पोस्ट्स

MB NEWS:नाथ शिक्षण संस्था कार्यालयात बीड येथील संपादक मंडळाचा सत्कार

इमेज
  नाथ शिक्षण संस्था कार्यालयात बीड येथील संपादक मंडळाचा  सत्कार  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  शहरातील नाथ शिक्षण संस्थेच्या कार्यालयास बीड येथील संपादक मंडळ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी  शैक्षणिक विषया संदर्भात चर्चा केली.         दैनिक बीड रंणझुजारचे संपादक राजेंद्र आगवान, साय. दैनिक अभिमानचे संपादक राजेंद्र होळकर, दैनिक बीड संकेतचे संपादक नरेंद्र कांकरिया, दैनिक चंपावती पत्रचे कार्यकारी संपादक सुभाष चौरे यांनी मंगळवार दि.१४ फेब्रुवारी रोजी नाथ शिक्षण संस्थेच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे यांनी स्वागत करून शाल, श्रीफळ,पुष्पगुछ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.  दरम्यान शैक्षणिक विषया व विविध प्रश्नवर चर्चा करण्यात आली. तसेच नवीन शैक्षणिक धोरण व येणाऱ्या काळतील शैक्षणिक बद्दलावर तसेच इतर अनेक प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडेसह आघाव सर, शेख सर, फड सर, दैनिक सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड, पत्रकार महादेव गित्ते व इतर  आदींची उप

MB NEWS:साबणे कुटुंबियांचे बीड येथील संपादक मंडळाकडून सांत्वन

इमेज
  साबणे कुटुंबियांचे बीड येथील संपादक मंडळाकडून सांत्वन   परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा परळी प्रहार या दैनिकाचे संपादक राजेश साबणे यांच्या मातोश्रींचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले होते. बीड येथील विविध दैनिकांचे संपादक यांनी राजेश साबणे यांच्यासह कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. बीड रणझुजारचे संपादक राजेंद्र आगवान, अभिमानचे संपादक राजेंद्र होळकर, बीड संकेतचे संपादक नरेंद्र कांकरिया, चंपावती पत्रचे कार्यकारी संपादक सुभाष चौरे, दै. सोमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड, पत्रकार महादेव गित्ते व इतर उपस्थित होते.

MB NEWS:दीपा मुधोळ बीडच्या जिल्हाधिकारी !

इमेज
  दीपा मुधोळ बीडच्या जिल्हाधिकारी ! बीड- बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची बदली झाली आहे.नव्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ – मुंडे यांची नियुक्ती झाली आहे. साधारण पणे वर्षभरापूर्वी बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती झाली होती. दरम्यान शर्मा यांची बदली झाली असून नव्या जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ मुंडे या रुजू होणार आहेत.त्या  सांगली,उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.सध्या सिडको औरंगाबाद येथे कार्यरत होत्या. Video....

MB NEWS:आ.धनंजय मुंडे यांचा पवनराजे अर्बन निधीच्या वतीने सत्कार

इमेज
आ.धनंजय मुंडे यांचा पवनराजे अर्बन निधीच्या वतीने सत्कार   परळी/प्रतिनिधी         अपघातानंतर प्रकृती ठिक होताच राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आ.धनंजय मुंडे हे आज दीड महिन्यानंतर परळी शहरात आले असता पवनराजे अर्बन निधी मल्टीपर्पज बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद रंगनाथराव सावंत व सहकार्‍यांनी त्यांची भेट घेवून त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.          सोमवार दि.13 फेब्रुवारी रोजी आ.धनंजय मुंडे यांच्या पंढरी या निवासस्थानी पवनराजे अर्बन निधी मल्टीपर्पज बँकेचे अध्यक्ष प्रल्हाद रंगनाथराव सावंत व सहकार्‍यांनी त्यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पवनराजे ग्रुपचे उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे आणि मित्र परिवार उपस्थित होते.

MB NEWS:महाराष्ट्र इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन अविस्मरणीय

इमेज
  महाराष्ट्र इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन अविस्मरणीय महाराष्ट्र इंग्लिश स्कूल करते संस्कारक्षम विद्यादानाचे काम :  बाजीराव भैया धर्माधिकारी विद्यार्थ्यांनीअभ्यासाने  ध्येय प्राप्ती करावी :  दत्तात्रेय गुट्टे  महाराष्ट्र इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन दिनांक 13 फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय बाजीराव भैय्या धर्माधिकारी, तसेच उद्घाटक म्हणून श्री दत्तात्रय गुट्टे साहेब, तसेच निखिल जी वाघमारे सर, किशोरजी मसलेकर सर, अनिल कुलकर्णी सर, राहुल जोशी सर, शाळेचे मुख्याध्यापक सुनील जोशी सर, मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता. मान्यवरांच्या हस्ते शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार बनसोडे स्नेहा यांना देण्यात आला, यावेळी महाराष्ट्र स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस पटकावली, विद्यार्थ्यांनी विविध गीतांवरती नृत्य केले, देशभक्ती असो छत्रपती शिवाजी राजे असो, महाराष्ट्रातील विविध संत, विविध नेते या सर्वांचं या विद्यार्थ्यांनी नृत्यातून पालकांना दर्शन घडविले, तसेच यावेळी शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या वर्षभर कार्यक्रमाची रूपरेषा पालकांनी

MB NEWS:वैद्यनाथ महाविद्यालयातील कार्यशाळेत बौद्धिक संपदा ,कॉपी राईट , आणि पेटंट बाबतचे धडे

इमेज
  वैद्यनाथ महाविद्यालयातील कार्यशाळेत बौद्धिक संपदा ,कॉपी राईट , आणि पेटंट बाबतचे धडे परळी वैजनाथ ==जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेज मध्ये बौद्धिक संपदा ,कॉपी राईट , आणि पेटंट एक  दिवशीय कार्यशाळेचे आयोजन संगणक विभाग मार्फत करण्यात आले .प्रमुख वक्ते म्हणून अतुल खाडे पेटंट अधिकारी ( गॅझेटेड ऑफिसर ग्रुप ए )  मुंबई ,भारत सरकार यांनी  बौद्धिक संपदा  कशी महत्वाची आहे असे सांगून आजच्या युगामध्ये बौद्धिक संपदेचे महत्व  याविषयी सखोल मार्गदर्शन केले . तसेच आपल्या दैनंदिन जीवनात कॉपी राईट  व ट्रेंड मार्क   याचे महत्व व्यवहारिक क्षेत्रात कितपत आहे व त्याचे उपयोजन  अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले . संशोधन करणे, वस्तुनिष्ठ माहिती गोळा करणे ज्याप्रकारे आवश्यक आहे तसेच त्या संशोधनाचा उपयोग समाजासाठी करणे  आवश्यक आहे असे विस्तृत पणे सांगितले.  भारत देशाला आतापर्यंत मिळालेले  पेटंट याविषयी विद्यार्त्याना मार्गदर्शन केले . या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.व्ही .मेश्राम यांनी जमीन-जुमला, मालकीचे घर, सोने-नाणे, बँकेतील बचत रक्कम, भली मोठी गाडी ही सारी दृश्य भौतिकसंपत

MB NEWS:परळीत प्रथमच महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला भक्तीमय कार्यक्रम

इमेज
  महाशिवरात्री महोत्सव: वैद्यनाथाच्या परिक्षेत्रात 'शिव आराधना' समारोहाचे आयोजन  परळीत प्रथमच महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला भक्तीमय कार्यक्रम परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या परळी वैजनाथ येथे महाशिवरात्री परवाचे प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या पूर्व काळानिमित्त महा महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला प्रभू वैद्यनाथ मंदिरच्या परिक्षेत्रात प्रथमच भक्तिमय संगीत कला यांचा समावेश असलेला शिव आराधना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा अशी आवाहन करण्यात आले आहे.        श्री. ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ नगरीत महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला प्रथमच शिव आराधना या भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिव भजन, शिव स्तोत्र, शिव तांडव तसेच नृत्य कला प्रस्तुत करण्यात येणार आहे. श्री वैद्यनाथ मंदिर पार्कींग प्रांगण, बेलवाडी समोर, परळी वैजनाथ जि.बीड येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे यांचा मंत्रमुग्ध करणाऱ्याशिवभक्ती गीतांचा

MB NEWS:50 वर्षानंतर श्री सरस्वती विद्यालयाचे वर्गमित्र पुन्हा एकत्र

इमेज
  50 वर्षानंतर श्री सरस्वती विद्यालयाचे वर्गमित्र पुन्हा एकत्र परळी/प्रतिनिधी वर्षा मागून वर्ष सलग जातात, आपले सहकारी मित्र व आपण वेगवेगळया गावी नोकरी अथवा व्यवसाच्या निमित्ताने कार्यरत राहतो...परंतू मैत्रीला ऋणानुबंधाचे नाते असल्याने ते नेहमी एकत्र येतच असतात. त्याचा चांगला प्रत्यय श्री सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घडवून आणत 50 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.  श्री सरस्वती विद्यालयातील 1973 ची बॅच आज पुन्हा एकदा एकत्र आली. सुमारे 50 वर्षानंतर हे विद्यार्थी एकत्र आले आहेत. विटा येथील राजेशदादा विटेकर यांच्या फार्म हाऊसमध्ये यानिमित्ताने एक छानसा कार्यक्रम पार पडला, भास्करमामा चाटे, अभयकुमार ठक्कर, रामकिशन लड्डा, डॉ.कांतीलाल बोरा, राधेशाम सारडा, लक्ष्मण आलदे, वैजनाथ क्षीरसागर, मधुकर गित्ते, नारायणराव सातपुते, अ‍ॅड.नागोराव देशमुख, पत्रकार मित्र दत्तामामा लांडे, डॉ.सदाशिव देशपांडे, दिपीका सेठीया, निर्मलाताई आपेट, कुसूमताई मराठे, संजीवनी दहिवाळ, प्रभावती देशमुख, नारायणी झंवर, सुमंगला कुलकर्णी, कांता अग्रवाल आणि निर्मलाताई विटेकर हे यावेळी उपस्थित होते. शाळेच्या जुन्या गप्पा

MB NEWS:आजीने चप्पल घेतली नाही: रागाच्या भरात दहा वर्षीय चिमुकल्याची आत्महत्या

इमेज
  आजीने चप्पल घेतली नाही: रागाच्या भरात दहा वर्षीय चिमुकल्याची आत्महत्या दिंद्रुड... आज्जीने नवीन चप्पल घेतली नाही याचा राग मनात धरून रागाच्या भरात एका दहा वर्षीय चिमुकल्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी बारा ते एक च्या दरम्यान माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत घडली.    पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंद्रुड पोलीस हद्दीतील बोडखा का. येथील युवराज श्रीमंत मोरे (वय दहा वर्ष) हा आपल्या आजोळी हिंगणी (खु) येथील विश्वनाथ काशिनाथ उजगरे यांच्याकडे आला होता. मृत युवराज चे आई व वडील ऊस तोडणी करतात, त्यामुळे युवराज हा आजोळी आल्याची माहिती आहे. त्याने नवीन चप्पल आजीला मागितली मात्र  त्याच्या मागणीची पूर्तता न झाल्याने सोमवारी दुपारी आई-वडिलांकडे जातो असे म्हणून गावाजवळच असलेल्या एका झाडाला साडीने युवराज ने गळफास घेतला. दरम्यान दिंद्रुड पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. Video....

MB NEWS:आ. सोळंके म्हणाले,"मला अनेक पर्याय खुले"

इमेज
  आ. सोळंके म्हणाले,"मला अनेक पर्याय खुले माजलगाव, प्रतिनिधी : आपण भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार का ? अशा चर्चा, वल्गणा आहेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना आ. प्रकाश सोळंकेंनी मी राष्ट्वादी सोडणार नाही किंवा पक्ष सोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही असे म्हणालेच नाहीत तर मतदारसंघातील लोक जर भाजपामध्ये जा म्हणाले तर मी त्याही पक्षात जाईल व मला शिंदेसेना, तेलंगणा राज्यातील केसीआर असे अनेक पर्याय मला खुले असल्याचे सांगीतल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.  माजलगाव येथील सोळंके महाविद्यालयात सोयाबीन, कपाशी अशा शेतक-यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकीसाठी पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांच्या या पक्षातुन त्या पक्षात उड्या होत असतात परंतु गेल्या आठ ते नउ महिण्यांपासुन मतदारसंघामध्ये आ. प्रकाश सोळंके भाजपात जाणार या चर्चेमुळे इतर पक्षांतर बदलीच्या कार्यकर्त्यांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे पत्रकारांनी आ. सोळंकेंना भाजपा पक्षात जाणार का ? यावर ते बोलतांना मी राष्

MB NEWS:राजस्थान कोटा येथील रेजोनन्स ने महाराष्ट्रातून निवडले परळी येथील फाउंडेशन स्कूल

इमेज
  आता राजस्थान कोटा येथील शिक्षण घेता येणार परळी शहरात;विद्यार्थी पालकांची गैरसोय होणार दूर राजस्थान कोटा येथील रेजोनन्स ने महाराष्ट्रातून निवडले परळी येथील फाउंडेशन स्कूल 5 एप्रिल 2023 पासून फाउंडेशन स्कूल येथे सुरू होणार अभ्यासक्रम परळी (प्रतिनिधी):- परळी येथील नावलौकिक असलेल्या फाउंडेशन स्कूलने पारंपारिक शैक्षणिक क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत परळी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक, उच्च दर्जाचे व शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राजस्थान कोटा येथील नामांकित शिक्षण संस्था रेजोनन्सने फाउंडेशन सुपर बॅचेस सुरू केल्या आहेत. याचे उद्घाटन रेजोनन्स चे उपाध्यक्ष श्री कीर्तीसिंग संगोरा यांच्या हस्ते दि. 28 जानेवारी 2023 करण्यात आले आहे. दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी फाउंडेशन स्कूल येथे प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांना राजस्थान कोटा येथे चालणारे शिक्षण देऊन एक सुवर्णसंधी परळी येथील फाउंडेशन स्कूलने उपलब्ध करून दिली आहे. दि.5 एप्रिल 2023 पासून सदरील अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थी व पालकां

MB NEWS:परळी तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान तात्काळ वाटप करा - केशव तिडके

इमेज
  परळी तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान तात्काळ वाटप करा - केशव तिडके परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान तात्काळ वाटप करा  अशी मागणी केशव तिडके यांनी केली आहे.         अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांची अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ अदा करण्यास विलंब झाला असून शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. अनेक अडचणीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. प्रशासनाने अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी व रक्कम न जमा झाल्यास तीव्र अंदोलनाचा इशारा दिला आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान तात्काळ वाटप करा  अशी मागणी केशव तिडके यांनी केली आहे.

MB NEWS: ■आसुबाई विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

इमेज
 ■आसुबाई विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश  परळी / प्रतिनिधी परळी तालुक्यातील मांडेखेल येथील आसुबाई माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय ने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत(NMMS) घवघवीत यश संपादन केले. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा डिसेंबर 2022 मध्ये पार पडली. या परीक्षेत विद्यालयातील तेरा  विद्यार्थी  सहभागी झालेले होते या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत विद्यालयातील तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ही परीक्षा भारत सरकार तर्फे आयोजित केली जाते. या परीक्षेत जे विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरतात त्यांना वर्षाला बारा हजार रुपये याप्रमाणे चार वर्षात 60 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते ही परीक्षा केंद्रातर्फे दरवर्षी आयोजित केली जाते यामध्ये सर्व प्रवर्गातील शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम दिली जाते. या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील चि.पवन घुगे 75.4%,  कु.श्रद्धा सलगर 73.3% व चि.जयदीप वाव्हळे 58.58% हे तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून  विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र

MB NEWS:ज्येष्ठ पत्रकार राजेश साबणे यांच्यासह परळीतील भराडीया, धोकटे, कांदे आदी कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन

इमेज
  ज्येष्ठ पत्रकार राजेश साबणे यांच्यासह परळीतील भराडीया, धोकटे, कांदे आदी कुटुंबियांचे धनंजय मुंडे यांनी केले सांत्वन परळी (दि. 13) - परळी शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा परळी प्रहार या दैनिकाचे संपादक राजेश साबणे यांच्यासह शहरातील भराडीया, धोकटे, कांदे आदी परिवारांचे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या घरी भेटी देऊन सांत्वन केले.  पत्रकार साबणे यांच्या मातोश्रींचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले होते, धनंजय मुंडे यांनी राजेश साबणे यांच्यासह कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.  त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी परळी अंबाजोगाई रस्त्यावर एका अपघातात शहरातील रोहित भराडीया, शुभम धोकटे, व्यंकटेश कांदे या तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या तीनही तरुणांच्या कुटुंबियांची आज धनंजय मुंडे यांनी भेट घेत त्यांच्या अकाली निधनाबद्दल दुःख व्यक्त करत तीनही कुटुंबियांना धीर दिला.  यावेळी माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, चंदूलाल बियाणी, अनिल अष्टेकर, विजय भोईटे, रमेश भोईटे, शंकर कापसे आदी उपस्थित होते.

MB NEWS:वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने

इमेज
  वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने परळी वैजनाथ...... परळी वैजनाथ येथील डीएसएम प्रतिष्ठान संचलित लावण्याई स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या  सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान धारण करत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोककलेचे विविध सांस्कृतिक आयाम सादर केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आकर्षक नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.  विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन परळी शहराचे माजी नगराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महिला, बालकल्याण व शिक्षण विभागाच्या माजी सभापती तथा मराठी नाट्य परिषदेच्या नांदेड शाखेच्या अध्यक्षा सौ अपर्णाताई हृषिकेश नेरलकर यांची उपस्थिती होती.परळी येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या डॉ डी.जे. दंडे  व्यासपीठावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर दैनिक दिव्य लोकप्रभाचे नांदेड येथील उपसंपादक प्रा.संतोष कुलकर्णी, डाॅ  सुरेश  चौधरी,  लक्ष्मीबाई देशमुख महाविद्यालयाचे पद

MB NEWS:परळीतील तीन तरुणांच्या अपघाती मृत्यूबाबत धनंजय मुंडे यांनी केले दुःख व्यक्त

इमेज
  परळीतील तीन तरुणांच्या अपघाती मृत्यूबाबत धनंजय मुंडे यांनी केले दुःख व्यक्त परळी (दि. 12) - परळी शहरात वास्तव्यास असलेले शुभम धोकटे, व्यंकटेश कांदे व रोहित भराडिया या तीन तरुणांचा शनिवारी सायंकाळी अपघाती मृत्यू झाला असुन, या दुर्दैवी घटनेबद्दल आ. धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे. काल सायंकाळी परळी शहरातील शुभम धोकटे, व्यंकटेश कांदे, रोहित भराडिया या तीन तरुणांचा परळी-अंबाजोगाई रस्त्यावर झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची दुःखद बातमी समजली. या तरुणांच्या अकाली निधनाने तीनही कुटुंबांवर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवोत, अशी प्रभू वैद्यनाथांना प्रार्थना करतो; अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी आपल्या संवेदना तीनही कुटुंबांच्या प्रति व्यक्त केल्या आहेत.  परळीतल्या या तीन तरुणांचा शनिवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून प्रवास करताना परळी अंबाजोगाई रस्त्यावर ट्रॅक्टरची धडक बसून दुर्दैवाने मृत्यू झाला होता.

MB NEWS परळीतील 'त्या' युवकांच्या अपघाती निधनामुळं पंकजाताई मुंडे झाल्या व्यथित

इमेज
  परळीतील 'त्या' युवकांच्या अपघाती निधनामुळं पंकजाताई मुंडे झाल्या व्यथित कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करत वाहिली भावपूर्ण श्रध्दांजली परळी वैजनाथ ।दिनांक १२। शहरातील तीन उमद्या तरूणांचे शनिवारी एका रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झाले, ही बातमी कळताच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे हया व्यथित झाल्या आहेत. या तरूणांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करत त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.   पंकजाताई मुंडे यांनी या घटनेबद्दल  फेसबुक पोस्ट करत हळहळ व्यक्त केली आहे, त्यांनी म्हटले आहे की,   व्यंकटेश कांदे,रोहित भराडीया व शुभम धोकटे या तीन युवकांचा लातूरहुन परळीला परतताना भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.आपल्या परळीतील ऐन उमेदीतल्या तरुणांचे असे जाणे व्यथित करणारे आहे, परळी स्तब्ध आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !! ••••

MB NEWS:मोंढा मैदानात स्वागत सभेचे आयोजन

इमेज
परळी: धनंजय मुंडेंचे होणार अभूतपूर्व स्वागत  मोंढा मैदानात स्वागत सभेचे आयोजन परळी वैजनाथ - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे हे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर रविवारी प्रथमच परळीला येत आहेत. 3 जानेवारी रोजी त्यांच्या कारला परळीत अपघात झाल्यानंतर ते मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत होते व त्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन ते सुमारे 40 दिवसानंतर परळी या आपल्या मतदारसंघात येत आहेत.  परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या पुनरागमाननिमित्त जोरदार स्वागत करण्यात येणार असून, याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.  धनंजय मुंडे हे रविवारी दुपारी 4 च्या सुमारास हेलिकॉप्टरने परळीत येतील, त्यानंतर ते प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन पांगरी येथे गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर पांगरी, तळेगाव, टोकवाडी, ब्रम्हवाडी, रिलायन्स पेट्रोल पंप येथे विविध गावातील नागरिकांच्या वतीने भव्य स्वागताचे आयोजन करण्यात आले आहे.  त्यानंतर परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथून धनंजय मुंडे यांची स्वागत मिरवणूक

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

इमेज
  अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        अंबाजोगाई परळी रस्त्यावर घाटाच्यावर  काही अंतरावर भिषण आपघात घडला असुन परळीतील तीन युवक गंभीर जखमी झाले. त्यांना अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना यातील दोन युवकांची प्राणज्योत मालवल्याची प्राथमिक माहीती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.एकावर उपचार करण्यात येत आहेत.        अंबाजोगाई परळी रस्त्यावर घाटाच्यावर  काही अंतरावर आज सायंकाळी 6.45 वा.सुमारास मोटरसायकल व उसाची ट्रॉली यांचा भिषण आपघात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहीतीनुसार परळीतील तीन युवक मोटरसायकलवरुन परळीकडे येत असताना उसाच्या ट्रॉलीवर धडकुन आपघात घडला. परळी ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचुन आपघातग्रस्तांना उपचारासाठी हलवण्यात मदतकार्य  केले.या आपघात जखमी झालेल्यांमध्ये व्यंकटेश कांदे राहणार बँक कॉलनी,रोहित भराडीया राहणार पद्मावती गल्ली,शुभम धोकटे राहणार इंडस्ट्रियल एरिया परळी यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली.       दरम्यान अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जा

MB NEWS:१७ वे राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलन मिरजेत

इमेज
  १७ वे राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलन मिरजेत संमेलनाध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर, उद्घाटक डॉ. राजा दीक्षित, स्वागताध्यक्ष कामगारमंत्री ना. डॉ. सुरेश खाडे, आयुक्त रविराज इळवे कार्यवाह परळी (प्रतिनिधी) : सतरावे राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे आयोजन दि. २४ व २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मिरज, जि. सांगली येथे करण्यात आले असून सर्व कामगारांनी या संमेलनात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन कामगार मंत्री ना. डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री डॉ.खाडे यांनी संमेलनाबाबत माहिती दिली. बालगंधर्व नाट्य मंदिर, मिरज, जि.सांगली येथे हे संमेलन होणार असून शुक्रवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येईल. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.  या दोन दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित या संमेलनाचे उद्घाटक तर कामगारमंत्री ना. डॉ. सुरेश खाडे स्वागताध्यक्ष असून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे या सं

MB NEWS: 🔸राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण: ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन

इमेज
 🔸राष्ट्रपित्याचे  पुण्यस्मरण: ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे  कीर्तन आळंदी देवाची.......         महात्मा गांधी रक्षाविसर्जन स्तंभ, इंद्रायणी काठी, श्री. क्षेत्र आळंदी देवाची, पुणे येथे रविवार, दि. 12 फेब्रुवारी 2023 सकाळी ठीक 8.30 वाजता ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.            30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर देशभरातील प्रमुख नद्यांमध्ये गांधीजींच्या रक्षेचे विर्सजन करण्यात आले. पुण्यभूमी आळंदी येथे 12 फेब्रुवारी 1948 रोजी इंद्रायणी नदीमध्ये गांधीजींच्या अस्थींचे विसर्जन झाले. दरवर्षी 12 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे गांधीजींना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. संस्थेतर्फे इंद्रायणी काठी ‘रक्षा विसर्जन स्तंभ’ उभारण्यात आला आहे. गेली 75 वर्षे या परंपरेचे पालन होत आहे. यावर्षी ह. भ. प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. गांधीवादी कार्यकर्ते, वारकरी बांधव, ग्रामस्थ, विद्यार्थी, युवक - युवती आणि राष्ट्रपित्याचा आदर करणारे नागरिक अशा समस्ता

MB NEWS:पोस्ट ऑफिस उघडं आहे या विनोदी मलिकेत साकारत आहे गवारे ची भूमिका...

इमेज
परळीचा सुपुत्र परमेश्वर गुट्टे पुन्हा झळकतोय सोनी मराठीवर पोस्ट ऑफिस उघडं आहे या विनोदी मलिकेत साकारत आहे गवारे ची भूमिका... रुपेरी पडद्यावर दिसण्याचे स्वप्नं अनेकजण पाहात असतात पण आजच्या या स्पर्धेच्या जगात त्यांचीच स्वप्न पुर्ण होतात ज्यांच्यामध्ये जिद्द व चिकाटी असते आणि ज्यांची सातत्यपूर्ण प्रयत्न करत स्वतःच्या अंगी असलेल्या कालगुनांना विकसित करण्यासाठी मेहनत करण्याची तयारी असते.  याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे परमेश्वर गुट्टे. अंगी असलेल्या कालगुनांमुळे आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे परिवारात कला क्षेत्रातली अगदी कसलीच पार्श्वभूमी नसतानाही या तरुणाने आपल्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे आणि मेहनतीमुळे परळीपासून ते मुंबईपर्यंत अगदी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पुर्ण केला आहे. परमेश्वर त्याच्या अभिनयातुन कला विश्वात स्वतःची प्रगती तर करतच आहे पण तो त्याच्या कर्तृत्वातून आपल्या शहराचे देखील नावलौकीक करत आहे.  त्याने आत्तापर्यंतच्या अभिनय क्षेत्रातल्या यशस्वी प्रवासात कॅलर्स मराठी वरील ‘तु माझा सांगाती,’ बाळु मामाच्या नावान चांगभल, काय घडल त्या रात्री, स्वराज्य जननी ज

MB NEWS:महर्षी दयानंद द्विशताब्दीवर्षा निमित्त परळी येथे विचारसंस्कार सप्ताह व स्पर्धांचे आयोजन

इमेज
  महर्षी दयानंद द्विशताब्दीवर्षा निमित्त परळी येथे विचारसंस्कार सप्ताह व स्पर्धांचे आयोजन     परळी वैजनाथ,दि.११-                   थोर समाजसुधारक व वेदोद्धारक महर्षी स्वामी दयानंद सरस्वती त्यांच्या २०० व्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात आज (दि.१२)  होत आहे.  वर्षभरात होणाऱ्या विविध राष्ट्रीय उपक्रमांचे उद्घाटन नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. यानिमित्त परळीसह राज्यात देखील विविध कार्यक्रमांची सुरुवात होत आहे.          या अनुषंगाने परळी येथील आर्य समाजाच्या वतीने दि. १२ ते१९ फेब्रुवारी दरम्यान "महर्षी दयानंद विचार सप्ताह" साजरा होत असून आठवडाभर प्रबोधनपर व्याख्याने वक्तृत्व स्पर्धा, सत्संग व इतर कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. पहिल्या दिवशी स.९ वाजता  दिल्ली येथे होणारे पंतप्रधान मोदी यांचे भाषण थेट मोठ्या पडद्यावर पाहण्याची व्यवस्था आर्य समाज मंदिरात स.९ वा. करण्यात आली आहे. यात शहरातील नागरिक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.             सप्ताहाभरात दररोज सकाळी विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी "मानवता संस्कार प्रबोधन&q

MB NEWS:चंदुलाल बियाणी यांची जिल्हाधिकार्‍यांकडे आग्रही मागणी

इमेज
महाशिवरात्र पर्व लोकोत्सव व्हावा यासाठी वैद्यनाथ देवस्थानने स्थानिकांना नियोजन व दर्शन व्यवस्थेत सहभागी करुन घ्यावे ! चंदुलाल बियाणी यांची जिल्हाधिकार्‍यांकडे आग्रही मागणी परळी / प्रतिनिधी   महाशिवरात्र पर्व हा परळी व पंचक्रोशीतील स्थानिक नागरिकांसाठी आस्थेचा वार्षिक उत्सव असतो.परंतु गेल्या काही वर्षांपासून केवळ देवल कमेटी व प्रशासन असे या उत्सवाचे स्वरुप होत आहे.खऱ्या अर्थानेा लोकोत्सव व्हावा यासाठी  देवस्थानने स्थानिकांना नियोजन व दर्शन व्यवस्थेत सहभागी करुन घ्यावे अशी आग्रही मागणी वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.  मागील अनेक वर्षापासून परळीतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधी यांच्यासह पत्रकार डॉक्टर वकील अशा व्यक्तींना पास दिले जात होते. फिरता पास हा 24 तास वापरला गेला तर अनेकांना एका पासद्वारे दर्शन करता येत होते. असाच ट्रान्सपरेबल म्हणजेच फिरता पास देण्यात यावा. अशा प्रकारचे पास देण्याची पद्धत सध्या बंद असून ती पूर्वीप्रमाणे चालू करावी अशी मागणी करण्यात आली आहे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचे योग्य नियोजन लागावे याकरिता द

MB NEWS:परळीत येण्याआधी गहिनीनाथ गडावर जाणार दर्शनाला

इमेज
धनंजय मुंडे अपघातानंतर रविवारी प्रथमच येणार परळीत;स्वागताची जोरदार तयारी वैद्यनाथ प्रभूंचे व गोपीनाथ गड येथे घेणार दर्शन मोंढा मैदानात स्वागत सभेचे आयोजन परळीत येण्याआधी गहिनीनाथ गडावर जाणार दर्शनाला परळी (दि. 10) - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे हे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर रविवारी प्रथमच परळीला येत आहेत. 3 जानेवारी रोजी त्यांच्या कारला परळीत अपघात झाल्यानंतर ते मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत होते व त्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन ते सुमारे 40 दिवसानंतर परळी या आपल्या मतदारसंघात येत आहेत.  परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या पुनरागमाननिमित्त जोरदार स्वागत करण्यात येणार असून, याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.  धनंजय मुंडे हे रविवारी दुपारी 4 च्या सुमारास हेलिकॉप्टरने परळीत येतील, त्यानंतर ते प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन पांगरी येथे गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर पांगरी, तळेगाव, टोकवाडी, ब्रम्हवाडी, रिलायन्स पेट्रोल पंप येथे विविध गावातील नागरिकांच्या वतीने भव्य स्वागताचे आयो