परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS - वाढदिवस अभिष्टचिंतन: मी अनुभवलेले आ.धनंजय मुंडे》》》भक्तराम फड यांचा लेख.

 वाढदिवस अभिष्टचिंतन: मी अनुभवलेले आ.धनंजय मुंडे



              


राज्याचे माजी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड  जिल्ह्याचे  माजी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे राजकारण कमी आणी समाजकारण जास्त करणारे बहुजनांचे नेते आहेत. साहेबांच्या समवेत हल्ला बोल याञेनिमित्त याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. महाराष्ट्रात गावोगावी त्याना जो प्रतिसाद मिळत होता यावरून त्यांची लोकप्रियता दिसून येत होती. 

            ज्यावेळेस मला मतदान नव्हते त्यावेळेस पासून मी धनंजय मुंडे यांचा चाहता आहे. मी त्यांचा संघर्ष पाहता होतो. त्यांना जे मिळालय ते खूप संघर्षातुन मिळालेलं आहे. विधान परिषद विरोधपक्षनेते पदी  नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात निवड झाली होती. त्यावेळेस ही मी तिथे होतो. हळूहळू संपर्क वाढत गेला  आणि त्यांंच्यासोबत काम करण्याची संधी भेटु लागली. पुणे येथे आरोग्य विभागामध्ये नौकरी करत आसताना त्यांचे स्नेही मित्र अविनाश भाऊ नाईकवाडे यांचा परिचय झाला आणि त्यांनतर खरं  जवळ जाण्यास सुरुवात झाली . आरोग्य विभागात काम करत आसताना अनेक वेळा  बीड जिल्ह्यातील पेशंट हाँस्पिटलला येत होते. अनेक पेशंट ची आर्थिक परिस्थिती  नसायची त्यावेळी मी साहेबांच्या कानावर ही गोष्ट घालायची. साहेब तात्काळ होईल तेवढी आर्थिक मदत करायचे. अनेकवेळा फोनवर बिल कमी करण्यासाठी सांगायचे. कोवीडच्या काळात तर साहेबांना मी ज्याहीवेळी फोन करील त्या त्यावेळस साहेबांनी फोन उचलून सहकार्य केले आहे. आजही मला ती गोष्ट आठवली  की अंगावर काटा येतो कोवीडच्या काळात परळी मतदार संघातील क महिला होती ती पुर्ण पुणे फिरली पण त्यांना वेटिलेंटर बेड मिळत नव्हता त्यांची आँक्सिजन लेव्हल तर कमी होत होती त्यावेळी त्यांचा मला फोन आला. मी ही सर्व हकिगत साहेबांना रात्री 12.30 सांगितली. साहेबांनी तात्काळ तेथील डिनला फोन करून बेडची व्यवस्था करण्यास सांगितली .अशा अनेक घटना आहेत  ज्या गोष्टींचा मी साक्षीदार आहे. साहेबांनी अनेक जणांचे प्राण वाचवले आहेत.

          परळी त्यांची कर्मभूमी आहे. पण राज्यभर त्यांचे सेवाकार्य चालू असते. असाच एक प्रसंग मी पुण्यात अनुभवला आहे. ना  मुंडे साहेबांनी अनेक गरिबांचे मोफत ऑपरेशन केले आहे. अनेकांना मदत केली आहे. एकदा पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटलमध्ये बीड जिल्ह्य़ातील एक पेशंट उपचार घेत होता. त्याचे सात लाख रुपये बील झाले. गरीब परिसथीमुळे तो एवढे बील भरू शकत नव्हता. ही घटना मी साहेबांच्या कानावर घातली. त्यांनी मला रुग्णालयातील डॉक्टरांचा फोन लावून द्या. मी बोलतो असे म्हणाले. त्या डॉक्टरांना बोलले त्यामुळे सदर रुग्णाचे दोन लाख रुपये बील कमी करून दिले. त्या रुग्णाने साहेबांचे खूप आभार मानले. 

         सर्वसामान्य, गोरगरीब उसतोड कामगारांवर अन्याय, अत्याचार झाला तर ते तात्काळ मदतीला धावतात. पुणे परिसरातील हिंजवडी कासराई येथे जेव्हा ऊसतोड कामगारांच्या मुलीवर बलात्कार झाला. घटना घडल्याचे कळताच सकाळी सात वाजता ऊसाच्या फडात साहेब पोहचले आणी सर्व यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी वेगाने तपास चालू केला.लोकांच्या कामासाठी मी फोन केल्यानंतर त्यांनी आस्थेने चौकशी करून तो प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे माझे आणि साहेबांचे वेगळेच भावनिक नाते जुळले आहे. हजारो कार्यकर्ते असेच त्यांच्याशी जोडले गेले आहेत. 

       परळी तालुक्यात ग्रामीण भागात गावोगावी कार्यकर्त्यांची फळी उभारली. जनतेच्या प्रश्नावर लढे दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बळ दिले. त्याचेच फळ म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, मार्केट कमिटी ताब्यात आली. परळी विधानसभा मतदारसंघातून ऐतिहासिक विजय संपादन केला. सतत गरिबांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या आहेत.धनंजय मुंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

     
        ■

 भक्तराम फड

भोजनकवाडी ता.परळी वै.

         ■


________________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!