऊन विशेष प्राविण्य मिळवलेल्या सर्व फोटोग्राफर पाल्यांचा त्यांच्या पालकासहित फोटोग्राफर असोसिएशन च्या वतीने नुकताच सत्कार संपन्न झाला.या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार व प्रशिक्षक मॅजिक फोटो व मॅजिक फोटोग्राफी साहित्य प्रायव्हेट लिमीटेड चे संचालक आनंद वाघ यांनी हे कौतुकास्पद बाब आहे.असे बोलताना व्यक्त केले. फोटोग्राफर असोशियन परळी वैजनाथ च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी फोटो ग्राफर असो.चे अध्यक्ष गोविंद विजापूरे ,प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते चंदुलालजी बियाणी, विशेष अतिथी व मार्गदर्शक आनंद वाघ,बिड ,ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे आदी उपस्थित होते. सर्व गुणवंत पाल्यांचा मानाचा फेटा पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला याच वेळी उपस्थित सर्व पालक यांचेही सत्कार करून त्यांचेही असो. च्या वतीने स्वागत करण्यात आले.            क्लिक करा:

MB NEWS -११ तारखेला पुढील सुनावणी

इमेज
  महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षात आज सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे निर्देश ;११ तारखेला पुढील सुनावणी महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षात आज सुप्रीम कोर्टानं महत्वाचे निर्देश दिले आहेत.विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि गटनेते अजय चौधरी, प्रतोद सुनील प्रभू यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस देण्यात आली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे.  क्लिक करा: 🔴   🥏 *शिवसेनेला आणखी एक धक्का* सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील महत्वाचे मुद्दे  1) शिंदे गटाच्या वकिलांना सुप्रीम कोर्टानं विचारलं की, हायकोर्टात न जाता सुप्रीम कोर्टात आला? त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं की,  3 कारणं आहेत  226 चे अस्तित्व कलम 32 ला लागू करण्यासाठी घटनात्मक प्रतिबंध नाही. फ्लोअर टेस्ट, अपात्रता यासारख्या कोणत्याही प्रकरणांबाबत सुप्रीम कोर्टातच येण्याबाबतचे निर्देश . अल्पसंख्याक मंत्रिमंडळ राज्ययंत्रणेला उद्ध्वस्त करत आहेत, आमच्या घरांवर हल्ले करत आहेत, आमचे मृतदेह परत येतील असे सांगत आहेत. मुंबईत आमचे हक्क बजावण्यासाठी वातावरण अनुकूल नाही. 2) कोर्टाला हस्तक्षेप करण्यास फार कमी वाव, कोर्ट अंतरिम आदेश

MB NEWS -शिवसेनेला आणखी एक धक्का

इमेज
🥏 शिवसेनेला आणखी एक धक्का, संजय राऊतांना ईडीचं समन्स, उद्या चौकशीला बोलावलं           ●     *महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षात आज सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे निर्देश ;११ तारखेला पुढील सुनावणी* मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सरकारला हादरे बसत असतानाच आता शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने समन्स धाडल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार संजय राऊत यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्यावर कारवाई होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. मात्र, संजय राऊत यांनी आपल्याला अद्याप ईडीची कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले आहे. तशी नोटीस आली तरी आपण चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ वाढवून मागू, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. क्लिक करा: 🔴   🟥 *पुन्हा ठाकरे -शिंदे एकत्र?* ई़डीने संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स पाठवले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात ईडीने पत्राचाळ प्रकरणातच संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबाग येथील मालमत्ता जप्त केल्या होत्या. यामध्ये संजय र

MB NEWS- मराठा क्रांतीठोक मोर्चाचा शिवसेनेला इशारा

इमेज
 ...तर दांडे हातात घेऊ-आबासाहेब पाटील  मराठा क्रांतीठोक मोर्चाचा शिवसेनेला इशारा मुंबई : राज्यात गेल्या आठवडाभरापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे.एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे.सरकार कधीही कोसळू शकते असे चित्र आहे. यामुळे राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून, राज्यभरात आंदोलन सुरू आहे. जे आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत, त्या आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे. आता या प्रकरणात मराठा क्रांती मोर्चाने देखील उडी घेतली आहे. मराठा नेत्यांना टार्गेट करू नका, त्यांच्या कार्यालयाची तोडफोड कराल तर झेंडे काढून दांडे हातात घेऊ असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे. क्लिक करा: 🔴   🟥 *पुन्हा ठाकरे -शिंदे एकत्र?* काय म्हणाले आबासाहेब पाटील? यावेळी बोलताना मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे की, कोणीही मरा

MB NEWS-पुन्हा ठाकरे -शिंदे एकत्र?

इमेज
  पुन्हा ठाकरे -शिंदे एकत्र?          क्लिक करा: 🔴   🛑 वारीतील वारकर्‍यांना सध्याच्या राजकीय घडामोडींशी ना देणं ना घेणं........! बंडखोर ४० आमदार 'मनसे'सोबत जाणार?; एकनाथ शिंदेंची राज ठाकरेंना दोनवेळा फोनाफोनी मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातून केलेल्‍या बंडखोरीमुळे महाराष्‍ट्रात राजकीय भूकंप आला. यामुळे राज्‍याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राजकीय अस्थिरतेच्या या वातावरणात बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दोनवेळा फोन करून मनसे चर्चा केली. मात्र यामुळे अनेकांच्या मनात संशयाचे ढग दाटून आले. या दोघांमध्ये नेमकी कोणत्‍या विषयावर चर्चा झाली असेल यावरून महाराष्‍ट्रातील प्रत्‍येकाच्या मनात उत्‍सुकता निर्माण झाली नाही तर नवल… क्लिक करा: 🔴 यापुर्वी आपण संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असे मनमोहक दृश्य पाहिलेच नसेल.......! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुडघ्‍यावर शस्‍त्रक्रिया करण्यात आली होती. यामुळे गेल्‍या काही दिवसांपासून ते रूग्‍णालयातच होते. या दरम्‍यान महाराष्‍ट्रात शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडामुळे राजकारण ढवळून निघाले. त्‍यातच उपचारान

MB NEWS-आजचे राशिभविष्य

इमेज
  आजचे राशिभविष्य  मेष- अनावश्यक गोष्टींवर खर्च करू नका. आर्थिक नियोजन आवश्यक आहे. प्रतिक्रिया देताना कोणालाही वाईट वाटणार नाही याची काळजी घ्या. वृषभ- मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्‍वास वाढेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. अलंकार, वस्त्र, मनासारखी खरेदी कराल. मिथुन-नको त्या गोष्टींना अवास्तव महत्त्व देऊ नका. प्रतिक्रिया देताना काळजी घ्या. जामीन राहू नका. आत्मचिंतनाची गरज आहे. कर्क- चिकाटीने व आत्मविश्‍वासाने व्यवसायामध्ये यश मिळेल. लोकांपर्यंत आपले काम पोहोचेल. लाभदायक दिवस. व्यावहारिक चातुर्याने यशस्वी व्हाल. सिंह- प्रयत्नांना यश मिळेल. कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल. कुटुंबीयांसाठी वेळ द्याल. सांस्कृतिक कार्यामधे सहभागी व्हाल. कन्या- आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आळस सोडायला हवा. मनाविरुद्ध घटना घडतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तूळ – मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा. लोक काय म्हणतील, याचा विचार न करता योग्य निर्णय घ्यावा. नको तेच विषय समोर येतील. संयम ठेवणे गरजेचे. वृश्‍चिक-कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. जोडीदाराची साथ लाभेल. आर्

MB NEWS-कै. ल. दे. महिला महाविद्यालयात छ.राजर्षी शाहू महाराज यांची जयंती

इमेज
  बहुजन उद्धारक छ. शाहू महाराज हा मराठी मनासाठी अभिमानाचा विषय संजय देशमुख कै. ल. दे. महिला महाविद्यालयात छ.राजर्षी शाहू महाराज यांची जयंती संपन्न  परळी वैजनाथ दि.२६ (प्रतिनिधी)      येथील कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ' राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांची जयंती 'मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष  संजय देशमुख यांनी “सर्वसामान्य उपेक्षित, दलित , वंचित, बहुजन यांचे उद्धारक म्हणून सर्वपरिचित असलेले छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने बहुजनांचे भाग्यविधाते होते. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातही लोकशाहीची मूल्ये रुजविण्याचे काम त्यांनी केले. पुरोगामी महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्यामध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे; नव्हे तर हा महाराष्ट्र फुले -शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील सामाजिक उत्थापनात छ. शाहू महाराजांचे कार्य अतुलनीय अशा स्वरूपाचे आहे. म्हणून बहुजन उद्धारक छ. शाहू महाराज हा मराठी मनासाठी अभिमानाचा विषय आहेत. " असे मनोगत व्यक्त करताना आपले विचार मांडले. याप्रसंग

MB NEWS--श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालय राजश्री शाहू महाराज जयंती साजरी

इमेज
  श्री पंडितगुरु पार्डीकर महाविद्यालय राजश्री शाहू महाराज जयंती साजरी सिरसाळा (प्रतिनिधी) श्री पंडितगुरु पार्डीकर  महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लोकराजा छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली .याप्रसंगी प्रा. मोरे सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.  Video news: ● परळीत उत्साहपूर्ण व्यसनमुक्ती मॅरेथॉन;युवक युवतींचा मोठा सहभाग. याप्रसंगी बोलताना प्रा. डी.व्ही. झिंजुर्डे यांनी उपस्थितांना राजश्री शाहू महाराजांची जीवन व कार्य याविषयी माहिती दिली. राजश्री शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक होते. अस्पृश्यता निर्मूलनाचे मोठे काम त्यांनी केले .प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं देण्याचा कायदा त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी केला .अशा पद्धतीने शाहू महाराजांची कार्य व विचार हे प्रेरणादायी आहेत, राजश्री शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करावी अशा हा मोलाचा संदेश त्यांनी दिला.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कार्यक्रमाधिकारी डॉ. जयदीप सोळंके यांनी मांनले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी वशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MB NEWS -राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे व आरक्षणाचे पुरस्कर्ते - प्रा. एम .एल .देशमुख

इमेज
  राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे व आरक्षणाचे पुरस्कर्ते - प्रा. एम .एल .देशमुख                        परळी, प्रतिनिधी.. जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे आरक्षणाचे पुरस्कर्ते होते असे गौरवोद्गार प्रा. एम एल देशमुख यांनी काढले.  Video news: ● परळीत उत्साहपूर्ण व्यसनमुक्ती मॅरेथॉन;युवक युवतींचा मोठा सहभाग.    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी व्हि.मेश्राम हे उपस्थित होते. त्याच बरोबीने डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ विद्या परिषदेचे सदस्य ,डॉ पी एल कराड,प्रमुख पाहुणे व व्याख्याते प्रा.एम एल देशमुख व   उपप्राचार्य प्रा.हरीश मुंडे , डॉ अर्चना चव्हाण, डॉ एम जी लांडगे,इतिहास विभाग प्रमुख डॉ. बी के शेप, प्रयवेशक प्रा. मंगला पेकमवार , प्रा अरुण ढाकणे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. बी के शेप यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्य आणि कर्तृत्वावर थोडक्यात प्रकाश टाकला. तर  व्याख्याते प्रा.देशमुख यांनीबहुजन समाज शिकून शहा

MB NEWS-लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या विचारात सामाजिक न्याय व समतेचे मूळ - धनंजय मुंडे

इमेज
  सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यभरातील सामाजिक न्याय भवन येथे विविध कार्यक्रम; ठिकठिकाणी होणार समता रॅलीचे आयोजन लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या विचारात सामाजिक न्याय व समतेचे मूळ - धनंजय मुंडे *राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त धनंजय मुंडे यांनी अभिवादन करत, सामाजिक न्याय दिनाच्या दिल्या शुभेच्छा* *राज्य सामाजिक न्याय विभागाची प्रतिष्ठा वाढवणे हे आमचे कर्तव्य - धनंजय मुंडे* मुंबई (दि. 25) - रविवार दि. 26 जून रोजी राज्यभरात लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व त्यानिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येत असून, प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून यानिमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रम, अभिवादन सभा तसेच समता रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.  क्लिक करा: 🔴 यापुर्वी आपण संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असे मनमोहक दृश्य पाहिलेच नसेल.......! "राजर्षी शाहू महाराजांनी आधुनिक समाजात समता व सामाजिक न्यायाचे मूळ रुजवले, त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतूनच राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक व आर्थिक दुर्

MB NEWS-सूर्यकांतराव कुलकर्णी यांचे निधन

इमेज
  सूर्यकांतराव कुलकर्णी यांचे निधन परळी/प्रतिनिधी सेवानिवृत्त मंडळाधिकारी (सोनपेठ मंडळ) सूर्यकांतराव नागोराव कुलकर्णी-आवलगावकर (वय ८९, रा आवलगाव ता. सोनपेठ) यांचे २३ जून, गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास परळीत अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर परळीतील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. महावितरणमधील निवृत्त अधिकारी डी. एस. कुलकर्णी, महानिर्मितीतील अधिकारी माणिक कुलकर्णी व नांदूरवेस भागातील केशव कुलकर्णी यांचे ते वडील. तर जेजुरीतील महापारेषणमधील अधिकारी आनंद कुलकर्णी यांचे ते आजोबा होत.

MB NEWS-रामराव त्रिंबकराव कुलकर्णी यांचे निधन

इमेज
  रामराव त्रिंबकराव कुलकर्णी यांचे निधन परळी वैजनाथ दि.२५ (प्रतिनिधी)            येथील पद्मावती गल्लीतील रहिवासी रामराव त्रिंबकराव कुलकर्णी (वय ) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी (ता.२४) सकाळी राहत्या घरी निधन झाले.              रामराव कुलकर्णी यांच्यावर येथील सार्वजनिक स्मशानभूमीत दुपारी १ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. रामराव कुलकर्णी यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्विय सहाय्य अंकित कुलकर्णी यांचे ते वडील होत.

MB NEWS-स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा,उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

इमेज
  स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा,उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला.           बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. माझ्यावर शिवसैनिकांचे जास्त प्रेम असल्याचे ठाकरे म्हणाले. शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक शिवसेना भवन याठिकाणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गटावर जोरदार निशाणा साधला.          क्लिक करा: 🔴 यापुर्वी आपण संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असे मनमोहक दृश्य पाहिलेच नसेल.......!        दरम्यान, शिवसैनिकांना सेना भवनावर जमण्याचे आदेश देण्यात आलं आहेत. मोठं शक्तिप्रदर्शन करम्याच्या तयारीत शिवसेना असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज शिवसेना भवन याठिकाणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. शिवसेना कार्यकारिणीत उपस्थितांनी गद्दारांना परत घेऊ नका, अशी मागणी उद्धव ठाकरेंना केली. यावर उत्तर देताना उद्