इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

विविध पक्षांच्यावतीने कृ.ऊ.बा. समिती समोर तीव्र आंदोलनाचा इशारा

 भाजी व फळ विक्रेते स्थलांतर प्रश्न : विविध पक्षांच्या शिष्टमंडळाचे  बाजार समितीला निवेदन

 भाजी व फळ विक्रेत्यांना एकत्र बसवण्यात यावे अन्यथा भाजीविक्रेत्यांसह विविध पक्षांच्यावतीने कृ.ऊ.बा. समिती समोर तीव्र आंदोलनाचा इशारा


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते यांना सर्व सुविधायुक्त जागेत एकाच ठिकाणी बसवून नागरिकांची गैरसोय टाळावी म्हणून विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान मुंडेंना निवेदन दिले. यावेळी 'दोन दिवसांत भाजी व फळ विक्रेते यांना सुविधा देऊन एकत्र बसवणार' असे आश्वासन सभापती सूर्यभान मुंडेंनी दिले.


संभाजी ब्रिगेड, शिवसेना (उबाटा) काँग्रेस आय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गट एम आय एम, वंचित बहुजन आघाडी, आणि माकप या पक्षाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात "परळी शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना स्थलांतरित करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वे नं - 499 या जागेत बसवले आहे.फळ विक्रेत्यांना मात्र मोंढा मार्केट मध्येच बसवले आहे. भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते हे एकाच ठिकाणी असावेत त्याचे कारण म्हणजे शहरातील फळ खरेदी व भाजी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला व वयोवृद्ध नागरिक येत असतात.सध्या भाजीपाला विक्री व फळ विक्री करणाऱ्या व्यापारपेठेत एक ते दीड किलोमीटरचे अंतर असून पायी चालत आलेल्या महिला व जेष्ठ नागरिकांना भाजीपाला आणि फळ दोन्ही खरेदी साठी एक ते दीड किलोमीटरचे अंतर चालत जावे लागत आहे.


नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी भाजी व फळ विक्रेते एकच ठिकाणी बसवावेत ज्या जागेमध्ये लाईट,शौचालय, पाण्याचा हौद, पिण्याच्या पाण्याची सोय, शेड व ओटे, सुरक्षा यासह सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावी.


     तत्काळ भाजी व फळ विक्रेत्यांना एकत्र बसवण्यात यावे अन्यथा भाजीविक्रेत्यांसह विविध पक्षांच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी संभाजी ब्रिगेड ,शिवसेना (उबाटा), काँग्रेस आय ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,एम आय एम ,वंचित बहुजन आघाडी आणि माकप या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!