MB NEWS- एकनाथ शिंदे यांना मोठा दावा, `बहुमत चाचणीची चिंता नाही` !
एकनाथ शिंदे यांना मोठा दावा, `बहुमत चाचणीची चिंता नाही` !
बहुमत चाचणीची चिंता नाही, दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार असल्याचा शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे. कामाख्या देवीचे दर्शनानंतर आता सर्व बंडखोर आमदार गोव्याकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर उद्या ते मुंबईत
दोन तृतीयांशहून अधिक आमदार आमच्याकडे आहेत, त्यामुळे आम्हाला बहुमत चाचणीची चिंता नाही, अस एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मुंबईत उद्या दाखल झाल्यावर बंडखोर आमदार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत, बहुमत चाचणी आम्ही सहज विजयी होऊ अशी गर्जना एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
ठाकरे सरकारची उद्या अग्निपरीक्षा आहे. त्याआधी आज बंडखोर आमदारांनी गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. आमदारांनी सकाळी रॅडीसन हॉटेलमधून बाहेर येत बसने कामाख्या देवीचं मंदिर गाठले. कामाख्या देवीकडे राज्यातल्या जनेतच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलंय. दुपारी तीननंतर आमदार गुवाहाटीहून रवाना होणार आहेत. आमदार थेट मुंबईत येतात की गोव्यात दाखल होतात याबाबत उत्सुकता कायम आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा