पोस्ट्स

कृषी विभागाच्या भूखंडांवर शेतकरी व ग्राहक उपयोगी उपक्रम राबवणार

इमेज
महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे- कृषी मंत्री धनंजय मुंडे कृषी विभागाच्या भूखंडांवर शेतकरी व ग्राहक उपयोगी उपक्रम राबवणार मुंबई दि:8 :शेतकऱ्यांना लागणाऱ्या खते, कीटकनाशक, कृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिनस्त असलेला महामंडळाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीस कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण, उपमहाव्यवस्थापक सुरेश सोनवणे, सुजित पाटील, ज्योती देवरे, महेंद्र बोरसे, महेंद्र धांडे देवानंद दुथडे, गणेश पाटील यांच्यासह महामंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. महामंडळाची 13 विभागीय कार्यालये आणि 10 उत्पादन घटक कार्यरत आहेत. त

जिल्हानिहाय सविस्तर माहिती.....

इमेज
  जाणून घ्या सविस्तर तपशील:  महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषद पदभरती महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रमांक प्रनिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३- अ दिनांक ४ मे २०२२. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२२/प्र.क्र.११/आस्था-८ दिनांक १० मे २०२२ महाराष्ट्र शासन वित्त विभागाचे शासन निर्णय क्रमांक पदनि २०२२/प्र.क्र.२/२०२२/आ.पु.क. दिनांक ३० सप्टेंबर २०२२, महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचे शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२२/ प्र.क्र.११/आस्था-८ दिनांक २१ ऑक्टोबर २०२२, महाराष्ट्र शासन, वित्त विभागाकडील शासन निर्णय क्र. पदनि २०२२/प्र.क्र.२०/२०२२/आ.पु.क. दि. ३१ ऑक्टोबर २०२२. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचे शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र. ११/आस्था-८ दिनांक १५ नोव्हेंबर २०२२. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक प्रानिमं १२२२/ प्र.क्र. १३६/का- १३ ब दिनांक २१ नोव्हेंबर २०२२, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. बीसीसी २०१८ / प्र.क्र.४२७/१६-ब, दि. १० मे २०२३, महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभागा

आंदोलन: न्याय्य मागण्या :सहभागी व्हा

इमेज
  आशा वर्कर्स व गटप्रवर्तकाचा वतीने 9 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा परळी वैजनाथ: बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा  परिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या  मोर्चात आशा वर्कर्स व गटप्रवर्तक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत अशी माहिती संघटनेचे नेते प्रा.बी.जी खाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.           १. आशा व गटप्रवर्तकांना दिपावली भाउबीज म्हणून आशांना रू.१०,०००/- व गटप्रवर्तकांना रु.१५,०००/- भाउबीज देण्यात यावी. २. परळी तालुक्यातील आशांचा केंद्र सरकारचा कोवीड भत्ता ऑक्टोंबर २१ ते मार्च २०२२ सहामहिण्याचे रू.६०००/- देण्यात यावे. ३. आशा व गटप्रवर्तकाची नियुक्ती कामावर आधारीत मोबदल्यावर असल्यामुळे त्यांना कामाची सक्ती करू नये.४. आशाना कामे केल्याचे फोटो टाकायची सक्ती करू नये. ५. आशांना पी.एच.सी. मध्ये सर्व सुविधा पूरविण्यात याव्या.(उदा.- रूम टेबल, स्वच्छता गृह, साहित्य इ.)६. आशांना व गटप्रवर्तकांना ऑनलाईन ची कामे सांगताना ऑनलाईन साठी लागणारे साहित्य पूरविण्यात यावे व ऑनलाईनचा मोबदला देण्यात यावा.७. ज्या सर्वेचा अल्प मोबदला मिळत अ

विविध नागरी समस्यांबाबत शिष्टमंडळाने केली चर्चा

इमेज
  नागरी समस्या: विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने घेतली नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांची भेट परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील वेगवेगळ्या नागरी सम्यस्यांबाबत विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने  नगर परिषद मुख्यधकारी त्र्यंबक कांबळे यांनी भेट घेऊन चर्चा केली. यात प्रामुख्याने भाजीपाला व फळ विक्रेत्यांना शहरातील विविध भागांत सर्व मूलभूत सुविधांसह जागा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले. संभाजी ब्रिगेड, शिवसेना (उबाटा) काँग्रेस आय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गट, वंचित बहुजन आघाडी, एम आय एम, आणि माकप या पक्षाच्या शिष्टमंडळाने आज भेट मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन परळी शहराचा विस्तार व लोकसंख्या विचारात घेता फळ व भाजी मार्केट एका जागेवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर शहराच्या विविध भागात जसे की छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स मागील जागा, खाडी नाली वरील कॉम्प्लेक्स, गोपाल टॉकीच्या पाठीमागील जागा व महात्मा ज्योतिबा फुले मार्केटचे पुनरुज्जीवन करून या जागेत भाजीपाला व फळ विक्रेत्यांना सर्व सोयी उपलब्ध करून देऊन त्यांना तिथे विक्रीसाठी परवानगी

विविध पक्षांच्यावतीने कृ.ऊ.बा. समिती समोर तीव्र आंदोलनाचा इशारा

इमेज
  भाजी व फळ विक्रेते स्थलांतर प्रश्न : विविध पक्षांच्या शिष्टमंडळाचे  बाजार समितीला निवेदन  भाजी व फळ विक्रेत्यांना एकत्र बसवण्यात यावे अन्यथा भाजीविक्रेत्यांसह विविध पक्षांच्यावतीने कृ.ऊ.बा. समिती समोर तीव्र आंदोलनाचा इशारा परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते यांना सर्व सुविधायुक्त जागेत एकाच ठिकाणी बसवून नागरिकांची गैरसोय टाळावी म्हणून विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान मुंडेंना निवेदन दिले. यावेळी 'दोन दिवसांत भाजी व फळ विक्रेते यांना सुविधा देऊन एकत्र बसवणार' असे आश्वासन सभापती सूर्यभान मुंडेंनी दिले. संभाजी ब्रिगेड, शिवसेना (उबाटा) काँग्रेस आय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गट एम आय एम, वंचित बहुजन आघाडी, आणि माकप या पक्षाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात "परळी शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना स्थलांतरित करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वे नं - 499 या जागेत बसवले आहे.फळ विक्रेत्यांना मात्र मोंढा मार्केट मध्येच बसवले आहे. भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते हे एकाच ठिकाणी अस
इमेज
वसंतनगरच्या 48 कुटुंबांचा 65 वर्षांपासूनचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लावू- कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले अश्वासन परळी वैजनाथ, प्रतिनिधी....तालुक्यातील वसंतनगरच्या 48 कुटुंबांचा वारसाहक्काने जमीनी नावावर करण्याचा  65 वर्षांपासूनचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लावू असे अश्वासन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे.        वसंतनगर तांडा येथील गट क्र 478/466/ 468/469 मधील जमीनी वारसाच्या नावे होणे बाबत निवेदन देण्यात आले असुन जिल्हाधिकारी पत्र क्र-93/आर बी/ एल एन डी/1-59 जिल्हाधिकार्यालय बीड दि.13-11-2003 च्या पत्रा आधारे या जमीनीवर वारसांची नावे लावावीत अशी मागणी आहे. सर्व 48 सभासद वसंत नगर तांडा तालुका परळी जिल्हा बीड येथील रहिवासी असून प्रत्येक कुटुंबास दहा (10) एकर याप्रमाणे 48 कुटुंबांना जमीन मिळालेली आहे त्या जमिनीच्या आदेश क्र.93 वाटप सन 1961-62 या वर्षात मिळाली असून आज रोजी 48 सभासदांपैकी 90 टक्के सभासद मयत असून सदरील जमीन ही कायद्याने आम्ही वारस आहोत तरी सदरील जमिनी ही वारसा लावून द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले.यावर तात्काळ त

स्व. अशोक सामत यांची जयंती:अनेकांनी दिला आठवणींना उजाळा

इमेज
 स्व. अशोक सामत यांची जयंती:अनेकांनी दिला आठवणींना उजाळा परळी वैजनाथ,प्रतिनिधी..... माजी नगराध्यक्ष, भाजपा जेष्ठ नेते स्व. अशोक सामत यांच्या 75 व्या जयंतीनिमित्ताने गणेशपार येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विविध मान्यवरांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.            स्व अशोक सामत म्हणजे, शहरातील सर्व घटकांना एकत्रित करून, समाजकारण, राजकारण करणारे व्यक्तीमत्व होते, त्यांनी नेहमीच पक्षविरहित मानवतावादी दृष्टिकोन ठेवून राजकारण केले,त्यामुळे आज देखील त्यांचे नाव अतिशय आदरानं घेतलं जातं, असे गौरवोद्घार श्री वैद्यनाथ देवस्थानचे विश्वस्त राजेश देशमुख यांनी केले. जेष्ठ नेते दतप्पा इटके गुरुजी यांनी स्व अशोक सामत यांच्या सोबतच्या कारकिर्दीवर संक्षिप्त दृष्टिकोनातून आठवणीला उजाळा दिला. भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे नेते अब्दुल करीम यांनी आपल्याला स्व. सामत यांनी नगराध्यक्ष पदाची संधी दिल्याची आठवण सांगितली. भाजपा दलित आघाडीचे शहराध्यक्ष रमेश गायकवाड यांनी स्व. अशोकसेठ सामत यांच्याकडून  विविध अडचणीत मोलाची मदत झाल्याचे सांगितले.   शहरातील गणेशपार भागातील श्री सावळाराम मंदि

धारुर:पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात

इमेज
  मोबाईल स्टेटसला औरंगजेबचा फोटो व मजकुरामुळे वाद पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात धारूर, प्रतिनिधी.... धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील केज तालुक्यातील आडस येथे 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी शेख अरबाज याने आपल्या मोबाईलवर औरंगजेब चा फोटो किंग व खाली मजकूर लिहिल्याने धर्मियांच्या भावना दुखावल्या प्रकरणी दोन समाजामध्ये वाद  होऊन एकमेकावर दगड फेकण्याचा प्रकार आडस येथे झाला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद आटोक्यात आणला वादात तीन जण जखमी झाल्याचा प्रकार घडला यावरून पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत मस्के यांच्या फिर्यादी वरून दोन्ही समाजातील 25 ते 30 जनावर धारूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून त्यातील 14 युवकांना अटक करण्यात आली आहे         धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील केज तालुक्यातील आडस येथे पाच ऑगस्ट रोजी गावातील अरबाज शेख याने आपल्या मोबाईलवर औरंगजेब चा फोटो व त्यावर किंग व खाली मजकूर "इतिहास गवाह है जिसकी बरबादी की नही जा सकती उसकी बदनामी की जाती है " अशा आशयाचे मजकूर लिहून स्टेटस ठेवण्यात आले हे स्टेटस पाहीन गावातील युवक हे स्टेटस पाहून मुले त्याच्या घरी जाऊन याव

मोठा कार्यक्रम पण नियोजनशून्यतेने केला खेळखंडोबा

इमेज
परळी वैजनाथ रेल्वे प्रशासनाचे नियोजन उतरले पटरीवरून अमृत भारत योजनेच्या शिलान्यास कार्यक्रमाचे नियोजन पूर्णतः बारगळलेले दिसून आले. महत्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजनेच्या पायाभरणीचा कार्यक्रम रविवार ६ ऑगस्ट २०२३ रोजी संपन्न झाला. मात्र, यात सर्व शिष्टाचार धाब्यावर बसवण्यात कोणतीही कसर रेल्वे प्रशासनाने सोडली नाही. राज्यसभेच्या खा. रजनी पाटील आणि तब्बल २० लाख जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खा. प्रितम मुंडे यांचे नावं चक्क आपापल्या पदाचा कार्यकाळ संपलेल्या शिवकन्या शिरसाट (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बीड, त्यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये समाप्त झाला) तसेच सरोजिनी हलगे (माजी नगराध्यक्ष परळी वैजनाथ, त्यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२१ मध्ये समाप्त झाला) यांच्या नंतर शिलान्यास फलकावर होते. विशेष म्हणजे माजी नगराध्यक्ष यांचा उल्लेख महापौर असा केलेला आहे. चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित असणाऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमात हे घडल्याचे कसलेही वैषम्य रेल्वे प्रशासनास नाही. कार्यकाळ संपलेल्या व्यक्तींच्या नावांना प्राधान्य देण्यात रेल्वे प्रशासनाने का धन्यता मानली अस

स्व. अशोक सामत यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम- अश्विन मोगरकर

इमेज
  स्व. अशोक सामत यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम- अश्विन मोगरकर  परळी वैजनाथ, माजी नगरअध्यक्ष, वैद्यनाथ बँकेचे माजी चेअरमन स्व.अशोक सामत यांच्या जयंतीनिमित्त उद्या सोमवार दि 7 ऑगस्ट रोजी श्री सावळाराम मंदिर, गणेशपार येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. परळीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या स्व.अशोक सामत यांची  7 ऑगस्ट जयंती दिन आहे. सोमवार दि 7 ऑगस्ट रोजी स्व. अशोक  सामत यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त श्री सावळाराम मंदिर, गणेशपार येथे सकाळी 9.30 वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी स्व. अशोक सामत यांच्या सोबत विविध क्षेत्रात काम केलेले अनेक सन्माननीय व्यक्ती त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अश्विन मोगरकर, मुकेश पाटील व विजय जोशी यांनी केले आहे.  ••• VIDEO NEWS GALLERY   ••• VIDEO NEWS GALLERY 

नगर-बीड-परळी रेल्वेला लवकरच परळीतून झेंडा दाखवू ; खा.प्रितमताई मुंडे

इमेज
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला परळी रेल्वेस्थानक नूतनीकरणाचा शुभारंभ अमृत भारत योजनेतून देशाची संस्कृती आणि स्थानिक इतिहासाचे प्रतिबिंब दिसणार : प्रधानमंत्री मोदी नगर-बीड-परळी रेल्वेला लवकरच परळीतून झेंडा दाखवू ; खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केला विश्वास परळी | दि ०६. | अमृत भारत योजनेअंतर्गत विकसित होणारे रेल्वेस्थानक हे आधुनिक आकांक्षा आणि स्थानिक संस्कृतीचे प्रतिक म्हणून ओळखले जाईल. या रेल्वेस्थानकांच्या माध्यमातून आपल्या देशाची संस्कृती आणि स्थानिक इतिहासाचे प्रतिबिंब देखील देशाला दिसणार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. परळीसह देशातील पाचशे आठ रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजने अंतर्गत नूतनीकरणाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. केंद्र सरकारच्या अमृत भारत योजने अंतर्गत परळी रेल्वेस्थानकाच्या चोवीस कोटी पस्तीस लक्ष रुपयांच्या नूतनीकरणाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, रेल्वेचे मुख्य अभि

रेल्वेच्या जिव्हाळ्याच्या मागण्या....

इमेज
 'अमृत भारत स्टेशन' योजने बरोबर नवीन रेल्वे सेवा सुरु करुन इतर प्रमुख मागण्या देखील रेल्वे प्रशासनाने मंजुर कराव्यात-चंदुलाल बियाणी परळी ........ 'अमृत भारत स्टेशन स्कीम' अंतर्गत परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणार असून त्या कामाचे भूमीपूजन मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीने रविवारी सकाळी 11:00 वाजता होत आहे. पुनर्विकास योजनेनुसार परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा कायापालट होऊन ते अधिक अद्ययावत व सुशोभित होणार आहे. याबद्दल माननीय पंतप्रधान, श्री नरेंद्रजी मोदी, मा. रेल्वे मंत्री ना. श्री अश्विनी वैष्णव, मा. रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब पाटील दानवे, मा.रेल्वे राज्यमंत्री ना. दर्शनाजी जरदोश, बीडच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे इत्यादींचे परळी रेल्वे संघर्ष समिती जाहीर आभार मानते. या पुनर्विकासा सोबतच खालील काही महत्त्वाच्या, योग्य व बहुप्रलंबित मागण्या देखील रेल्वे प्रशासनाने त्वरित मंजूर कराव्यात अशी या परिसरातील जनतेची रास्त अपेक्षा आहे. विकाराबाद-परळी वैजनाथ आणि परभणी- परळी वैजनाथ हे दोन रेल्वे मार्ग स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित

पुन्हा संसदेत राहुल गांधींचा आवाज बुलंद होणार-बहादुरभाई _

इमेज
  सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधींना मोठा दिलासाःपरळी काँग्रेस पक्षाकडून आनंदोत्सव पुन्हा संसदेत राहुल गांधींचा आवाज बुलंद होणार-बहादुरभाई  परळी, प्रतिनिधी....            मोदी आडनावाची मानहानी केल्या प्रकरणी काँग्रेसनेते राहुल गांधी यांना गुजरातच्या उच्च न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना मोठा दिलासा दिल्याने परळीत काँग्रेस पक्षाच्या वतिने शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडुन व पेठे वाटुन आंनदोत्सव साजरा करण्यात आला. या खटल्यामुळे लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे त्यामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असुन पुन्हा खा.राहुल गांधीचा आवाज संसदेत बुलंद होणार असल्याने काँग्रेस पक्षाच्या वतिने परळी शहरातील काँग्रेस पक्षाच्या सर्व आघाडी प्रमुखानी एकञ येत  शहरातुन मोटार सायकल  रॕली काढत छ.शिवाजी महाराज,राणी लक्ष्मीबाई टावर येथे राहुल गांधी तुम आ
इमेज
  शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी खरीप व रब्बी पेरणीसाठी हेक्टरी २५ हजार रुपये आर्थिक मदत करा-वसंत मुंडे  परळीवैजनाथ(प्रतिनिधी) महाराष्ट्र मधील शेतकरी हा निसर्गावर अवलंबून आसुन सतत पाऊस वेळेवर न पडत गेल्यामुळे पेरणीला विलंब होतो. प्रत्येक वर्षी बोगस खते बी बियाणे कीटकनाशके औषधी पुरवठा विक्रेत्यामार्फत केल्यामुळे दुहेरी पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यावर येते.शासनाचे कोणते कृषी अधिकारी बोगस लायसन देतात त्यावर शासन कंपनी व त्या अधिकाऱ्यावर का कारवाई करीत नाही याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली. महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांनी जास्त आत्महत्या केल्या असून संपूर्ण मुद्देनिहाय चौकशी करून शासन स्तरावर योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी शासनाची आहे. पेरणीपूर्वी शेतकऱ्याला खरीप व रब्बी पीक पेरणीसाठी हेक्‍टरी २५ हजार रुपयाची आर्थिक मदत प्रत्येक वर्षी बी बियाणे औषधी खते शेतीतील नियमित कामे करण्यासाठी मदत करणे काळाची गरज आहे. शासन स्तरावर पिक विमा व अतिवृष्टीचे अनुदान हे विविध निकषाखाली डावलून शेतकऱ्यांना सहकार्याची भावना पिक

सर्वांनी मिळून ठरवली पुढील रणनीती

इमेज
विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली भाजीपाला विक्रेत्यांशी चर्चा सर्वांनी मिळून ठरवली पुढील रणनीती परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या स्थलांतर प्रश्नी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भाजीपाला विक्रेत्यांशी भेटून चर्चा केली. त्यांचे प्रश्न जाणून घेतल्यावर सर्वांनी मिळून पुढील रणनीती ठरवली. यात प्रामुख्याने भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते यांना एकाच ठिकाणी व्यवसायाची व्यवस्था करून द्यावी असे ठरले. यात प्रामुख्याने शेड, बसायला ओटे, पिण्याच्या पाण्याची सोय,दिवाबत्ती,  स्वच्छता गृह, सुरक्षा अश्या मूलभूत सुविधा बाजार समितीने उपलब्ध करून द्याव्यात असे ठरले. कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला व फळ विक्रेत्यांकडून दररोज २० रुपये प्रमाणे कर वसूल करते. मात्र कोणत्याही सुविधा भाजीपाला व फळ विक्रेत्यांना मिळत नाहीत त्या सुविधा उपलब्ध होईपर्यंत सोमवार दि. ७ ऑगस्ट २०२३ पासून कोणत्याही भाजीपाला व फळ विक्रेत्यांकडून 'ते' २० रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीने वसूल करू नयेत. यासोबतच गांधी मार्केमधील महात्मा फुले भाजी मंडईचे पुनरुज्जीवन करणे, खाडी नाल्यावरील जागेच
इमेज
  परळीत उद्या शासन आपल्या दारी आणि मराठवाडा मुक्ति संग्राम अमृतमहोत्सवी वर्ष सन-२०२३ महसुल सप्ताह समारोप कार्यक्रम परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        बीड जिल्हा प्रशासनाकडून  परळीत उद्या रविवारी  (दि.६) शासन आपल्या दारी आणि मराठवाडा मुक्ति संग्राम अमृतमहोत्सवी वर्ष सन-२०२३ महसुल सप्ताह समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास कृषीमंत्री धनंजय मुंडे,खा.डॉ.प्रितम मुंडे उपस्थित राहणार आहेत.          रविवार, दि. ६ ऑगस्ट २०२३ वेळ : दुपारी ३:०० वाजता ठिकाण : हालगे गार्डन, परळी वैजनाथ येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासन आपल्या दारी आणि मराठवाडा मुक्ति संग्राम अमृतमहोत्सवी वर्ष सन-२०२३ महसुल सप्ताह समारोप कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी - बीड श्रीमती दिपा मुधोळ मुंडे (भा.प्र.से.) या राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मंत्री धनंजय मुंडे, बीड लोकसभा मतदारसंघाच्या खा.डॉ.प्रितम मुंडे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.  ••• VIDEO NEWS GALLERY   ••• VIDEO NEWS

दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली

इमेज
  गोविंद मुंडे यांना मातृशोक: सुमित्राबाई बालाजी मुंडे यांचे  निधन परळी (प्रतिनिधी):- खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन तथा माजी नगरसेवक गोविंद बालाजी मुंडे यांच्या मातोश्री सुमित्राबाई बालाजी मुंडे यांचे वर्धापकाळाने दि.4ऑगस्ट 2023 रोजी  निधन झाले. सायंकाळी 5.30 वा. त्यांची प्राणज्योत शिवाजीनगर येथील निवासस्थानी मालवली.मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षे होते. सुमित्राबाई बालाजी मुंडे यांच्या पार्थिवदेहावर दि. 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8 वैद्यनाथ मंदिर जवळील स्मशानभुमी  येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्या धार्मिक कार्यात हिरीरीने सहभाग घेत होत्या. तसेच पंढरपूर, आळंदी  वारीही त्या नित्यनेमाने करीत असत.अत्यंत मनमिळावू व मायाळू असा त्यांचा स्वभाव होता त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.मुंडे कुटुंबीयांच्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

धनंजय मुंडेंनी यासंदर्भात मांडली एकूण पाच विधयेके

इमेज
  बोगस बियाणे, खते व कीटकनाशके तसेच शेतकऱ्यांची फसवणूक यावर आळा घालणारे विधेयक धनंजय मुंडेंनी केले विधानसभेत सादर धनंजय मुंडेंनी यासंदर्भात मांडली एकूण पाच विधयेके अधिवेशनाच्या सुरुवातीला धनंजय मुंडेंनी केली होती घोषणा मुंबई (दि. 04) - राज्यात बोगस व अप्रमाणीत बियाणे, खते तसेच कीटकनाशके यांच्या निर्मिती व विक्रीवर आळा घालणे तसेच यासंदर्भात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक यावर प्रतिबंध घालून शेतकऱ्यांना अशी फसवणूक झाल्यास अर्थसहाय्य मिळवून देणे यासंदर्भात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत विधेयक सादर केले.  यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी एकूण 5 विधेयके विधानसभेत सादर केली आहेत. यामध्ये महाराष्ट्र भेसळयुक्त, अप्रमाणित किंवा गैर छापाची बियाणे, खते किंवा कीटकनाशके यांच्या विक्रीमुळे झालेल्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी विधेयक - 2023, महाराष्ट्र कीटकनाशके कायदा 1968 मध्ये सुधारणा विधेयक - 2023, महाराष्ट्र बियाणे अधिनियम 1966 मध्ये सुधारणा विधेयक - 2023, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मध्ये सुधारणा करणे याचबरोबर महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हात भट्टीवाले, औषधी द्र
इमेज
 प्रा. मधुकर शिंदे महाराष्ट्र समता गौरव पुरस्काराने होणार सन्मानित परळी वैजनाथ दि.०४ (प्रतिनिधी)          शहरातील विश्वमंगल फांऊंडेशनचे सचिव प्रा. मधुकर शिंदे यांना जनहित फांऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र समता गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला असून ९ आँगस्ट क्रांतीदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार असल्याचे जनहित फांऊंडेशनच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.      परभणी येथे ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिवसाचे औचित्य साधून जनहित फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्र समता गौरव पुरस्कार वितरण सोहळा हॉटेल विसावा कॅफे पार्क परभणी येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा विनोद सम्राट विजय पाटकर, उद्घाटक माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री गणेशराव दुधगावकर, अँटी करप्शन कमिटीचे रवींद्र दिवेदी, खासदार संजय जाधव,आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राहुल पाटील, विशेष सत्कार मूर्ती परभणीचे जिल्हाधिकारी श्री गावंडे, पोलीस अधीक्षक आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सर्वांच्या प्रमुख उपस्थिती
इमेज
  गेवराई शहरातील ज्येष्ठ नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात-अनिल बोर्डे गेवराई, (प्रतिनिधी)- गेवराई शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांबाबत ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने येथील ग्राहक पंचायतचे ज्येष्ठ कार्यकर्ते व बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी अशासकीय सदस्य अनिल बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार व नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे. गेवराई शहरातील ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना नगरपरिषदेमार्फत एक गाळा किंवा हॉल उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी निवेदन देऊन प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली होती. परंतु अद्यापपर्यंत हॉल किंवा गाळा उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन मागणीची पूर्तता करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. दिवसेंदिवस गेवराई शहराचा विस्तार चोहोबाजूंनी झपाट्याने होत आहे. प्रत्येक वार्डात ज्येष्ठ नागरिक व अपंगांना बसण्यासाठी बेंच उपलब्ध नाहीत तसेच शास्त्री चौक, कोल्हेर रोड, ताकडगाव रोड आदी महत्त्वाच्या ठिकाणी बसण्यासाठी बेंच किंवा खाली बसण्याची व्य