इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- *परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला!* _नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा_

 *परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला!*



_नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा_

परळी वैजनाथ . .........

    परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत म्हणून ओळख असलेल्या  तालुक्यातील  नागापूर येथील  'वाण प्रकल्पाचा' १०० टक्के जलसाठा झाला आहे.  परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला असून आज  (दि.१३) पहाटे ४ वा. सुमारास या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी ओसंडून वाहू लागले आहे. हा प्रकल्प संपूर्ण भरल्याने परळी शहराच्या पाणीपुरवठ्यासह तालुक्यातील सिंचनाखाली येणाऱ्या भागाचा पाणीप्रश्न सुटला आहे.

     परळी तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला आहे. प्रदीर्घ  प्रतिक्षेनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र आनंदी वातावरण झाले आहे. गेल्या आठवडय़ात धरणक्षेत्रात चांगले पर्जन्यमान झाले  त्यामुळे तलावांमध्ये आवश्यक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध होण्यासाठी  मोठी मदत झाली.   

क्लिक करा व वाचा:*दगडवाडी जवळ रुग्णवाहिकेचा अपघात; एक ठार*

      परळी तालुक्यातील बोरणा,बोधेगाव  या मध्यमतलावातही मोठ्या प्रमाणात पाणी साठवण सुरू आहे.  परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या  तालुक्यातील   नागापूर येथील  'वाण प्रकल्पाचा' १०० टक्के जलसाठा सद्यस्थितीत आहे. परळी शहराला याच प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. तसेच तालुक्यातील बहुतांश सिंचनाखाली येणारा भाग ही या धरणावर आवलंबून आहे. तालुक्यातील लघुतलावात पाणीसाठा समाधानकारक आहे. 

            परळी तालुक्यातील वाण धरण भरण्यासाठी धरणाला वरून येणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवश्यकता होती . धारुर, केज, अंबाजोगाईच्या क्षेत्रात होणाऱ्या  पावसावर या धरणातील पाणी साठ्याची  भिस्त आहे.  गेल्या  तीन दिवसात  मोठे पाउस या  क्षेत्रात  झाले. त्यामुळे वाण धरणात मुबलक पाणी साठा निर्माण झाला.

Video 



@@@@

  वाण धरण :

●स्थापित क्षमता       - १९.७१७दलघमी

● मृतसाठा               -  ०.३९७  दलघमी

●उपयुक्त जलसाठा    - १९.३२०दलघमी 

● पाणीसाठा सरासरी  - १०० टक्के.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!