इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

स्व. अशोक सामत यांची जयंती:अनेकांनी दिला आठवणींना उजाळा

 स्व. अशोक सामत यांची जयंती:अनेकांनी दिला आठवणींना उजाळा



परळी वैजनाथ,प्रतिनिधी.....

माजी नगराध्यक्ष, भाजपा जेष्ठ नेते स्व. अशोक सामत यांच्या 75 व्या जयंतीनिमित्ताने गणेशपार येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विविध मान्यवरांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

           स्व अशोक सामत म्हणजे, शहरातील सर्व घटकांना एकत्रित करून, समाजकारण, राजकारण करणारे व्यक्तीमत्व होते, त्यांनी नेहमीच पक्षविरहित मानवतावादी दृष्टिकोन ठेवून राजकारण केले,त्यामुळे आज देखील त्यांचे नाव अतिशय आदरानं घेतलं जातं, असे गौरवोद्घार श्री वैद्यनाथ देवस्थानचे विश्वस्त राजेश देशमुख यांनी केले. जेष्ठ नेते दतप्पा इटके गुरुजी यांनी स्व अशोक सामत यांच्या सोबतच्या कारकिर्दीवर संक्षिप्त दृष्टिकोनातून आठवणीला उजाळा दिला. भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे नेते अब्दुल करीम यांनी आपल्याला स्व. सामत यांनी नगराध्यक्ष पदाची संधी दिल्याची आठवण सांगितली. भाजपा दलित आघाडीचे शहराध्यक्ष रमेश गायकवाड यांनी स्व. अशोकसेठ सामत यांच्याकडून  विविध अडचणीत मोलाची मदत झाल्याचे सांगितले. 

 शहरातील गणेशपार भागातील श्री सावळाराम मंदिरात स्व अशोक सामत यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी शंकरअप्पा मोगरकर, वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत, माजी नगराध्यक्ष  वैजनाथ जगतकर, जाबेर खान, नरेश हालगे, प्रकाश जोशी, अनिल तांदळे, नारायणराव सातपुते, दासू वाघमारे, महेश्वर निर्मळे, राजेंद्र ओझा, वासुदेव पाठक, महादेव ईटके, वैजनाथ बागवाले, वैजनाथ माने, वैजनाथ कळसकर, बालासाहेब कराळे, रोहिदास बनसोडे, गणपत सौंदळे,  नितीन समशेट्टी, मोहन जोशी, डॉ यशवंत देशमुख, अतुल तांदळे, विकास हालगे, सुशील हरंगुळे, चंद्रकांत उदगिरकर, खदीर भाई, फरीद नवाब, भगवान हालगे, नरेश पिंपळे, गजानन चौंडे, कृष्णा सातपुते सोनपेठकर, पवन तोडकरी, प्रकाश गित्ते, अमर वाघमारे यांच्यासह ईतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला, कार्यक्रमाचे प्रस्ताविक अश्विन मोगरकर तर सूत्रसंचालन सचिन स्वामी यांनी तर आभार प्रदर्शन विजय जोशी, मुकेश पाटील यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या