इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-भावसार समाजाच्या वतीने भगवान दत्तात्रय यांच्या प्रतिमेची शहरातून शोभायात्रा

 भावसार समाजाच्या वतीने भगवान दत्तात्रय यांच्या प्रतिमेची शहरातून शोभायात्रा 



परळी शहरातील भावसार समाजाच्या वतीने गुरू पोर्णिमेच्या निमित्ताने श्री गुरु चरित्र पारायण सोहळ्याची समाप्ती गुरू पौर्णिमा दि 13 जुलै रोजी संपन्न झाला असून या निमित्ताने ह.भ.प संपत महाराज गित्ते गुरुजी यांच्या काल्याचे कीर्तन होऊन दत्त महाराज यांची आरती करून महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.तत्पुर्वी परळी भावसार समाजाच्या वतीने भगवान दत्तात्रय यांच्या प्रतिमेची शहरातून भर पावसात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.

क्लिक करा व वाचा:*दगडवाडी जवळ रुग्णवाहिकेचा अपघात; एक ठार*

गुरू पोर्णिमेनिमित्ताने परळी शहरातील श्री दत्त मंदिर येथे भावसार समाजाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मागील सात दिवसापासून या ठिकाणी गुरू चरीत्र पारायण,गीता पारायण,संगीत भजनी असे कार्यक्रम संपन्न झाले आहेत. आज दि. 13 जुलै रोजी श्री दत्तगुरू यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा परळी शहरातील प्रमुख मार्गावरून भर पावसात काढण्यात आली .या शोभा यात्रेत समाजातील लहान बालके,स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यानंतर श्री ह.भ.प. संपत महाराज गित्ते गुरूजी यांचे काल्याचे किर्तन होऊन दुपारी 12.39 मि. दत्तगुरूंची महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.सदरील कार्यक्रमाचे पूर्ण आयोजन ,नियोजन हे  परळी भावसार समाजाचे अध्यक्ष प्रभाकर हजारे, संयोजक गोपाळ कंकाळ यांदी सह समाज बांधवांकडून करण्यात आले होते.

क्लिक करा व वाचा:*Video & NEWS:*परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला!* _नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा_


आवश्य पहा:_- 🔴 *धानं ओंबाळली! छोट्या पुलांवरुन पाणी| गावरस्त्यांवर वाहतूक होतेय हळूहळू बंद |* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ *#subscribe, #like #commentes#share*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!