MB NEWS:परळीत प्रथमच महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला भक्तीमय कार्यक्रम

 महाशिवरात्री महोत्सव: वैद्यनाथाच्या परिक्षेत्रात 'शिव आराधना' समारोहाचे आयोजन 

परळीत प्रथमच महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला भक्तीमय कार्यक्रम

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
       द्वादश ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या परळी वैजनाथ येथे महाशिवरात्री परवाचे प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या पूर्व काळानिमित्त महा महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला प्रभू वैद्यनाथ मंदिरच्या परिक्षेत्रात प्रथमच भक्तिमय संगीत कला यांचा समावेश असलेला शिव आराधना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा अशी आवाहन करण्यात आले आहे.

       श्री. ज्योतिर्लिंग क्षेत्र परळी वैजनाथ नगरीत महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला प्रथमच शिव आराधना या भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिव भजन, शिव स्तोत्र, शिव तांडव तसेच नृत्य कला प्रस्तुत करण्यात येणार आहे. श्री वैद्यनाथ मंदिर पार्कींग प्रांगण, बेलवाडी समोर, परळी वैजनाथ जि.बीड येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे यांचा मंत्रमुग्ध करणाऱ्याशिवभक्ती गीतांचा संगीतमय कार्यक्रम शुक्रवार, १७ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ८ ते १२ आयोजित करण्यात आला आहे.

         या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई  मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यनाथ देवस्थान देवल कमेटी सचिव राजेश देशमुख राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यनाथ देवस्थान देवल कमेटी अध्यक्ष तथा तहसीलदार सुरेश शेजुळ, देवल कमिटी विश्वस्त मंडळ सर्वश्री  प्रा. बाबासाहेब देशमुख, नंदकिशोर जाजू, प्रा.प्रदीप देशमुख, अनिल तांदळे, विजयकुमार मेनकुदळे, डॉ.गुरुप्रसाद देशपांडे, नागनाथराव देशमुख, रघुवीर देशमुख, शरद मोहरीर, राजाभाऊ पुजारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

            परळी शहरात महाशिवरात्रीच्या पूर्व संध्येला प्रथमच  होत असलेल्या या महोत्सवात मोठ्या संख्येने सह-परिवार उपस्थित रहावे असे आवाहन ॲड. अरुण पाठक,योगेश पांडकर, गोविंद चौरे,रवि वाघमारे,वैजनाथ रेकने व समस्त शिवभक्त परळी वैजनाथ यांच्यावतिने करण्यात आले आहे.
--------------------------------------------------------

● Watch video:



Video....



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !