इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS-राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुरूपोर्णिमेनिमित्त श्री शनि मंदिरात खिचडी वाटप

 राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुरूपोर्णिमेनिमित्त श्री शनि मंदिरात खिचडी वाटप



*श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीचा उपक्रम*


*परळी/प्रतिनिधी*


वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळी वैजनाथच्या वतीने आज गुरू पोर्णिमे निमित्त भाविकांना खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले. गुरूपोर्णिमेनिमित्त श्रीं च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आज बुधवार दि.13 जुलै रोजी झाली होती. 


श्री भगवान शनैश्वर व वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या प्रतिमेचेही यावेळी अनुष्ठान समितीच्या वतीने पुजन करण्यात आले. गुरू पोर्णिमेच्या अनुषंगाने श्री शनि मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून खिचडी वाटप करण्यात आली. वसुंधरारत्न डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमपुरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ तपोनुष्ठान समितीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित भाविकांनी आपल्या गुरूंचे मनोभावे दर्शन घेत श्रीं चे आशिर्वाद प्राप्त केले. भाविकांनी यावेळी आरती कार्यक्रमातही सहभाग घेतला. 


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परळी येथील 82 व्या श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे, कार्याध्यक्ष शाहूराव ढोबळे, उपाध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर, वैजनाथअप्पा कोल्हे, रमेश सपाटे, वैजनाथ बागवाले, गिरीष बेंबळगे,सचिव संतोष पंचाक्षरी, सोमनाथ निलंगे, वैजनाथअप्पा कोल्हे, नंदकुमार खानापुरे,  अशोक नावंदे, सोमनाथ गोपनपाळे,सदानंद चौधरी, ओमप्रकाश बुरांडे, संजय खाकरे, दयानंद चौधरी, वैजनाथ निलंगे, वैजनाथ शेटे, अ‍ॅड.गिरीष नरवणे, चंदूअप्पा हालगे, मकरंद नरवणे, सचिन काटकर, जगदीश मिटकर,रवी मिसाळ, अरविंद चौधरी, प्रा.अमर आलदे, कैलास रिकीबे, राजाभाऊ हलकंचे, रमेश चौधरी सर, बाबासाहेब शिगे, रमेश काळे, प्रकाश खोत, चंद्रशेखर फुटके, बाबासाहेब चौधरी, विश्वनाथअप्पा लव्हराळे, चंद्रकात अंदुरे, शिवशंकर नाईक,शिरीष सलगरे, अनिल चौधरी, नागेश अलबिदे, मन्मथ नरवणे,शिवदीप चौंडे,संदीप चौधरी,मनोज बेंबळगे, संतोष जुजगर, सतीश कापसे,अशोकअप्पा झाडे,जगदीश महागांवकर, संजय कोरे आदींनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....