इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:वैद्यनाथ महाविद्यालयातील कार्यशाळेत बौद्धिक संपदा ,कॉपी राईट , आणि पेटंट बाबतचे धडे

 वैद्यनाथ महाविद्यालयातील कार्यशाळेत बौद्धिक संपदा ,कॉपी राईट , आणि पेटंट बाबतचे धडे

परळी वैजनाथ ==जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेज मध्ये बौद्धिक संपदा ,कॉपी राईट , आणि पेटंट एक  दिवशीय कार्यशाळेचे आयोजन संगणक विभाग मार्फत करण्यात आले .प्रमुख वक्ते म्हणून अतुल खाडे पेटंट अधिकारी ( गॅझेटेड ऑफिसर ग्रुप ए )  मुंबई ,भारत सरकार यांनी  बौद्धिक संपदा  कशी महत्वाची आहे असे सांगून आजच्या युगामध्ये बौद्धिक संपदेचे महत्व  याविषयी सखोल मार्गदर्शन केले . तसेच आपल्या दैनंदिन जीवनात कॉपी राईट  व ट्रेंड मार्क   याचे महत्व व्यवहारिक क्षेत्रात कितपत आहे व त्याचे उपयोजन  अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले . संशोधन करणे, वस्तुनिष्ठ माहिती गोळा करणे ज्याप्रकारे आवश्यक आहे तसेच त्या संशोधनाचा उपयोग समाजासाठी करणे  आवश्यक आहे असे विस्तृत पणे सांगितले.  भारत देशाला आतापर्यंत मिळालेले  पेटंट याविषयी विद्यार्त्याना मार्गदर्शन केले . या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.व्ही .मेश्राम यांनी जमीन-जुमला, मालकीचे घर, सोने-नाणे, बँकेतील बचत रक्कम, भली मोठी गाडी ही सारी दृश्य भौतिकसंपत्ती आहे. याशिवाय आणखीही एक वेगळी संपत्ती आहे, पण ती न दिसणारी अशी आहे. ती म्हणजे बौद्धिक संपत्ती चे महत्व विद्यर्थ्यांना सांगितले त्यासाठी विद्यार्थ्यांनी बौद्धिक क्षमता अंगीकारावी असे सांगितले .   या कार्यक्रमाचे सूत्र संचालन  संगणक विभाग प्रमुख डॉ. व्ही .व्ही. मुंडे तर आभार प्रा.डॉ. बी.के. शेप यांनी केले .या कार्यशालेसाठी बहुसंख्येने विद्यार्थी व  प्रा.  डॉ. रा. ज. चाटे  डॉ. व्ही.एल.फड आदींची उपस्थिती होती .



Video....



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!