इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS-मुख्यमंत्री ठाकरेंचा राजीनामा ?

 मुख्यमंत्री ठाकरेंचा  राजीनामा ?








मुंबई- राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती आणि राज्यपाल यांनी 30 जून रोजी विश्वास दर्शक ठरावाचे दिलेले आदेश लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रिमंडळ बैठकीनंतर राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.औरंगाबाद चे नामकरण संभाजीनगर करण्यावरून ते राजीनामा देतील अशी माहिती आहे.

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय भूकम्प आला.शिंदे आणि शिवसेना यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात गेला.न्यायालयाने 12 जुलै पर्यंत बंडखोर आमदारांना दिलासा दिला.त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांची भेट घेत सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला.

रात्री उशिरा राज्यपालांनी ठाकरे सरकारला 30 जून रोजी विशेष अधिवेशनात विश्वास दर्शक ठराव मांडण्याचे आदेश दिले.त्यानंतर या विरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे.

दरम्यान आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद चे नामकरण संभाजीनगर करण्याचा ठराव मांडला जाईल अन त्याला काँग्रेसचा विरोध आहे तो काँग्रेसचे मंत्री प्रकट करतील .या बैठकीत महाविकास आघाडीत मतभेद होऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या