गेवराई शहरातील ज्येष्ठ नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात-अनिल बोर्डे




गेवराई, (प्रतिनिधी)-

गेवराई शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांबाबत ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने येथील ग्राहक पंचायतचे ज्येष्ठ कार्यकर्ते व बीड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे माजी अशासकीय सदस्य अनिल बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार व नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आली आहे.

गेवराई शहरातील ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना नगरपरिषदेमार्फत एक गाळा किंवा हॉल उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी निवेदन देऊन प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली होती. परंतु अद्यापपर्यंत हॉल किंवा गाळा उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. याची गांभीर्याने दखल घेऊन मागणीची पूर्तता करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. दिवसेंदिवस गेवराई शहराचा विस्तार चोहोबाजूंनी झपाट्याने होत आहे. प्रत्येक वार्डात ज्येष्ठ नागरिक व अपंगांना बसण्यासाठी बेंच उपलब्ध नाहीत तसेच शास्त्री चौक, कोल्हेर रोड, ताकडगाव रोड आदी महत्त्वाच्या ठिकाणी बसण्यासाठी बेंच किंवा खाली बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी पुन्हा करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांची कामे प्राधान्याने करणे अपेक्षित आहे. परंतु तसे होताना दिसत नाही.

ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना अचानक हृदयविकाराचा त्रास झाल्यास किंवा आजारी पडल्यास तातडीने उपचार मिळवून जीव वाचण्यासाठी रुग्णवाहिकेची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु अद्यापपर्यंत नगरपरिषदेमार्फत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी एक चांगल्या प्रकारचे उद्यान (गार्डन) असणे आवश्यक आहे. याबाबतही तात्काळ कारवाई करण्यात यावी. या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

 निवेदनावर ग्राहक पंचायत मार्गदर्शन केंद्राचे मार्गदर्शक अनिल बोर्डे यांच्यासह प्रा.अंकुशराव चव्हाण, प्रा.भानुदास फलके, राजेंद्र सुतार, परमेश्वर जाधव, अशोक देऊळगावकर, गणेश रामदासी, कचरू उढाण, जानकीराम जोशी, रामेश्वर थळकर, श्रीरंग बजरंग दळवी, कल्याण तौर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार