MB NEWS-आता परळी मार्गे नविन नांदेड -तिरुपती विशेष रेल्वे सेवा

 आता परळी मार्गे नविन नांदेड -तिरुपती विशेष रेल्वे सेवा


परळी वैजनाथ....
दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते कर्नाटक राज्यातील हुबळी दरम्यान विशेष गाड्या सुरु करण्याचे ठरवले आहे. या विशेष गाडीच्या सहा फेऱ्या मंजूर करण्यात आल्या असून, नांदेड तिरुपती दरम्यान चार विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा ही निर्णय घेण्यात आला आहे.
नांदेड-तिरुपती विशेष सेवा
          गाडी क्रमांक 07633 ही गाडी 16 आणि 23 जुलै रोजी शनिवारी दुपारी 12.00 वाजता सुटेल. आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चित्तापूर, सुलेहाल्ली, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, अदोनी, गुंटकळ, गुती, तादिपात्री, येर्रागुंतला, कडप्पा, रेनिगुंता मार्गे तिरुपती येथे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 8.30 वाजता पोहोचेल.

तिरुपती-नांदेड विशेष सेवा

गाडी क्रमांक 07634 ही गाडी 17 आणि 24 जुलै रोजी रविवारी रात्री 9.00 वाजता सुटेल. आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी 5.20 वाजता सुटेल. या गाडीत प्रथम श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकूलित, स्त्री जनरल आणि एस. एल. आर डब्बे असतील. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !