पोस्ट्स

MB NEWS - वाढदिवस अभिष्टचिंतन: मी अनुभवलेले आ.धनंजय मुंडे》》》भक्तराम फड यांचा लेख.

इमेज
  वाढदिवस अभिष्टचिंतन: मी अनुभवलेले आ.धनंजय मुंडे                राज्याचे माजी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड  जिल्ह्याचे  माजी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे राजकारण कमी आणी समाजकारण जास्त करणारे बहुजनांचे नेते आहेत. साहेबांच्या समवेत हल्ला बोल याञेनिमित्त याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. महाराष्ट्रात गावोगावी त्याना जो प्रतिसाद मिळत होता यावरून त्यांची लोकप्रियता दिसून येत होती.              ज्यावेळेस मला मतदान नव्हते त्यावेळेस पासून मी धनंजय मुंडे यांचा चाहता आहे. मी त्यांचा संघर्ष पाहता होतो. त्यांना जे मिळालय ते खूप संघर्षातुन मिळालेलं आहे. विधान परिषद विरोधपक्षनेते पदी  नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात निवड झाली होती. त्यावेळेस ही मी तिथे होतो. हळूहळू संपर्क वाढत गेला  आणि त्यांंच्यासोबत काम करण्याची संधी भेटु लागली. पुणे येथे आरोग्य विभागामध्ये नौकरी करत आसताना त्यांचे स्नेही मित्र अविनाश भाऊ नाईकवाडे यांचा परिचय झाला आणि त्यांनतर खरं  जवळ जाण्यास सुरुवात झाली . आरोग्य विभागात काम करत आसताना अनेक वेळा  बीड जिल्ह्यातील पेशंट हाँस्पिटलला येत होते. अनेक पेशंट ची आर्थिक प

MB NEWS-गुणवंताच्या गुणगौरव सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे - शैलेश वैजवाडे

इमेज
  गुणवंताच्या गुणगौरव सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे - शैलेश  वैजवाडे परळी वै (प्रतिनिधी) ः- १० वी व १२ वी चा निकाल लागला असून या मध्ये परळी शहरातील विद्यार्थी-विद्यार्थींनीनी मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल व त्यांच्या कर्तुत्वास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या वतीने परळी शहरातील गुणवंताचा गुण गौरव करीअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सुप्रसिध्द व्याख्याते मा.श्री. अविनाशजी भारती हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावसार समाजाचे बीड जिल्हाध्यक्ष मा.प्रकाशदादा कानगावकर,तर प्रमुख पाहूणे म्हणून माजलगावचे गटविकास अधिकारी मा.श्री. सिद्धेश्वरजी हजारे परळी नगर परिषद परळी.वै चे मुख्यधिकरी मा.श्री. सुंदरजी बोंदर भावसार समाज परळीचे अध्यक्ष श्री.प्रभाकर हजारे,श्री भालचंद्र तांदळे व भावसार समाज महिला अध्यक्ष मा.सौ.प्रणिताताई हंबीरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणार्‍या संस्थांचा सन्मान व गरजू होतकर

MB NEWS-राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुरूपोर्णिमेनिमित्त श्री शनि मंदिरात खिचडी वाटप

इमेज
  राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुरूपोर्णिमेनिमित्त श्री शनि मंदिरात खिचडी वाटप *श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीचा उपक्रम* *परळी/प्रतिनिधी* वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळी वैजनाथच्या वतीने आज गुरू पोर्णिमे निमित्त भाविकांना खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले. गुरूपोर्णिमेनिमित्त श्रीं च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आज बुधवार दि.13 जुलै रोजी झाली होती.  श्री भगवान शनैश्वर व वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रतिमेचेही यावेळी अनुष्ठान समितीच्या वतीने पुजन करण्यात आले. गुरू पोर्णिमेच्या अनुषंगाने श्री शनि मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून खिचडी वाटप करण्यात आली. वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमपुरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ तपोनुष्ठान समितीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित भाविकांनी आपल्या गुरूंचे मनोभावे दर्शन घेत श्रीं चे आशिर्वाद प्राप्त केले. भाविकांनी यावेळी आरती कार्यक्रमातही सहभाग घेतला

MB NEWS-धनंजय मुंडेंचे वाढदिवसानिमित्त समर्थकांना आवाहन*

इमेज
 *हार-तुरे, फ्लेक्स-बॅनर्स टाळून एक झाड लावा - धनंजय मुंडेंचे वाढदिवसानिमित्त समर्थकांना आवाहन* *वाढदिवसानिमित्त हार-फुलांचा व बॅनर्सचा खर्च टाळून लावलेल्या झाडासोबतचा सेल्फी मला पाठवा - धनंजय मुंडे* परळी (दि. 13) - दि. 15 जुलै रोजी राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा जन्मदिन असून, यादिवशी हार-तुरे, बॅनर्स-फ्लेक्स आदींवर केला जाणार खर्च टाळून त्याऐवजी समर्थक-सहकाऱ्यांनी झाडे लावावीत व त्याचे संवर्धन करावे, तसेच लावलेल्या झाडाचा सेल्फी पाठवावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.  क्लिक करा व वाचा: *दगडवाडी जवळ रुग्णवाहिकेचा अपघात; एक ठार* धनंजय मुंडे यांचा चाहता वर्ग फार मोठा असून, बीड जिल्ह्यात व राज्यभरात त्यांचे असंख्य समर्थक-चाहते आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या या सहकाऱ्यांना यावर्षी अनोखे व अभिनव आवाहन केले आहे.  क्लिक करा व वाचा: *Video & NEWS:*परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला!* _नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा_ "सप्रेम नमस्कार, माझ्या प्रिय सहकारी मित्रांनो, 15 जुलै हा माझा जन्मदिवस आपण सर्व जण दरवर्षी मला भरभरून शुभेच्छा

MB NEWS-परळी तालुका एस.बी.सी. संघर्ष समितीच्याअध्यक्षपदी बालासाहेब पोरे तर कार्याध्यक्षपदी राजेश साबणे

इमेज
  परळी तालुका एस.बी.सी. संघर्ष समितीच्याअध्यक्षपदी बालासाहेब पोरे तर कार्याध्यक्षपदी राजेश साबणे परळी वै. () : परळी तालुका एस.बी.सी. संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी बालासाहेब पोरे तर कार्याध्यक्षपदी राजेश साबणे यांची एकमताने निवड करण्यात आली. क्लिक करा व वाचा: *दगडवाडी जवळ रुग्णवाहिकेचा अपघात; एक ठार* नुकतीच महाराष्ट्र राज्य एस.बी.सी.संघर्ष समीतीचे उपाध्यक्ष विलासरावत ताटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवून कार्यकारीणी निवडण्यात आली. विशेष मागास प्रवर्गाच्या विविध मागण्यांसाठी ही समीती कार्यरत असणार आहे. क्लिक करा व वाचा: *Video & NEWS:*परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला!* _नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा_ उपाध्यक्षपदी शाम आडेपवार, नागनाथ कल्याणकर, सचिवपदी प्रा. राम पेन्टेवार, कोषाध्यक्षपदी रोहन ताटे, सदस्य म्हणुन रमेश साबणे, शंकर आडेपवार, गणेश गालम, वैजनाथ तम्मलवार, संतोष जुजगर, प्रकाश पेन्टेवार, श्रीकांत पेन्टेवार, सौ. स्वाती ताटे, सौ. साधना खामकर आदिंची निवड करण्यात आली.  आवश्य पहा:_-  🔴 *धानं ओंबाळली! छोट्या पुलांवरुन पाणी| गावरस्त्यांवर वाहतूक होतेय हळूह

MB NEWS-भावसार समाजाच्या वतीने भगवान दत्तात्रय यांच्या प्रतिमेची शहरातून शोभायात्रा

इमेज
  भावसार समाजाच्या वतीने भगवान दत्तात्रय यांच्या प्रतिमेची शहरातून शोभायात्रा   परळी शहरातील भावसार समाजाच्या वतीने गुरू पोर्णिमेच्या निमित्ताने श्री गुरु चरित्र पारायण सोहळ्याची समाप्ती गुरू पौर्णिमा दि 13 जुलै रोजी संपन्न झाला असून या निमित्ताने ह.भ.प संपत महाराज गित्ते गुरुजी यांच्या काल्याचे कीर्तन होऊन दत्त महाराज यांची आरती करून महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.तत्पुर्वी परळी भावसार समाजाच्या वतीने भगवान दत्तात्रय यांच्या प्रतिमेची शहरातून भर पावसात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. क्लिक करा व वाचा: *दगडवाडी जवळ रुग्णवाहिकेचा अपघात; एक ठार* गुरू पोर्णिमेनिमित्ताने परळी शहरातील श्री दत्त मंदिर येथे भावसार समाजाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मागील सात दिवसापासून या ठिकाणी गुरू चरीत्र पारायण,गीता पारायण,संगीत भजनी असे कार्यक्रम संपन्न झाले आहेत. आज दि. 13 जुलै रोजी श्री दत्तगुरू यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा परळी शहरातील प्रमुख मार्गावरून भर पावसात काढण्यात आली .या शोभा यात्रेत समाजातील लहान बालके,स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यानंतर श्री ह.भ.प.

MB NEWS- *परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला!* _नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा_

इमेज
 *परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला!* _नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा_ परळी वैजनाथ . .........     परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत म्हणून ओळख असलेल्या  तालुक्यातील  नागापूर येथील  'वाण प्रकल्पाचा' १०० टक्के जलसाठा झाला आहे.  परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला असून आज  (दि.१३) पहाटे ४ वा. सुमारास या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी ओसंडून वाहू लागले आहे. हा प्रकल्प संपूर्ण भरल्याने परळी शहराच्या पाणीपुरवठ्यासह तालुक्यातील सिंचनाखाली येणाऱ्या भागाचा पाणीप्रश्न सुटला आहे.      परळी तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला आहे. प्रदीर्घ  प्रतिक्षेनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र आनंदी वातावरण झाले आहे. गेल्या आठवडय़ात धरणक्षेत्रात चांगले पर्जन्यमान झाले  त्यामुळे तलावांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध होण्यासाठी  मोठी मदत झाली.    क्लिक करा व वाचा: *दगडवाडी जवळ रुग्णवाहिकेचा अपघात; एक ठार*       परळी तालुक्यातील बोरणा,बोधेगाव  या मध्यमतलावातही मोठ्या प्रमाणात पाणी साठवण सुरू आहे.  परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या  तालुक्यातील   नागापूर

MB NEWS-दगडवाडी जवळ रुग्णवाहिकेचा अपघात; एक ठार

इमेज
  दगडवाडी जवळ रुग्णवाहिकेचा अपघात; एक ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी        परळी गंगाखेड रस्त्यावरील दगडवाडी जवळ आज सकाळी नऊच्या सुमारास एका रुग्णवाहिकेचा अपघात झाला असून यात रुग्णवाहिकेचा चालक जागेवरच ठार झाल्याची घटना घडली आहे .        ‌‌गंगाखेड येथील रुग्णवाहिका एका रुग्णाला अंबाजोगाई येथे सोडून परत गंगाखेड कडे जात असताना दगडवाडी जवळील चढावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ही रुग्णवाहिका रस्ता सोडून खाली पलटी झाली. यात रुग्णवाहिकेचा चालक जागीच ठार झाला आहे. गजानन चिलगर असे मयताचे नाव असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. मयताचा मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी  पाठविण्यात आला आहे. परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

MB NEWS-जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती

इमेज
  जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती मुंबई  : राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्यातर्गंतच्या २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम घेण्यात येणार होता. परंतु मंगळवारी (दि.१२) झालेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ५ जुलैरोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्यातर्गंतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात सुनावणी झाली. एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगित केला आहे. सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम लवकरच देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाने नमूद केले आहे.

MB NEWS-अखेर उद्धव ठाकरेंनी केले जाहीर:शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा देणार

इमेज
  अखेर उद्धव ठाकरेंनी केले जाहीर:शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा देणार  येत्या काही दिवसात होणाऱ्या राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीत शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा देणार आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जाहीर केले. तसेच हा निर्णय कोणत्याही दबावामुळे घेण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या काही दिवसात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक अयोग्य आणि चुकीच्या बातम्या तुमच्यापर्यंत आल्या आणि त्या जनतेपर्यंत पोहचल्या. सोमवारी झालेल्या पक्षाच्या खासदारांच्या बैठकीत कोणीही कोणत्याही प्रकारचा दबाव आपल्यावर आणलेला नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. याबाबत सर्वांनी सांगितले, याबाबत पक्षप्रमुख म्हणून तुमचा निर्णय असेल, तुम्ही जो निर्णय घ्याल, तोच आदेश, असे सर्वांनी सांगितले. कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही, हे तुम्ही ठरवाल, त्याप्रमाणेच होईल, असे सर्वांनी सांगितले. आपण गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार, जिल्हाप्रमुख, खासदार, कार्यकर्ते यांच्याही आपण चर्चा करत आ

MB NEWS-कपीलधार येथे 35 दिवशीय अखंड शिवनाम महोत्सवाचे आयोजन

इमेज
  कपीलधार येथे 35 दिवशीय अखंड शिवनाम महोत्सवाचे आयोजन परळी वैजनाथ दि.१२ (प्रतिनिधी)                 श्री.क्षेत्र कपिलधार येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ३५ दिवशीय अखंड शिवनाम महोत्सव,  ज्ञानयज्ञ महोत्सव व परमरस्य पारायण सोहळ्याचे आयोजन बुधवार (ता.१३) गुरुपौर्णिमा ते बुधवार (ता.१७) आँगस्ट पर्यंत करण्यात आले आहे. या चार्तुमास सोहळ्यास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक कपीलधार पंच कमिटी व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.              स्वर्गीय डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रेरणेने व श्री.सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या मार्गदर्शनाने लिंगायत समाजाचे आराध्य दैवत असलेल्या श्री.क्षेत्र कपिलधार येथे गाढे पिंपळगाव येथील दिवंगत सोनाप्पा फुटके, अन्नपूर्णाबाई फुटके या दाम्पत्यांनी या चातुर्मास ३५ दिवशीय महोत्सव सुरुवात केली होती. त्यांना कपीलधार देवस्थान पंच कमिटीच्या वतीने सहकार्य करण्यात आले. गेल्या ४८ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या महोत्सवाचे अखंडपणे हे ४९ वे वर्षे आहे. बुधवारी (ता.१३) गुरुपौर्णिमेला सुरुवात होणार असून श्री.विरुप

MB NEWS-गणेेशपारचा डीपी बसला:तीन दिवसानंतर अंधार झाला दूर

इमेज
गणेेशपारचा डीपी बसला:तीन दिवसानंतर अंधार झाला दूर परळी वैजनाथ... गावभागतील गणेशपार येथील विद्युत रोहित्र (डीपी) खराब झाल्यामुळे रविवार दुपारपासून बंद असलेला खंडित विद्युत पुरवठा पूर्ववत झाला आहे. मात्र नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल महावितरण विरुद्ध नागरिकांत रोष व्यक्त केला. क्लिक करा व पहा : ● *"नावाला तुमच्या डिमांड आली" | गोगलगाय अन् सोयाबीन खाय....* _MB NEWS ला Subscribeकरा_       परळी शहरातील महत्वपूर्ण असलेल्या गणेशपार भागातील विद्युत पुरवठा रविवार दुपारी दि 10 पासून विद्युत रोहित्र खराब झाल्यामुळे खंडित झाला होता. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही डीपी उपलब्ध नाही या कारणास्तव विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता. सोमवारी पुन्हा खंडित वीजपुरवठ्याच्या तक्रारी बाबत नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतर डीपी ऑइल नसल्याचे कारण देत सोमवारीही नागरिकांना अंधारातच रात्र काढावी लागली. पावसामुळे पाणी साचून सध्या डासांचे प्रमाण वाढले आहे त्यात लाईट नसल्यामुळे पंख्या अभावी लोकांना त्रास सहन करावा लागला. आज मंगळवार दुपारी 5 वाजता नवीन विद्युत रोहित्र बसवण्यात आले. महावितरणचे कर्मचारी सु

MB NEWS-सेवानिवृत नगर‌परिषद कर्मचारी 18 तारखेपासून करणार उपोषण !

इमेज
  सेवानिवृत नगर‌परिषद कर्मचारी 18 तारखेपासून  करणार उपोषण ! परळी वैजनाथ:-  नगरपरिषदेतील सेवानिवृत कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी 18 तारखेपासून नगर परिषदे समोर उपोषणास बसणार आहेत.   क्लिक करा व पहा : ● *"नावाला तुमच्या डिमांड आली" | गोगलगाय अन् सोयाबीन खाय....* _MB NEWS ला Subscribeकरा_          2016 नंतर सेवानिवृत्त  कर्मचाऱ्यांना सेवा उपदान (ग्रॅच्युइटी) रजारोखीकरणाचे  पैसे मिळाले नाहीत. सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना प्रोव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, रजारोखीकरणचे पैसे दिले जातात. महाराष्ट्रातील  सर्व नगर परिषदांमधून सेवानिवृत कर्मचारी यांचे देणे सेवानिवृत्ती दिवशीच दिल्या जातात. परंतू परळी नगरपरिषदेच्या सेवानिवृत कर्मचाऱ्यांवर मात्र आंदोलन, उपोषण करण्याची वेळ येते हे दुर्दैव आहे.पाच वर्षानंतरही उपदान मिळत नाही. यासाठी दिनांक 17.6.22 रोजी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने निवेदन दिले  मात्र मुख्याधिकारी यांनी आजपर्यंत याबाबत संघटनेला बोलावले नाही. मोघम उत्तर दिले जात आहे. त्यामुुळे सेवानिवृत कर्मचारी संघटना नगर परिषद समोर उपोषणास बसणार आहे.या उपोषणास  सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी

MB NEWS-राज्य सरकारने निवडणूक आयोगाशी चर्चा करून आताच्या निवडणूकांना स्थगिती द्यावी

इमेज
  ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत  - पंकजा मुंडे राज्य सरकारने निवडणूक आयोगाशी चर्चा करून आताच्या निवडणूकांना स्थगिती द्यावी मुंबई ।दिनांक १२। ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे, ती कायम ठेवण्यास सांगितलं आहे. त्यानंतर  पत्रकारांशी बोलताना पंकजाताई मुंडे यांनी आपली भूमिका मांडली. क्लिक करा व पहा : ● *"नावाला तुमच्या डिमांड आली" | गोगलगाय अन् सोयाबीन खाय....* _MB NEWS ला Subscribeकरा_     पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, “कोर्टाची ऑर्डर माझ्या हातात नाही. मात्र ज्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या घेणं क्रमप्राप्त आहे असं कोर्टानं म्हटलं आहे. या प्रसंगात माझी अपेक्षा फक्त सरकारकडून आहे. ओबीसींच्या प्रश्नावर लढणारी एक कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार आहे की या निवडणुकांच्याबाबतीत निव

MB NEWS-पाणी मागण्याच्या बहाण्याने आले अन् चाकुने भोसकले;पतीचा मृत्यू पत्नी गंभीर

इमेज
पाणी मागण्याच्या बहाण्याने आले अन् चाकुने भोसकले;पतीचा मृत्यू पत्नी गंभीर  केज :- पाणी मागण्याच्या बहाण्याने आलेल्या तिघांनी पती-पत्नीवर चाकूने वार केल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला आहे.  या बाबतची माहिती अशी की दि. ११ जुलै सोमवार रोजी सायंकाळी सुमारे ७:१५ वा. च्या दरम्यान चिंचोली माळी ता. केज येथील रस्त्यावर घर असलेल्या पांडुरंग राऊत यांच्या घरी तोंडाला स्कार्फ बांधलेले तीन अनोळखी व्यक्ती गेले. त्यांनी त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले. पत्नी शशिकला राऊत ही पाणी घेऊन येताच त्या तीन अज्ञात चोरट्यानी तिच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले. या वेळी शशिकला हिचा पती पांडुरंग राऊत हा विरोध करीत असताना अज्ञाताने त्याला चाकू भोकसला. या झटापटीत त्याची पत्नी शशिकला राऊत ही देखील जखमी झाली आहे. मारेकऱ्यांनी खून करून पळून जाताना कोणाला दिसू नये आणि ओळख पटू नये म्हणून घरातील विजेचा बल्ब काढून अंधार केला. चाकूचा घाव वर्मी बसताच पांडुरंग राऊत याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

MB NEWS-नागरिकांत तीव्र असंतोष:दोन दिवसापासून गणेशपार विभागात अंधार !

इमेज
  नागरिकांत तीव्र असंतोष:दोन दिवसापासून गणेशपार विभागात अंधार ! परळी वैजनाथ (प्रतिनीधी)...               गेल्या अनेक दिवसापासून परळी शहरांमध्ये कधी तांत्रिक तर कधी कृत्रिम अडचणीमुळे विजेचा लपंडाव सुरू असून याचे अधिकारी वर्ग, विद्युत मंडळ  यांना कसलेही सोयर सुतक नाही. जुन्या गावभागातील गणेशपार या ठिकाणचे विद्युत रोहित्र (डीपी) रविवार दुपारपासून नादुरुस्त झाल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली असून विद्युत मंडळाच्या गलथान कारभाराविरुद्ध नागरिकांत रोष पसरलेला पहावयास मिळत आहे. गेल्या दोन दिवसापासून या भागातील नागरिकांना विद्युत मंडळाच्या गलथान कारभारामुळे केवळ नियोजना अभावी अंधाराचा सामना करावा लागत आहे.          याबाबत अधिक माहिती अशी की, गणेशपार भागातील डीपी रविवार दुपारपासून अचानक नादुरुत झाली. नागरिकांनी फोनवर व विद्युत विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रारी केल्या परंतु रोहित्र (डीपी) उपलब्ध नसल्याचे कारण देत विद्युत मंडळाने रविवार पासून या भागातील नागरिकांना अंधारात ठेवले आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने साठलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असल्याने व त

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात अर्ज उपलब्ध ; 18 जुलैपर्यंत अर्ज द्यावेत

इमेज
परळी नगरपरिषद निवडणूक: भाजपच्या इच्छूक उमेदवारांनी पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावेत - जुगलकिशोर लोहिया  पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात अर्ज उपलब्ध ; 18 जुलैपर्यंत अर्ज द्यावेत परळी दि. 11 --- भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने इच्छूक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील  अर्ज भरून घेण्यास सुरवात केली आहे. पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात हे अर्ज उपलब्ध असून   इच्छूक उमेदवारांनी 18 जुलैपर्यंत ते भरून द्यावेत असं आवाहन भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केलं आहे.    नगरपरिषद निवडणूकीच्या दृष्टीने भाजपने संपूर्ण ताकदीनिशी तयारी सुरू केली आहे. भाजपच्या इच्छूक उमेदवारांकडून  उद्यापासून अर्ज भरून घेण्यात येणार आहे, त्यासाठी उमेदवारांना विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तो अर्ज संपूर्ण भरून द्यावयाचा असून त्यासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो पण जोडायचा आहे. हा अर्ज पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयात 12 तारखेपासून उपलब्ध आह

MB NEWS-संविधान दिंडीचा पंढरपुरात समारोप

इमेज
 वारीतील सामाजिक समता गावात दिसावी : शामसुंदर महाराज  संविधान दिंडीचा पंढरपुरात समारोप पंढरपूर (प्रतिनिधी) : समताधिष्ठित समाजाचे सुंदर रूप पंढरीच्या वारीत दिसते. ही समानता जेव्हा प्रत्येक गावात रुजेल तेव्हाच संतांनी पाहिलेले आनंदी समाजाचे स्वप्न साकार होईल, असे मत ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी व्यक्त केले. संतांनी ज्या मानवी मूल्यांचा जागर केला त्याचेच प्रतिबिंब आपल्याला भारतीय संविधानात दिसते, असेही ते म्हणाले. "एक दिवस तरी वारी अनुभवावी" उपक्रमांतर्गत ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर आणि ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांच्या नेतृत्वाखाली समता भूमी फुलेवाडा पुणे ते संतभूमी पंढरपूर पर्यंत "समता संविधान दिंडी"चे आयोजन करण्यात आले होते. तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासोबत ही दिंडी पंढरपूर येथे पोहचली. 16 दिवसांच्या या प्रवासात  'संत विचार आणि संविधान मूल्य ' या विषयावर शामसुंदर महाराज सोन्नर यांनी 15 ठिकाणी प्रवचने दिली.  आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला या "समता संविधान दिंडी"ची सांगता पंढरपूर येथील 'ग्रामगीता सक्रीय तत्त्वज्ञान विद्यापीठ'

MB NEWS-इनरव्हील क्लब परळी चा पदग्रहण सोहळा

इमेज
  इनरव्हील क्लब परळी  चा पदग्रहण सोहळा    अध्यक्षापदाचा  सौ उज्वला अमर आलदे व उपाध्यक्षापदाचा  सौ. आशा धुमाळ यांनी पदभार घेतला परळी, येथील इनरव्हील क्लब परळीचा पदग्रहण सोहळा दि 10 रोजी शानदार पणे  झाला. 2022-23 या वर्षासाठी इनरव्हील क्लब परळी नवीन कार्यकारणी अध्यक्षापदाची सूत्रे  सौ. उज्वला अमर आलदे यांनी स्विकारली, तर उपाध्यक्षापदाचा  सौ. आशा धुमाळ यांनी पदभार घेतला, तसेच सेक्रेटरी- सौ. उमा समशेट्टे, ट्रेझरर- सौ. सारिका सोळंके, आय. एस. ओ.- सौ.विजया दहिवाळ, एडिटर- सौ.शुभांगी गीत्ते, सी.सी.- सौ.मधु कांकरिया यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला.  क्लिक करा व पहा : ● *बघतच रहावा असा वारीतील भजनानंद: "हमामा पोरा हमामा."* _MB NEWS ला नक्की SUBSCRIBE करा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सरोजनी हालगे( नगराध्यक्षा, परळी वैजनाथ) उपस्थित होत्या, प्रमुख अतिथी म्हणून सौ सरला उपाध्याय (पतंजली योग समिती अध्यक्षा, परळी वैजनाथ), सौ. तारावती अग्रवाल (माजी अध्यक्षा इनरव्हील क्लब, परळी वैजनाथ) उपस्थित होत्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. याप्रसंगी माजी अध्यक्षा सौ. तारावती

MB NEWS-राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज जगमित्र कार्यालयात सादर करावेत - बाजीराव धर्माधिकारी

इमेज
  राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज जगमित्र कार्यालयात सादर करावेत - बाजीराव धर्माधिकारी * 13 जुलै मध्यरात्रीपर्यंत इच्छुक अर्ज सादर करण्याचे आवाहन, अर्ज नमुना जगमित्र कार्यालयात उपलब्ध* परळी (प्रतिनिधी) - परळी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री, आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तयारीला सुरुवात केली असून, धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस परतीच्या वतीने मागविण्यात आले आहेत.  सदर अर्ज हे जगमित्र कार्यालयात उपलब्ध असून, हे अर्ज संपूर्ण माहिती भरून दोन प्रतींमध्ये दि. 13 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत जगमित्र कार्यालयात सादर करण्यात यावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. संबंधित वॉर्ड मधील आरक्षण, महिला व पुरुष आरक्षण, यांसह अन्य जमेच्या बाजू याबाबत सखोल माहिती दर्शविणारा अर्ज नमुना इच्छूक उमेदवारांसाठी आ. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयात

MB NEWS-श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्यात मान्यवरांच्या हास्ते आरती

इमेज
  श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्यात मान्यवरांच्या हास्ते आरती  परळी (प्रतीनीधी) शहरातील श्री दत्त मंदिर भावसार समाज या ठिकाणी श्री गुरु चरीत्र पारायण सोहळ्यात आषाढ़ी एकादशी निमीत्त एक दिवशीय  गिता पारायण घेण्यात आले. ह.भ.प. श्री संपत महाराज गित्ते गुरुजी यांचे गिता पारायण संपन्न झाले.      सकाळ च्या सत्रात 7 ते 9 श्री गुरुचरित्र पारायण व आरती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ संतोष मुंडे समाजाच्या वतीने समाज कार्यकारणी प्रमुख सल्लागार श्री व सौ.बंडू गरुड श्री व सौ. उल्हास सुत्रावे यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच संध्याकाळी 4 ते 6 ह.भ.प.श्री संपत महाराज गित्ते यांचे संगित भजन संपल्या नंतर श्री ची आरती परळी शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री उमाशंकर  कस्तुरे  व भावसार समाज युवा सेवाभावी संस्था सचिव श्री शैलेश प्रेमनाथ वैजवाडे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आलेल्या पाहुण्यांचा सन्मान श्री दत्त प्रितीमा संयोजक श्री गोपाळ कंकाळ व भावसार समाज अध्यक्ष श्री प्रभाकर हजारे यांनी केला. तसेच यावेळी समाज उपाध्यक्ष श्री विष्णुपंत क्षिरसागर श्री अनिल सुत्रावे सचिव श्री विनोद घाटे कोषाध्यक्ष

MB NEWS- *परळीतील छोट्या व्यावसायिकाचे सामाजिक भान; गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप*

इमेज
 परळीतील छोट्या व्यावसायिकाचे सामाजिक भान; गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप  कौतुकास्पद उपक्रम- पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे परळी वैजनाथ, प्रतिनिधी....         श्रीमंत व पैसेवाले भरपूर लोक असतात मात्र प्रत्येकात दानत व सामाजिक भान असेलच असे नाही परंतु परळी शहरातील एक अतिशय सर्वसामान्य व छोटा व्यावसायिक असलेल्या युवकांने सामाजिक भान जपत गेल्या सात वर्षापासून अखंडितपणे शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतलेला आहे. आज (दि.11) मान्यवरांच्या उपस्थितीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.           परळी शहरातील गोविंदा गोविंदा एंटरप्राइजेस या नावाने नवीन पुस्तके, जुने व नवीन पुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री करणारे विश्वंभर देशमुख यांनी अतिशय खडतर परिश्रमातून स्वतःचे दुकान सुरू केलेले आहे. मात्र फार मोठा व्यावसायिक नसतानाही नेहमी सामाजिक कार्य करण्याची धडपड या युवकाची असते. कोरोना काळातील दोन वर्ष वगळता अविरतपणे हा सामाजिक उपक्रम त्यांनी अखंडित सुरू ठेवला आहे. आज मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना 37 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्य

MB NEWS-आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाला न्यायालयाकडून दिलासा

इमेज
  आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाला न्यायालयाकडून दिलासा नवी दिल्ली- आमदारांच्या अपात्रतेच्या बाबत व इतर याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र, आज ही प्रकरणे खंडपीठासमोर सुनावणीसनआल्याने शिवसेनेच्यावतीने सरन्यायाधीशांकडे या सुनावणीबाबत विनंती करण्यात आली. त्यानंतर सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना हे निर्देश देत पुढील सुनावणी होईपर्यंत या आमदारांवर कुठलीही कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत. या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी घटनापीठ तयार करण्यासाठी काही अवधी लागणार असल्याचेही सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी म्हटले. क्लिक करा व वाचा: आषाढी एकादशीच्या पर्वानिमित्त गजबजली वैद्यनाथनगरी. मागील महिन्यात झालेल्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टने विधानसभा उपाध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत 12 जुलैपर्यंत कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश दिले होते. आज, शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रकरण सुप्रीम कोर्टात ठेवलं. सिब्बल म्हणाले की, उद्या अपात्रतेबाबतचा विषय विधानसभेत ऐकला जाईल. जर कोर्टानं आज सुनावणी घेतली नाही तर विधानसभा अध्यक्ष यावर निर्णय घेऊ शकतात. जोवर यावर

MB NEWS-शिवमहापुराण कथा: ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभ हस्ते मंडप उभारणीला सुरुवात

इमेज
  शिवमहापुराण कथा: ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभ हस्ते मंडप उभारणीला सुरुवात परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दि.१० - प.पू.श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या अभिषेक शिवमहापुरण कथेचे आयोजन बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाच्या पावन भूमीत संपन्न होणार आहे.शहरातील मथुरा प्रतिष्ठान द्वारा या कथेचे आयोजन करण्यात आले आहे.श्रावण महिन्यात होणारी कथा शिव भक्तांसाठी पर्वणीच ठरणार आहे. क्लिक करा व वाचा: आषाढी एकादशीच्या पर्वानिमित्त गजबजली वैद्यनाथनगरी. ह.भ.प.महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभहस्ते शनिवार दि.९ रोजी मंडप विधीवत पूजन करत मंडप उभारणीला सुरुवात करण्यात आली.अंबाजोगाई रोडवर असलेल्या वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात या कथेचे आयोजन १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे.यावेळी २१ नारळ अर्पण करत मंडप उभारणीसाठी पूजा करण्यात आली.कथेचे यजमान गोपालजी बन्सीलालजी सोमाणी यांच्यासह मथुरा प्रतिष्ठान चे पदाधिकारी,शहरातील प्रतिष्ठीत नागरिक भाविकांची उपस्थिती होती. क्लिक करा व पहा : video news  🏵️ *आषाढी एकादशीनिमित्त गजबजली वैद्यनाथनगरी.* _MB NEWS ला नक्की Subscribeकरा

MB NEWS-- परळी नगरपरिषद निवडणूक काँग्रेस (आय) स्वबळावर लढणार- सय्यद हनीफ

इमेज
  परळी नगरपरिषद निवडणूक  काँग्रेस (आय) स्वबळावर लढणार- सय्यद हनीफ  परळी ( प्रतिनिधी) दिनांक 10 जुलै 2022 रविवार रोजी काँग्रेस(आय) कार्यालयात परळी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक परळी शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनीफ सय्यद करीम उर्फ बहादुर भाई यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सर्व कार्यकारणी मंडळ व पदाधिकारी यांनी एकमताने असे ठराव केले की आगामी परळी नगर परिषदेची निवडणूक काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने स्वबळावर लढणार. क्लिक करा व वाचा: आषाढी एकादशीच्या पर्वानिमित्त गजबजली वैद्यनाथनगरी. प्रभाग निहाय इच्छुक उमेदवारांनी आपापले फॉर्म दिनांक 15 जुलाई 2022 पर्यंत काँग्रेस कार्यालयात भरून द्यावे, जेणेकरून की योग्य उमेदवारास प्रधान्य देण्यास सोयीस्कर होईल. नमुना फॉर्म काँग्रेस (आय)कार्यालय परळी वैजनाथ येथे उपलब्ध आहे. क्लिक करा व पहा : video news  🏵️ *आषाढी एकादशीनिमित्त गजबजली वैद्यनाथनगरी.* _MB NEWS ला नक्की Subscribeकरा._ या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रदेश सर चिटणीस अनिल मुंढे,जिल्हा सर चिटणीस प्रकाश मुंडे,माझी शहर अध्यक्ष प्रकाशराव देशमुख,ज्येष्ठ नेते अवस्ती,उपाध्यक्ष शुबाष देशमुख,एतेशं खातीब,अशो