परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
🔸राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण: ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन
आळंदी देवाची.......
महात्मा गांधी रक्षाविसर्जन स्तंभ, इंद्रायणी काठी, श्री. क्षेत्र आळंदी देवाची, पुणे येथे रविवार, दि. 12 फेब्रुवारी 2023 सकाळी ठीक 8.30 वाजता ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
30 जानेवारी 1948 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर देशभरातील प्रमुख नद्यांमध्ये गांधीजींच्या रक्षेचे विर्सजन करण्यात आले. पुण्यभूमी आळंदी येथे 12 फेब्रुवारी 1948 रोजी इंद्रायणी नदीमध्ये गांधीजींच्या अस्थींचे विसर्जन झाले. दरवर्षी 12 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे गांधीजींना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. संस्थेतर्फे इंद्रायणी काठी ‘रक्षा विसर्जन स्तंभ’ उभारण्यात आला आहे. गेली 75 वर्षे या परंपरेचे पालन होत आहे. यावर्षी ह. भ. प. श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. गांधीवादी कार्यकर्ते, वारकरी बांधव, ग्रामस्थ, विद्यार्थी, युवक - युवती आणि राष्ट्रपित्याचा आदर करणारे नागरिक अशा समस्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती. आपल्या संपर्कातील समविचारी व्यक्तींना हे निमंत्रण दयावे, असे आवाहन महाराष्ट्र गांधी स्मारक निधी करीत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा