MB NEWS-गुणवंताच्या गुणगौरव सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे - शैलेश वैजवाडे

 गुणवंताच्या गुणगौरव सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे - शैलेश  वैजवाडे



परळी वै (प्रतिनिधी) ः- १० वी व १२ वी चा निकाल लागला असून या मध्ये परळी शहरातील विद्यार्थी-विद्यार्थींनीनी मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल व त्यांच्या कर्तुत्वास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने भावसार युवा सेवाभावी संस्थेच्या वतीने परळी शहरातील गुणवंताचा गुण गौरव करीअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास सुप्रसिध्द व्याख्याते मा.श्री. अविनाशजी भारती हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावसार समाजाचे बीड जिल्हाध्यक्ष मा.प्रकाशदादा कानगावकर,तर प्रमुख पाहूणे म्हणून माजलगावचे गटविकास अधिकारी मा.श्री. सिद्धेश्वरजी हजारे परळी नगर परिषद परळी.वै चे मुख्यधिकरी मा.श्री. सुंदरजी बोंदर भावसार समाज परळीचे अध्यक्ष श्री.प्रभाकर हजारे,श्री भालचंद्र तांदळे व भावसार समाज महिला अध्यक्ष मा.सौ.प्रणिताताई हंबीरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणार्‍या संस्थांचा सन्मान व गरजू होतकरू महिलांना शिलाई मशिन वाटप करण्यात येणार आहे.

हा गुणगौरव सोहळा शुक्रवार   १५ जुलै २०२२ रोजी सांय ०५.०० वा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे नटराज रंग मंदिर परळी वै. येथे होणार आहे.

तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भावसार युवा सेवाभावी संस्थेचे सचिव शैलेश प्रेमनाथ वैजवाडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !