प्रा. मधुकर शिंदे महाराष्ट्र समता गौरव पुरस्काराने होणार सन्मानित

परळी वैजनाथ दि.०४ (प्रतिनिधी)

         शहरातील विश्वमंगल फांऊंडेशनचे सचिव प्रा. मधुकर शिंदे यांना जनहित फांऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र समता गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला असून ९ आँगस्ट क्रांतीदिनी मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार असल्याचे जनहित फांऊंडेशनच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

     परभणी येथे ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिवसाचे औचित्य साधून जनहित फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्र समता गौरव पुरस्कार वितरण सोहळा हॉटेल विसावा कॅफे पार्क परभणी येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा विनोद सम्राट विजय पाटकर, उद्घाटक माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री गणेशराव दुधगावकर, अँटी करप्शन कमिटीचे रवींद्र दिवेदी, खासदार संजय जाधव,आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राहुल पाटील, विशेष सत्कार मूर्ती परभणीचे जिल्हाधिकारी श्री गावंडे, पोलीस अधीक्षक आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा वितरण होणार आहे. प्रा.मधुकर शिंदे यांना मिळालेल्या या पुरस्काराबदल येथे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार