पोस्ट्स

Parli vaijanath लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MB NEWS-परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के भरला(Video & News)

इमेज
  परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के  भरला परळी वैजनाथ | एमबी न्युज वृत्तसेवा..         परळी तालुक्यातील नंदनज- कासारवाडी येथील 'बोरणा' मध्यम प्रकल्प  १०० टक्के  भरला आहे. तालुक्यातील जलसाठे भरत असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परळी चा मुख्य जलस्त्रोत असलेल्या नागापूर येथील वाण प्रकल्पात यापुर्वीच १०० पाण्याचा साठा झालेला आहे व सध्यस्थितीत पाण्याचा मोठा ओघ सुरू आहे.                   परळी तालुक्यात चांगला  पाऊस  झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साठवण होण्यासाठी मोठी मदत होत आहे. परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत नागापूर येथील  'वाण प्रकल्प' पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. तालुक्यातील बोधेगाव, करेवाडी, चांदापुर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, मोहा, मालेवाडी, गोपाळपुर, खोडवा सावरगाव, दैठणाघाट, करेवाडी आदींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण होण्यास सुरुवात झाली आहे.  बोरणा तलावाच्या सांडव्यावरुन पाणी प्रवाहित ....    दरम्यान परळी पासून जवळच असलेल्या नंदनज-कासारवाडी येथील बोरणा तलावात 100 टक्के  पाणीसाठा झाला  आहे.मध्यम प्रकल्प असलेल्या बोरणा प्र

MB NEWS-नीट परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या जीपला अपघात : दोन विद्यार्थी व दोन पालक जखमी

इमेज
  नीट परीक्षेसाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या जीपला अपघात : दोन विद्यार्थी व दोन पालक जखमी केज (दि.१५) :- परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील विद्यार्थी हे त्यांच्या पालका सोबत अहमदनगर येथे नीटच्या परीक्षेसाठी जात असताना अंबाजोगाई-केज रस्त्यावर होळ नजीक त्यांच्या गाडीला अपघात होऊन पलटी झाली. त्यात दोन विद्यार्थी व दोन पालक असे चौघे जखमी झाले आहेत.       दि. १५ जुलै शुक्रवार रोजी पाथरी जि. परभणी येथील सुरेश सिरसाट वय (५० वर्ष), विनोद सिरसाट वय (४२ वर्ष), सौरभ सिरसाट वय ( १९ वर्ष ) आणि सुजित सिरसाट वय (१८वर्ष) व अन्य एकजण असे पाचजण अहमदनगर येथे नीट परीक्षेसाठी बोलेरो गाडीतून जात होते. त्यांची गाडी केजच्या दिशेने होळ पासून पुढे आली असता होळ ते चंदनसावरगाव दरम्यान त्यांची बोलेरो गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली. या अपघातमध्ये सौरभ सिरसाट वय (१९ वर्ष) आणि सुजित सिरसाट वय (१८वर्ष) हे दोन विद्यार्थी व सुरेश सिरसाट वय (५० वर्ष) आणि विनोद सिरसाट वय (४२ वर्ष) हे दोन पालक जखमी झाले आहेत.जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामिण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे आपत्

MB NEWS-आता परळी मार्गे नविन नांदेड -तिरुपती विशेष रेल्वे सेवा

इमेज
  आता परळी मार्गे नविन नांदेड -तिरुपती विशेष रेल्वे सेवा परळी वैजनाथ.... दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते कर्नाटक राज्यातील हुबळी दरम्यान विशेष गाड्या सुरु करण्याचे ठरवले आहे. या विशेष गाडीच्या सहा फेऱ्या मंजूर करण्यात आल्या असून, नांदेड तिरुपती दरम्यान चार विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा ही निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड- तिरुपती विशेष सेवा           गाडी क्रमांक 07633 ही गाडी 16 आणि 23 जुलै रोजी शनिवारी दुपारी 12.00 वाजता सुटेल. आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चित्तापूर, सुलेहाल्ली, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकळ, गुती, तादिपात्री, येर्रागुंतला, कडप्पा, रेनिगुंता मार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 8.30 वाजता पोहोचेल. तिरुपती-नांदेड विशेष सेवा गाडी क्रमांक 07634 ही गाडी 17 आणि 24 जुलै रोजी रविवारी रात्री 9.00 वाजता सुटेल. आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी 5.20 वाजता सुटेल. या गाडीत प्रथम श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वा

MB NEWS-नांदेड- पंढरपूर-हुबळी परळीमार्गे नवीन रेल्वे

इमेज
  नांदेड- पंढरपूर-हुबळी परळीमार्गे नवीन रेल्वे परळी वैजनाथ.....       दिनांक 16 जुलै, शनिवार पासून परळीमार्गे नांदेड-हुबळी दरम्यान नवीन साप्ताहिक विशेष रेल्वे धावणार आहे. नांदेड-पंढरपूर-हुबळी रेल्वे नांदेड येथून दर शनिवारी दुपारी 2.10 वाजता निघून पूर्णा 2.40, परभणी 3.15, गंगाखेड 3.50, परळी वैजनाथ सायंकाळी 4.40, पुढे लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्सी, कुर्डवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, घटप्रभा, बेळगाव, लोंढा जंक्शन, धारवाड स्थानकावरून  हुबळी येथे दुसर्या दिवशी सकाळी 9 ला पोहोचणार आहे. परतीत हुबळी येथून दर रविवारी सकाळी 11.15 ला निघून त्याच मार्गाने परळी वैजनाथ दूसरा दिवशी सकाळी 3.45, गंगाखेड 5.05, परभणी 5.45 पूर्णा 6.35 आणि अखेर नांदेड येथे सकाळी 8 ला पोहोचणार आहे. Click &watch: *आता परळी मार्गे नविन नांदेड -तिरुपती विशेष रेल्वे सेवा* घोषित नांदेड-हुबळी रेल्वेमुळे धाराशिव येथून 17 किमी अंतरावरील तुळजापूर, पंढरपूर, मिरज येथून 40 किमी अंतरावरील कोल्हापूर महालक्ष्मी, हुबळी येथून  गोकर्णा, मुरुडेश्वर येथील मंदिरांच्या दर्शनासाठी  जाणार्या भक्तांसाठी, तसेच लोंढा जंक्शन येथून 4 तासाच्या

MB NEWS-मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्षनेते पदावरून हकालपट्टी

इमेज
  मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्षनेते पदावरून हकालपट्टी मुंबई: पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात पक्षानं मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड केलं. शिवसेनेचे ३९ आमदार त्यांच्यासोबत आहेत. यानंतर शिंदे गटानं पक्षावरच दावा सांगितला. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा उल्लेख शिवसेनेनं शिंदेंना पाठवण्यात आलेल्या पत्रात केला आहे.      काँग्रेस, राष्ट्रवादीसोबतचं सरकार नको, भाजपसोबत चला अशी भूमिका घेत शिंदेंनी बंडखोरी केली. त्यांच्या बंडाला शिवसेनेच्या ३९ आमदारांनी साथ दिली. १० अपक्ष आमदारदेखील त्यांच्या पाठिशी उभे राहिले. शिंदे गट सरकारमधून बाहेर पडल्यानं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. आपल्याच माणसांनी विश्वासघात केल्यानं ही वेळ आल्याचं ठाकरे राजीनामा देताना म्हणाले. एकनाथ शिंदेंनी काल भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रिपदाची

MB NEWS-थकीत निधी नगर - बीड - परळी रेल्वे प्रकल्पासाठी ठरू शकतो अडसर

इमेज
  अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने पाचशे ब्यानव कोटींचा निधी थकवला थकीत निधी नगर - बीड - परळी रेल्वे प्रकल्पासाठी ठरू शकतो अडसर खा.प्रितमताई मुंडे यांनी घेतलेल्या बैठकीत रेल्वे विभागाचा खुलासा बीड । दि. ०१ । केंद्र आणि राज्य सरकारच्या समान भागीदारीने होत असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाच्या संथ गतीला नुकतेच सत्तेतून पायउतार झालेले महाविकास आघाडी सरकार जवाबदार असल्याचे वास्तव समोर आले आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेच्या कार्यकाळात रेल्वे प्रकल्पाचा पाचशे ब्यानव कोटी रुपयांचा निधी थकवला आहे.तत्कालीन सरकारच्या उदासीनतेमुळे या प्रकल्पाच्या कामात मोठी खीळ बसली आहे, हा थकीत निधी प्रकल्पाच्या प्रगतीमध्ये अडसर ठरू शकतो. क्लिक करा:  *हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; धृतराष्ट्र नाही : हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे - उद्धव ठाकरे बीडच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या रेल्वे , जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामे आणि प्रस्तावित कामांचा त्यांनी आढावा घेतला. रेल्वे प्रकल्पासाठी सुरू असलेल्या अतिरि

MB NEWS-विरोधी पक्षनेते पदासाठी धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा

इमेज
  विरोधी पक्षनेते पदासाठी धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा  मुंबई : मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून जेष्ठ नेते अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे.       क्लिक करा:  *हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; धृतराष्ट्र नाही : हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे - उद्धव ठाकरे  शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळे आता या पक्षाकडे केवळ १६ आमदार उरले आहेत. 'शिंदेशाही' सुरू झाल्यानंतर यातील काही आमदार या गटाच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संख्याबळ नसतानाही विधान परिषदमध्ये विरोधी पक्षनेते पद देण्याची पद्धत विधानसभेमध्ये अंगीकारली जाणार नाही. विधानसभेत सर्वाधिक आमदार असलेला भाजप आता सत्तेत गेला असल्यामुळे विरोधकांमध्ये आमदारांची संख्या असलेल्या विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळणार आहे. क्लिक करा:  'त्या' व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर राज्यातील इतर पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीकडे सर्वाधिक अनुभवी नेते आहेत. तगडा अभ्यास आणि प्रशासनाकडून कामे क

MB NEWS-'त्या' व्हायरल व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर: हा तर खोडसाळपणा - धनंजय मुंडेंची पोस्ट

इमेज
  'त्या' व्हायरल व्हिडिओ ची वास्तविकता आली समोर: हा तर खोडसाळपणा - धनंजय मुंडेंची पोस्ट    मुंबई......       राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात फाईलचा ढिग पडल्या बाबतचा एक व्हिडिओ कोणीतरी व्हायरल केला.याबाबत धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करीत वास्तविकता सांगितली आहे. क्लिक करा:  *हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे; धृतराष्ट्र नाही : हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे - उद्धव ठाकरे*        आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की,"सामान्य प्रशासन विभागाने सूचित केल्याप्रमाणे पूर्वीच्या मंत्री कार्यालयातील सर्व नस्त्या जमा करून उर्वरित रद्दी नष्ट करून कार्यालय रिकामे करून देण्याचा प्रघात आहे. कार्यालयीन कर्मचारी रद्दी नष्ट करण्यासाठी संकलन करत असताना कुणीतरी खोडसाळपणाने एक व्हीडिओ करून समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याचे समजले. चुकीच्या पद्धतीने मांडणी करून पसरवल्या जात असलेल्या त्या व्हीडिओवर कृपया दुर्लक्ष करावे व प्रसिद्धी देऊ नये, ही नम्र विनंती." 🔵  हे देखील वाचा पहा  क्लिक करा: *एकनाथ शिंदेची देवेंद्र फडणवीसांवर स

MB NEWS-बारावी परीक्षेचा निकाल 94.22 टक्के ; यंदाही सरस ठरल्य मुली

इमेज
  बारावी परीक्षेचा निकाल 94.22 टक्के ; यंदाही सरस ठरल्य मुली  पुणे: राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे डोळे ज्या निकालाकडे लागले होते तो बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. हा निकाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजल्यापासून पाहता येणार आहे. राज्याचा एकूण निकाल 94.22 टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक 97.21 टक्के लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी (90.04 टक्के) आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे. यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत. 95.35 टक्के विद्यार्थिनी तर 93.29 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 🛑 आपला निकाल पाहण्यासाठी खालील ओळींवर क्लिक करा व जाणुन घ्या बारावीचा निकाल:- •  👉 या ओळींवर क्लिक करा व आपला नि काल पाहा.   किंवा •   👉 या ओळींवर क्लिक करा. *********************************** ++++++++++±++++++++++±++++++++++++++ दुर्गराज रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा......!* _ MB NEWS ला नक्की SUBSCRIBE/ like/करा._ •  विहिरीत पडून मयत झालेल्या शेख कुटुंबास ना.धनंजय मुंडे यांची नाथ प्रतिष्ठाण कडून

MB NEWS-८ वर्षिय बालिकेवर बलात्कार ; आरोपीला कठोर शासन व्हावे- पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र

इमेज
८ वर्षिय बालिकेवर बलात्कार ; आरोपीला कठोर शासन व्हावे- पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र *पिडित बालिकेच्या कुटुंबियांनी घेतली पंकजाताईंची भेट* परळी ।दिनांक २६। डोंगर पिंपळा (ता. अंबाजोगाई)  येथील आठ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्काराची घटना अतिशय संतापजनक आणि घृणास्पद आहे, यातील आरोपींवर जास्तीत जास्त कठोर शासन व्हावे आणि संपूर्ण गुप्तता पाळुन  याचा वेगाने तपास करावा अशी मागणी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, पिडित बालिकेचे वडिल व कुटुंबातील अन्य सदस्यांनी नुकतीच पंकजाताईंची भेट घेऊन न्यायाची मागणी केली. क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार*    डोंगर पिंपळा येथील आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेला  गावातील तरुण किरण रामभाऊ शेरेकर (वय २३) याने १९ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घरात बोलावुन तिच्यावर बलात्कार केला.   एका गरीब व अल्पवयीन मुलीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अतिशय निंदनीय, संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. या घटनेनंतर सदर मुलगी व तिचे आई वडील प्रचंड तणावाखाली

MB NEWS-मित्राने झोपेत घातला धोंडा! :पार्टीतील किरकोळ वाद बेतला जीवावर

इमेज
  मित्राने झोपेत घातला धोंडा! :पार्टीतील किरकोळ वाद बेतला जीवावर  बीड- जेवण करताना चेष्टेत एका मित्राने तोंडावर बुक्की मारली अन रात्री त्या मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची दुर्दैवी घटना ढेकनमोहा येथे घडली आहे.किरकोळ वादातून सख्या मित्राने आपल्याच मित्राचा जीव घेतल्याने खळबळ उडाली आहे. क्लिक करा व वाचा:*लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार* हैदरअली तरफदार आणि सीमोल बिश्वास हे दोघे पश्चिम बंगाल मधील कामगार मित्र नगर बीड परळी रेल्वेच्या कामासाठी मजुरी करत होते.गेल्या अनेक महिन्यापासून हे दोघे या ठिकाणी काम करत होते.कामाच्या ठिकाणीच पत्र्याचे शेड करून या दोघांसह इतरही मजूर राहत होते. Click &Watch:🏵️ *"वात्सल्य शिल्प"*🏵️ *_आपल्या आवती भवती बघा नक्की नैसर्गिक कलाकृती आढळतील._* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ दरम्यान 25 मार्च रोजी रात्री काम संपवून हैदरअली आणि सीमोल या दोघांनी मद्यपान करत करत जेवण केले.यावेळी चेष्टे चेष्टेत या दोघांचा वाद झाला.त्यावेळी हैदरअली याने सिमोलच्या तोंडावर बुक्की मारली.इतरांनी त्यांचे हे भांडण सोडवले.दोघेही झोपण्यास निघून गेले. क्लिक क

MB NEWS-लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

इमेज
लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार गेवराई : शहरातील आहिल्यानगर भागात राहणाऱ्या एका (२९)वर्षीय  विवाहतेवर लग्नाचे आमिष दाखवून एकाने बलात्कार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांत आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . क्लिक करा व वाचा:*मित्राने झोपेत घातला धोंडा ! : पार्टीतील किरकोळ वाद बेतला जीवावर*     शंकर दिलीप मोरे वय ३२ वर्ष राहणार राजपिंप्री ह.मु गेवराई असे आरोपीचे नाव असुन त्यांचे कापड दुकान आहे दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आहिल्यानगर येथील २९ वर्षीय  विवाहित महिला गेली असता तिला कपडे दाखवण्याच्या बाहाण्याने वाईट उद्देशाने स्पर्श केला तसेच तुम्ही माझ्या दुकानात पहिल्यांदा आला आहात म्हणून चहा घ्या म्हणून बऱ्याच वेळ थांबवले तसेच कपड्याचे बील तयार करून त्यांच्यावर मोबाईल नंबर मागितला. व त्यानंतर मला फोन करून तुम्हाला महत्वाचे बोलायचे आहे व भेटायचे असे सांगितले त्यांतर शासकिय आयटीया परिसरात बोलावले त्याठिकाणी गेल्यानंतर तुम्ही माझ्या दुकानात आल्यापासुन माझ्या स्वप्नात येता असे सांगून माझ्या अंगाला झोंबाझोंबी केली तसेच माझ्यावर ईच्छा नसतांना अत