MB NEWS-नांदेड- पंढरपूर-हुबळी परळीमार्गे नवीन रेल्वे

 नांदेड- पंढरपूर-हुबळी परळीमार्गे नवीन रेल्वे



परळी वैजनाथ.....

      दिनांक 16 जुलै, शनिवार पासून परळीमार्गे नांदेड-हुबळी दरम्यान नवीन साप्ताहिक विशेष रेल्वे धावणार आहे. नांदेड-पंढरपूर-हुबळी रेल्वे नांदेड येथून दर शनिवारी दुपारी 2.10 वाजता निघून पूर्णा 2.40, परभणी 3.15, गंगाखेड 3.50, परळी वैजनाथ सायंकाळी 4.40, पुढे लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्सी, कुर्डवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज, घटप्रभा, बेळगाव, लोंढा जंक्शन, धारवाड स्थानकावरून  हुबळी येथे दुसर्या दिवशी सकाळी 9 ला पोहोचणार आहे. परतीत हुबळी येथून दर रविवारी सकाळी 11.15 ला निघून त्याच मार्गाने परळी वैजनाथ दूसरा दिवशी सकाळी 3.45, गंगाखेड 5.05, परभणी 5.45 पूर्णा 6.35 आणि अखेर नांदेड येथे सकाळी 8 ला पोहोचणार आहे.

Click &watch:*आता परळी मार्गे नविन नांदेड -तिरुपती विशेष रेल्वे सेवा*

घोषित नांदेड-हुबळी रेल्वेमुळे धाराशिव येथून 17 किमी अंतरावरील तुळजापूर, पंढरपूर, मिरज येथून 40 किमी अंतरावरील कोल्हापूर महालक्ष्मी, हुबळी येथून  गोकर्णा, मुरुडेश्वर येथील मंदिरांच्या दर्शनासाठी  जाणार्या भक्तांसाठी, तसेच लोंढा जंक्शन येथून 4 तासाच्या अंतरावरील दूधसागर धबधबा, सोबत 5 तासाच्या अंतरावरील गोव्याला जाणार्या पर्यटकांना अनुकूलता होणार आहे. तरी सदर रेल्वेला आठवड्यातून दोन वेळेप्रमाणे वाढवून कायम करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, डाॅ राजगोपाल कालानी, रुस्तम कदम, रवींद्र मूथा, श्रीकांत गडप्पा, दयानंद दीक्षित, प्रवीण थानवी, कादरीलाला हाशमी, वसंत लंगोटे इत्यादींनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार