इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार




गेवराई : शहरातील आहिल्यानगर भागात राहणाऱ्या एका (२९)वर्षीय  विवाहतेवर लग्नाचे आमिष दाखवून एकाने बलात्कार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांत आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
    शंकर दिलीप मोरे वय ३२ वर्ष राहणार राजपिंप्री ह.मु गेवराई असे आरोपीचे नाव असुन त्यांचे कापड दुकान आहे दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आहिल्यानगर येथील २९ वर्षीय  विवाहित महिला गेली असता तिला कपडे दाखवण्याच्या बाहाण्याने वाईट उद्देशाने स्पर्श केला तसेच तुम्ही माझ्या दुकानात पहिल्यांदा आला आहात म्हणून चहा घ्या म्हणून बऱ्याच वेळ थांबवले तसेच कपड्याचे बील तयार करून त्यांच्यावर मोबाईल नंबर मागितला. व त्यानंतर मला फोन करून तुम्हाला महत्वाचे बोलायचे आहे व भेटायचे असे सांगितले त्यांतर शासकिय आयटीया परिसरात बोलावले त्याठिकाणी गेल्यानंतर तुम्ही माझ्या दुकानात आल्यापासुन माझ्या स्वप्नात येता असे सांगून माझ्या अंगाला झोंबाझोंबी केली तसेच माझ्यावर ईच्छा नसतांना अतिप्रसंग केला मी त्या ठिकाणा वरून निघून गेले.परत मला वरिल आरोपी फोन करून बोलू लागला तु जर नाही आली तर मी तुझ्या घरी येईल नविन बसस्थानकावर ये त्याठिकाणी गेल्यानंतर माझ्याशी गोड बोलून मी तूझ्याशी लग्न करतो तुझे मुले संभाळतो असे सांगून मला बळजबरीने रिक्षात बसवून मादळमोही याठिकाणी साईराज लॉजवर घेऊन जाऊन माझ्या इच्छेविरूद्ध माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले व त्यानंतर मी त्याला लग्नाबाबद विचारना केली असता तू पारधी समाजाची आहेस तुम्हाला कसली इज्जत जर ही गोष्ट कुणाला सांगितली तर तुला जिवे मारून टाकिण अशी धमकी दिली. या विवाहतेला आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येता तीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या मोठ्या बहिनीला व भावाला सांगितला. 


त्यांनी याबाबद गेवराई पोलिसांत धाव घेतली पिडीतेच्या तक्रारीवरून या प्रकरणी अनुसुचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व लैंगिक अत्याचाच्या आरोपाखाली वरिलल आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील आरोपी फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड करत आहेत.

 🔸हे देखील वाचा/पहा🔸

Click -आजचे राशिभविष्य.

⬛ *MB NEWS चे यु-ट्यूब चॅनल नक्की Subscribe करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकाॅन दाबा.*⬛

*'वैद्यनाथ' सर्व ऊसाचे गाळप करणार; गुढी पाडव्याला सभासदांना 10 किलो साखर*

🔸२५,२६,२७ मार्च तीन दिवस राशन कार्ड नुतनीकरण शिबीर •परळी तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा- डॉ. संतोष मुंडे

🏵️ *डिघोळ(दे.) येथे श्रीमद् दत्तात्रय व संत मोतीराम महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन*

🏵️ *माजी मंत्री पंकजाताई मुंडेंना "त्या" आजींनी अशी घातली साद........… जी वाटली 'मायेची झालर' !*

🔸 *नाथषष्टी: प्रासंगिक चिंतन* ✍️ *_भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर._*

*लक्षवेधी: जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सवात मुलींनी दाखवली मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके.*

🔸 *तुकाराम बीज ✍️ _*भागवतमर्मज्ञ ह.भ.प. सुरेंद्र (बाळु) महाराज उखळीकर यांनी केलेले प्रासंगिक चिंतन.....!*_ 👉⭕ *"तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा......!"*⭕

जाहीरात/Advertis































---------------------------------------------
🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.

--------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या