MB NEWS -परळीत मतदार याद्यांच्या सर्वेक्षणात अनागोंदी; वास्तविक सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे- जुगलकिशोर लोहिया

 परळीत मतदार याद्यांच्या सर्वेक्षणात अनागोंदी;  वास्तविक सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे- जुगलकिशोर लोहिया

परळी वैजनाथ  (प्रतीनिधी)÷ येथील नगर परिषदेचा अनागोंदी कारभार चव्हाटय़ावर आला असून नगर परिषद च्या होउ घातलेल्या निवडणुकीतील मतदार यादीतही मोठे घोळ घातले असुन अनेकांची नावे गायब झाली आहेत तर अनेकांची नावे दुसऱ्याच प्रभागात गेली आहेत तसेच कुटुंबातील मतदारामधेही फोड करण्यात आली आहे तसेच मतदार यादीतील पाने च गायब झाली आहेत यासंदर्भात मा.जिलहाधिकारी यांनी यासंदर्भात तातडीने लक्ष घालून मतदारांना त्याचाच प्रभागातील मतदार यादी मधे नाव समाविष्ट करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी निवेदनाद्वारे मा.जिल्हाधिकारी ,मा.उपविभागीय अधिकारी ,मा.मुख्याधिकारी यांच्या कडे केली आहे.

           अंतिम प्रभाग रचना जाहिर झाल्या नंतर  प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यानंतर प्रत्येक प्रभागात जाउन मतदारांचे सर्वेक्षण करणे आवश्यक असताना सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून व त्या प्रभागातील सत्ताधारी कार्यकर्त्याला हाताशी धरून मतदार यादयाचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचा व नगर परिषदेचे मुख्याधिकारी व त्याचे सर्व प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या राजकीय दबावाखाली काम करीत असल्याचा गंभीर आरोप लोहिया यांनी केला  आहे.यावर मा.जिल्हाधिकारी यांनी तात्काळ निर्णय घेऊन सदरील मतदार याद्याचे सर्वेक्षण थांबवुन प्रभागात जाउन त्या प्रभागातील चतु :सिमा लक्षात घेवून व निवडणुक आयोगाने घालुन दिलेल्या अटींचे व नियमानुसार मतदार याद्या तयार करण्यात याव्यात अशी मागणी मा.जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !