MB NEWS:मोंढा मैदानात स्वागत सभेचे आयोजन

परळी: धनंजय मुंडेंचे होणार अभूतपूर्व स्वागत 


मोंढा मैदानात स्वागत सभेचे आयोजन

परळी वैजनाथ - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे हे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर रविवारी प्रथमच परळीला येत आहेत. 3 जानेवारी रोजी त्यांच्या कारला परळीत अपघात झाल्यानंतर ते मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत होते व त्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन ते सुमारे 40 दिवसानंतर परळी या आपल्या मतदारसंघात येत आहेत. 


परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांच्या पुनरागमाननिमित्त जोरदार स्वागत करण्यात येणार असून, याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 


धनंजय मुंडे हे रविवारी दुपारी 4 च्या सुमारास हेलिकॉप्टरने परळीत येतील, त्यानंतर ते प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेऊन पांगरी येथे गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर पांगरी, तळेगाव, टोकवाडी, ब्रम्हवाडी, रिलायन्स पेट्रोल पंप येथे विविध गावातील नागरिकांच्या वतीने भव्य स्वागताचे आयोजन करण्यात आले आहे. 


त्यानंतर परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथून धनंजय मुंडे यांची स्वागत मिरवणूक निघणार असून, शहरातील व मतदारसंघातील नागरिकांच्या व पदाधिकार्‍यांच्या वतीने त्यांचे ईटके कॉर्नर, उड्डाण पूल, सुभाष चौक, रोडे चौक, राणी लक्ष्मीबाई टॉवर आदी ठिकाणी स्वागत करण्यात येईल व त्यानंतर सायंकाळी ठीक 5 वा. मोंढा मैदान येथे भव्य स्वागत व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.


धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी परळी मतदारसंघ सजला असून, ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तिरुपती बालाजी, केरळ, उज्जैन, मुंबई येथील खास बँड पथक पाचारण्यात आले आहेत. तसेच विविध प्रकारची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.


पांगरी पासून ते मोंढा मैदान पर्यंत स्वागत समारंभाची जय्यत तयारी पाहून परळीकरांच्या वतीने धनंजय मुंडे यांचे न भूतो न भविष्यती असे अभूतपूर्व स्वागत होणार असल्याचे दिसून येत आहे.


या संपूर्ण स्वागत समारोहात परळी मतदारसंघातील नागरिकांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आघाडी व फ्रंटल सेलच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहावे असे आवाहन, राष्ट्रवादी काँग्रेस परळी विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस परळीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा कल्पनाताई आघाव, शहराध्यक्षा सोफियाताई नंबरदार, युवक आघाडी चे तालुकाध्यक्ष गोविंद कराड तसेच अंबाजोगाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, महिला आघाडीच्या पदाधिकारी आदी यांनी केले आहे.


*परळीत येण्याआधी धनंजय मुंडे जाणार गहिनीनाथ गडावर*


आ.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत दरवर्षी संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्याची विशेष महापूजा संपन्न होत असते, मागील सुमारे 20 वर्षांपासून जपलेली ही परंपरा यावर्षी धनंजय मुंडे अपघातग्रस्त असल्याने प्रथमच खंडित झाली होती; त्यावेळी धनंजय मुंडे यांनी देखील आपण बरे झाल्यावर श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर दर्शनासाठी जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार धनंजय मुंडे हे परळीत येण्यापूर्वी रविवारी दुपारी 12.30 वा. हेलिकॉप्टरने श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊंच्या दर्शनासाठी जाणार आहेत. तेथे दर्शन व विधिवत पूजन करूनच ते परळीसाठी रवाना होतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार