दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली

 गोविंद मुंडे यांना मातृशोक: सुमित्राबाई बालाजी मुंडे यांचे  निधन




परळी (प्रतिनिधी):- खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन तथा माजी नगरसेवक गोविंद बालाजी मुंडे यांच्या मातोश्री सुमित्राबाई बालाजी मुंडे यांचे वर्धापकाळाने दि.4ऑगस्ट 2023 रोजी  निधन झाले. सायंकाळी 5.30 वा. त्यांची प्राणज्योत शिवाजीनगर येथील निवासस्थानी मालवली.मृत्यू समयी त्यांचे वय 75 वर्षे होते.


सुमित्राबाई बालाजी मुंडे यांच्या पार्थिवदेहावर दि. 5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8 वैद्यनाथ मंदिर जवळील स्मशानभुमी  येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्या धार्मिक कार्यात हिरीरीने सहभाग घेत होत्या. तसेच पंढरपूर, आळंदी  वारीही त्या नित्यनेमाने करीत असत.अत्यंत मनमिळावू व मायाळू असा त्यांचा स्वभाव होता त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.मुंडे कुटुंबीयांच्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार