इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

वसंतनगरच्या 48 कुटुंबांचा 65 वर्षांपासूनचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लावू- कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले अश्वासन

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....तालुक्यातील वसंतनगरच्या 48 कुटुंबांचा वारसाहक्काने जमीनी नावावर करण्याचा  65 वर्षांपासूनचा प्रलंबीत प्रश्न मार्गी लावू असे अश्वासन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

       वसंतनगर तांडा येथील गट क्र 478/466/ 468/469 मधील जमीनी वारसाच्या नावे होणे बाबत निवेदन देण्यात आले असुन जिल्हाधिकारी पत्र क्र-93/आर बी/ एल एन डी/1-59 जिल्हाधिकार्यालय बीड दि.13-11-2003 च्या पत्रा आधारे या जमीनीवर वारसांची नावे लावावीत अशी मागणी आहे. सर्व 48 सभासद वसंत नगर तांडा तालुका परळी जिल्हा बीड येथील रहिवासी असून प्रत्येक कुटुंबास दहा (10) एकर याप्रमाणे 48 कुटुंबांना जमीन मिळालेली आहे त्या जमिनीच्या आदेश क्र.93 वाटप सन 1961-62 या वर्षात मिळाली असून आज रोजी 48 सभासदांपैकी 90 टक्के सभासद मयत असून सदरील जमीन ही कायद्याने आम्ही वारस आहोत तरी सदरील जमिनी ही वारसा लावून द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले.यावर तात्काळ तहसीलदार यांना सूचना देत हा प्रश्न लवकर मार्गी लावावे असे निर्देश दिले.यावेळी सरपंच विजय राठोड, उपसरपंच कुंडलिक जाधव, संजय राठोड, भगवान जाधव, रमेश राठोड, राजू राठोड, बालू राठोड, अजय राठोड, अर्जुन राठोड, करण राठोड, पवन राठोड, ज्ञानोबा चव्हाण, रावसाहेब चव्हाण आदी उपस्थितीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!