इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

आंदोलन: न्याय्य मागण्या :सहभागी व्हा

 आशा वर्कर्स व गटप्रवर्तकाचा वतीने 9 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा


परळी वैजनाथ: बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा  परिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. या  मोर्चात आशा वर्कर्स व गटप्रवर्तक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत अशी माहिती संघटनेचे नेते प्रा.बी.जी खाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 


         १. आशा व गटप्रवर्तकांना दिपावली भाउबीज म्हणून आशांना रू.१०,०००/- व गटप्रवर्तकांना रु.१५,०००/- भाउबीज देण्यात यावी. २. परळी तालुक्यातील आशांचा केंद्र सरकारचा कोवीड भत्ता ऑक्टोंबर २१ ते मार्च २०२२ सहामहिण्याचे रू.६०००/- देण्यात यावे. ३. आशा व गटप्रवर्तकाची नियुक्ती कामावर आधारीत मोबदल्यावर असल्यामुळे त्यांना कामाची सक्ती करू नये.४. आशाना कामे केल्याचे फोटो टाकायची सक्ती करू नये. ५. आशांना पी.एच.सी. मध्ये सर्व सुविधा पूरविण्यात याव्या.(उदा.- रूम टेबल, स्वच्छता गृह, साहित्य इ.)६. आशांना व गटप्रवर्तकांना ऑनलाईन ची कामे सांगताना ऑनलाईन साठी लागणारे साहित्य पूरविण्यात यावे व ऑनलाईनचा मोबदला देण्यात यावा.७. ज्या सर्वेचा अल्प मोबदला मिळत असेल त्या सर्वेची आशांना सक्ती करू नये.८. केज तालुक्यात सी. एच.ओ. नाहीत त्या ठिकाणचे आरोग्यवर्धीनी चा मोबदला थकित आहे तो देण्यात यावा.९. गटप्रवर्तकांना प्रत्येक सर्वेचा सुपर व्हिजनसाठीचा प्रतिदिनचा मोबदला देण्यात यावा. १०. आरोग्य खात्याशी निगडीत नसलेले कामे आशांना व गटप्रवर्तकांना सांगू नयेत आदी प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

          या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बीड जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरे,कार्याध्यक्ष सुभाष डाके, कोषाध्यक्ष सुवर्णा रेवले, सरचिटणीस किरण सावजी,उपाध्यक्ष उषा खाडे अर्चना पांचाळ, सहचिटणीस  उर्मिला शेंडगे,सदस्यअनिता चाटे, रामकुंवर कोथींबीरे, सविता होके,प्रशांत मस्के, निर्मला भागवत, छाया पोटभरे,उर्मिला जोगदंड, शेख शबाना,हेमा काळे,ओम पुरी,सलमा अन्सारी, भारती राख,सुनिता होळंबे,सावित्रा कदम,उषा औसे, आशा मुंडे आशा लांडगे, फरजाना शेख , लता आघाव, अर्चना मस्के ,उमा वाघमारे, आशा देशमुख, राजश्री थावरे, अनिता गिराम आदींनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या