इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-धनंजय मुंडेंचे वाढदिवसानिमित्त समर्थकांना आवाहन*

 *हार-तुरे, फ्लेक्स-बॅनर्स टाळून एक झाड लावा - धनंजय मुंडेंचे वाढदिवसानिमित्त समर्थकांना आवाहन*



*वाढदिवसानिमित्त हार-फुलांचा व बॅनर्सचा खर्च टाळून लावलेल्या झाडासोबतचा सेल्फी मला पाठवा - धनंजय मुंडे*


परळी (दि. 13) - दि. 15 जुलै रोजी राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा जन्मदिन असून, यादिवशी हार-तुरे, बॅनर्स-फ्लेक्स आदींवर केला जाणार खर्च टाळून त्याऐवजी समर्थक-सहकाऱ्यांनी झाडे लावावीत व त्याचे संवर्धन करावे, तसेच लावलेल्या झाडाचा सेल्फी पाठवावा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे. 

क्लिक करा व वाचा:*दगडवाडी जवळ रुग्णवाहिकेचा अपघात; एक ठार*

धनंजय मुंडे यांचा चाहता वर्ग फार मोठा असून, बीड जिल्ह्यात व राज्यभरात त्यांचे असंख्य समर्थक-चाहते आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या या सहकाऱ्यांना यावर्षी अनोखे व अभिनव आवाहन केले आहे. 

क्लिक करा व वाचा:*Video & NEWS:*परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत तुडुंब भरला!* _नागापूर 'वाण प्रकल्पात' १०० टक्के जलसाठा_

"सप्रेम नमस्कार,

माझ्या प्रिय सहकारी मित्रांनो, 15 जुलै हा माझा जन्मदिवस आपण सर्व जण दरवर्षी मला भरभरून शुभेच्छा देऊन व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करत असता. हार-तुरे, केक, बॅनर अशा स्वरूपात वाढदिवस साजरा करणे खरंतर मला आवडत नाही. 


यावर्षी बीड जिल्ह्यासह सर्वत्र चांगला पाऊस पडत असून, आपल्या भागात वृक्षारोपण होण्याची व वृक्ष संवर्धनाची नितांत गरज आहे. याचाच विचार करून आपण माझ्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे, केक-बुके, बॅनर्स-फ्लेक्स, आदी बाबींवरचा खर्च टाळून त्याऐवजी किमान एक झाड लावावे व त्या झाडाचे संवर्धन करण्याचा निर्धार करावा. 


झाड लावताना त्यासोबत एक सेल्फी काढून न विसरता मला पाठवायचा बरंका! पुढच्या वर्षी हे झाड मोठे होईल, तेव्हा पुन्हा फोटो पाठवायचा व हे सत्र असेच सुरू राहील; या वाढदिवसाची हीच खरी भेट मला अपेक्षित आहे...!"असे धनंजय मुंडे आपल्या आवाहनात म्हणतात.

आवश्य पहा:_- 🔴 *धानं ओंबाळली! छोट्या पुलांवरुन पाणी| गावरस्त्यांवर वाहतूक होतेय हळूहळू बंद |* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ *#subscribe, #like #commentes#share*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!