दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:महाराष्ट्र इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन अविस्मरणीय

 महाराष्ट्र इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन अविस्मरणीय

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल करते संस्कारक्षम विद्यादानाचे काम :  बाजीराव भैया धर्माधिकारी

विद्यार्थ्यांनीअभ्यासाने  ध्येय प्राप्ती करावी :  दत्तात्रेय गुट्टे 


महाराष्ट्र इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन दिनांक 13 फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय बाजीराव भैय्या धर्माधिकारी, तसेच उद्घाटक म्हणून श्री दत्तात्रय गुट्टे साहेब, तसेच निखिल जी वाघमारे सर, किशोरजी मसलेकर सर, अनिल कुलकर्णी सर, राहुल जोशी सर, शाळेचे मुख्याध्यापक सुनील जोशी सर, मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता. मान्यवरांच्या हस्ते शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार बनसोडे स्नेहा यांना देण्यात आला, यावेळी महाराष्ट्र स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस पटकावली, विद्यार्थ्यांनी विविध गीतांवरती नृत्य केले, देशभक्ती असो छत्रपती शिवाजी राजे असो, महाराष्ट्रातील विविध संत, विविध नेते या सर्वांचं या विद्यार्थ्यांनी नृत्यातून पालकांना दर्शन घडविले, तसेच यावेळी शाळेमध्ये घेतल्या जाणाऱ्या वर्षभर कार्यक्रमाची रूपरेषा पालकांनी पाहिली, तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजयजी सूर्यवंशी सर यांनी त्यांच्या मधुर वाणीतून पालकांची मनी जिंकली, हा कार्यक्रम अविस्मरण घडवण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक-प्रीतम आदमाने सर, स्नेहा बनसोडे मॅडम, गौरी जोशी मॅडम, प्रभा मोगरकर मॅडम, लाहोटी अनिता मॅडम, ठाकूर मीनाक्षी मॅडम, सुलभा कुलकर्णी मॅडम, दैवशाला बनसोडे मॅडम, श्रद्धा हलगे मॅडम सर्वांनी खूप मेहनत घेतली, कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक सुनील जोशी सर यांनी सर्व पालकांची आभार व्यक्त केले.


Video....



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....