MB NEWS:चंदुलाल बियाणी यांची जिल्हाधिकार्‍यांकडे आग्रही मागणी


महाशिवरात्र पर्व लोकोत्सव व्हावा यासाठी वैद्यनाथ देवस्थानने स्थानिकांना नियोजन व दर्शन व्यवस्थेत सहभागी करुन घ्यावे !



चंदुलाल बियाणी यांची जिल्हाधिकार्‍यांकडे आग्रही मागणी

परळी / प्रतिनिधी

  महाशिवरात्र पर्व हा परळी व पंचक्रोशीतील स्थानिक नागरिकांसाठी आस्थेचा वार्षिक उत्सव असतो.परंतु गेल्या काही वर्षांपासून केवळ देवल कमेटी व प्रशासन असे या उत्सवाचे स्वरुप होत आहे.खऱ्या अर्थानेा लोकोत्सव व्हावा यासाठी  देवस्थानने स्थानिकांना नियोजन व दर्शन व्यवस्थेत सहभागी करुन घ्यावे अशी आग्रही मागणी वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.


 मागील अनेक वर्षापासून परळीतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकप्रतिनिधी यांच्यासह पत्रकार डॉक्टर वकील अशा व्यक्तींना पास दिले जात होते. फिरता पास हा 24 तास वापरला गेला तर अनेकांना एका पासद्वारे दर्शन करता येत होते. असाच ट्रान्सपरेबल म्हणजेच फिरता पास देण्यात यावा. अशा प्रकारचे पास देण्याची पद्धत सध्या बंद असून ती पूर्वीप्रमाणे चालू करावी अशी मागणी करण्यात आली आहे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांचे योग्य नियोजन लागावे याकरिता दर्शन रांगेवर नियंत्रण करण्यासाठी सामाजिक संघटनांचा स्वयंसेवक म्हणून नेहमी सहभाग असतो तो सुद्धा आता बंद झाला असून पोलीस व खाजगी सुरक्षा रक्षकांसोबत विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी द्यावी स्वयंसेवक म्हणून मंदिर परिसरात 2 तास सेवा मर्यादा देण्यात यावी अशी मागणी  चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.

महाशिवरात्री यात्रा हा परळी शहर आणि परिसरातील नागरिकांचा वार्षिक उत्सव असून या निमित्ताने या भागातील नागरिकांना श्री वैद्यनाथ प्रभूंचे सहजपणे दर्शन घेता यावे याकरिता प्रतिष्ठित नागरिक विशेषतः लोकप्रतिनिधी, विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी, व्यापारी, डॉक्टर, पत्रकार, वकील, वारकरी सांप्रदायातील प्रतिनिधी, जेष्ठ नागरीक आदींना दर्शन घेता यावे यासाठी फिरता पास उपलब्ध करून द्यावा अशी मागणी वैद्यनाथ देवस्थान विकास कृती समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.

महाशिवरात्री यात्रा 18 फेब्रुवारीला असून प्रशासकीय व देवस्थान स्तरावर महाशिवरात्र यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. परळी येथील व तालुक्यातील नागरिक नेहमीच वैद्यनाथ देवस्थानला अपेक्षित असलेल्या प्रत्येक कामात एक जबाबदार घटक म्हणून नेहमीच सहकार्य करतात. परंतु दरवर्षी होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता या भागातील नागरिकांना महाशिवरात्र यात्रेच्या पवित्र पर्वा वर श्री वैद्यनाथ प्रभू चे दर्शन घेता येत नाही. शहरातील अनेक नागरिक दररोज नियमितपणे श्रींचे दर्शन घेत असतात. या पार्श्वभूमीवर  विविध पक्ष , संघटना व स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यरत असलेले पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांना महाशिवरात्रीनिमित्त फिरता दर्शन पास देण्याची मागणी चंदुलाल बियाणी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

प्रस्तुत निवेदनात पुढे म्हटले आहे की 

या निवेदनाच्या प्रती आमदार धनंजय मुंडे तसेच वैजनाथ देवस्थान समितीचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार सुरेश शेजुळ सचिव राजेश देशमुख यांना देण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !