विविध नागरी समस्यांबाबत शिष्टमंडळाने केली चर्चा

 नागरी समस्या: विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने घेतली नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांची भेट



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शहरातील वेगवेगळ्या नागरी सम्यस्यांबाबत विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने  नगर परिषद मुख्यधकारी त्र्यंबक कांबळे यांनी भेट घेऊन चर्चा केली. यात प्रामुख्याने भाजीपाला व फळ विक्रेत्यांना शहरातील विविध भागांत सर्व मूलभूत सुविधांसह जागा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले.


संभाजी ब्रिगेड, शिवसेना (उबाटा) काँग्रेस आय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गट, वंचित बहुजन आघाडी, एम आय एम, आणि माकप या पक्षाच्या शिष्टमंडळाने आज भेट मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन परळी शहराचा विस्तार व लोकसंख्या विचारात घेता फळ व भाजी मार्केट एका जागेवर उपलब्ध आहे. त्याचबरोबर शहराच्या विविध भागात जसे की छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स मागील जागा, खाडी नाली वरील कॉम्प्लेक्स, गोपाल टॉकीच्या पाठीमागील जागा व महात्मा ज्योतिबा फुले मार्केटचे पुनरुज्जीवन करून या जागेत भाजीपाला व फळ विक्रेत्यांना सर्व सोयी उपलब्ध करून देऊन त्यांना तिथे विक्रीसाठी परवानगी देऊन परळीतील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी. जेणे करून त्या त्या परिसरातील नागरिकांना भाजी /फळ खरेदी कमी वेळेत व कमी मेहनती मध्ये मिळेल. अन्यथा विविध पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

विविध नागरी समस्यांबाबत शिष्टमंडळाने केली चर्चा

राष्ट्रमाता जिजामाता उद्यानातील स्वच्छता गृह तत्काळ सुरू करणे. उद्याना समोर वाहन पार्किंगमुळे होणाऱ्या वाहतूक समस्येवर तोडगा काढणे. राणी लक्ष्मीबाई टॉवर ते एकमिनार मस्जिद या संपूर्ण स्टेशन रोडवरील दोन्ही बाजूच्या फुटपाथवरील अतिक्रमण काढून लोकांना चालायला जागा उपलब्ध करणे, तसेच जड वाहनांना प्रवेश बंदी करणे आदी विषयांवर विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने नगर परिषद मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्यासोबत चर्चा केली. लवकरात लवकर समस्यांचे निराकरण करू असे आश्वासन यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी संभाजी ब्रिगेड, शिवसेना (उबाटा), काँग्रेस आय ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गट, एम आय एम,वंचित बहुजन आघाडी आणि माकप या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळास दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !