इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

MB NEWS -एकनाथ शिंदेंच्या घोषणेनंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांचे मराठीतून आभार

 एकनाथ शिंदेंच्या घोषणेनंतर आसामच्या मुख्यमंत्र्यांचे मराठीतून आभार 







शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकार विरुद्ध बंड केलं आहे.आठवडाभर हे महा सत्तानाट्य चालू आहे. सध्या आसाम राज्यातील गुवाहाटी मध्ये त्यांच्या समर्थनार्थ ४० हुन अधिक आमदार असल्याची माहिती दिली जाते.राज्यात सरकार अस्थिर झाल्याची परिस्थिती उदभवली आहे. आसाम राज्यात सुद्धा महापुरामुळे नागरिक त्रस्त आहेत.


अशा परिस्थितीत गुवाहाटीतील बंडखोर आमदारांचा हॉटेल मधील खर्च यावर आसाम राज्यातून संताप व्यक्त झाला होता ,या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आसाम मधील पूरग्रस्त बांधवांसाठी मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याचे ट्विट केले होते ."आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय."असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं होत .त्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केलं आहे . मराठी भाषेतून त्यांनी आपल्या ट्विटरवर शिंदेंना धन्यवाद देणार ट्विट केलं आहे .








"मा. श्री. शिंदे साहेब व शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांचे धन्यवाद आपण आसामच्या महापुरा साठी ५१ लाखाची मुख्यमंत्री मदत निधी केली आपले खुप आभारी आहोत."असं ट्विट करून मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत .



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या