MB NEWS-लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या विचारात सामाजिक न्याय व समतेचे मूळ - धनंजय मुंडे

 सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यभरातील सामाजिक न्याय भवन येथे विविध कार्यक्रम; ठिकठिकाणी होणार समता रॅलीचे आयोजन



लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या विचारात सामाजिक न्याय व समतेचे मूळ - धनंजय मुंडे


*राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त धनंजय मुंडे यांनी अभिवादन करत, सामाजिक न्याय दिनाच्या दिल्या शुभेच्छा*


*राज्य सामाजिक न्याय विभागाची प्रतिष्ठा वाढवणे हे आमचे कर्तव्य - धनंजय मुंडे*


मुंबई (दि. 25) - रविवार दि. 26 जून रोजी राज्यभरात लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व त्यानिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येत असून, प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून यानिमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रम, अभिवादन सभा तसेच समता रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. 

क्लिक करा:🔴 यापुर्वी आपण संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे असे मनमोहक दृश्य पाहिलेच नसेल.......!

"राजर्षी शाहू महाराजांनी आधुनिक समाजात समता व सामाजिक न्यायाचे मूळ रुजवले, त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतूनच राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवून आर्थिक व सामाजिक उन्नतीचे कार्य केले जाते. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करून सर्व जनतेस सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा देतो;" असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. 

क्लिक करा:बंडखोर गटाचं नाव ठरलं: 'शिवसेना बी' - शिवसेना बाळासाहेब

राजर्षी शाहू महाराजांची जयंती व सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून राज्यातील विविध जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन येथे समता रॅली, विविध विषयांवरील व्याख्याने, अभिवादन कार्यक्रम आदी उपक्रम स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आयोजित केले जाणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे. 

क्लिक करा:🔴विठ्ठलभक्तीने दुमदुमला बालाघाट। जाहली सोपी वाट । पंढरीची ।।

मागील अडीच वर्षांच्या काळात सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील वंचित-उपेक्षित घटकांपर्यंत विभागाच्या योजनांचा लाभ पोचवता यावा, यादृष्टीने अनेक सकारात्मक निर्णय घेतले. वाड्या-वस्त्यांची जातीवाचक नावे हद्दपार करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन, राज्य सरकार हे शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक आहे, हेही राज्यातील सर्व जनतेने पाहिले. विभागाची प्रत्येक योजना ही संबंधित विषयातील खऱ्या गरजू पर्यंत पोचावी अशा दृष्टीने अनेक सकारात्मक बदल केले व त्याचे परिणाम निश्चितच लाभार्थी घटकांमधून दिसून येत असून, पर्यायाने नेहमी दुय्यम समजल्या जाणाऱ्या सामाजिक न्याय विभागाची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम आम्ही प्रामाणिक भावनेतून केले व असे करणे आमचे कर्तव्यच असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

क्लिक करा:💢 स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा,उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !