इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-Big breaking : आमदारांना घेऊन मी उद्या मुंबईत येतोय! बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची घोषणा

 Big breaking : आमदारांना घेऊन मी उद्या मुंबईत येतोय! बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची घोषणा



गुवाहाटी  : आम्ही उद्या मुंबईत येणार असल्याची घोषणा बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत केली आहे. गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनानंतर बोलताना शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेसाठी सुख-समृध्दी शांतीसाठी नवस मागितलं. सर्व आमदारांसोबत बहुमतासाठी उद्या मुंबईत पोहोचणार आहे. दरम्यान, बंडखोर आमदार एकनाथ शिंदे हे गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू हॉटेलमधून बाहेर पडले. त्यानंतर ते प्रसिद्ध कामाख्या मंदिराच्या दिशेने रवाना झाले. मंदिरात जाऊन त्यांनी देवीचे दर्शन घेतले. शिंदे यांच्यासोबत काही आमदारदेखील होते.



दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाने पाठिंबा काढून घेतल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. याच दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि विधानभवन सचिवालयाला पत्र पाठवले आहे. त्यासाठी उद्या विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहे. उद्या सकाळी ११ ते ५ दरम्यान विशेष अधिवेशन होणार असून यादरम्यान ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘तुम्ही परत या, माझ्यासमोर बसा, यातून निश्‍चित मार्ग निघेल’, अशा शब्दांत बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा हाक दिली. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला. आपण मार्ग काढू, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी घातली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या