MB NEWS:पोस्ट ऑफिस उघडं आहे या विनोदी मलिकेत साकारत आहे गवारे ची भूमिका...

परळीचा सुपुत्र परमेश्वर गुट्टे पुन्हा झळकतोय सोनी मराठीवर

पोस्ट ऑफिस उघडं आहे या विनोदी मलिकेत साकारत आहे गवारे ची भूमिका...


रुपेरी पडद्यावर दिसण्याचे स्वप्नं अनेकजण पाहात असतात पण आजच्या या स्पर्धेच्या जगात त्यांचीच स्वप्न पुर्ण होतात ज्यांच्यामध्ये जिद्द व चिकाटी असते आणि ज्यांची सातत्यपूर्ण प्रयत्न करत स्वतःच्या अंगी असलेल्या कालगुनांना विकसित करण्यासाठी मेहनत करण्याची तयारी असते. 


याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे परमेश्वर गुट्टे. अंगी असलेल्या कालगुनांमुळे आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे परिवारात कला क्षेत्रातली अगदी कसलीच पार्श्वभूमी नसतानाही या तरुणाने आपल्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे आणि मेहनतीमुळे परळीपासून ते मुंबईपर्यंत अगदी मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे पुर्ण केला आहे.


परमेश्वर त्याच्या अभिनयातुन कला विश्वात स्वतःची प्रगती तर करतच आहे पण तो त्याच्या कर्तृत्वातून आपल्या शहराचे देखील नावलौकीक करत आहे. 


त्याने आत्तापर्यंतच्या अभिनय क्षेत्रातल्या यशस्वी प्रवासात कॅलर्स मराठी वरील ‘तु माझा सांगाती,’ बाळु मामाच्या नावान चांगभल, काय घडल त्या रात्री, स्वराज्य जननी जिजामाता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,अशा अनेक मालिकांमधून उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. 


सध्या मराठी मालिकांमध्ये बहुचर्चीत आणि अत्यंत कमी कालावधीत गाजत असलेल्या सोनी मराठी या वहिनीवरील ‘पोस्ट ऑफिस उघड आहे’ या विनोदी मालिकेतून तो ‘पारगावचा युवा नेता’ या भुमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


या मलिकेत परमेश्वर मकरंद अनासपुरे, समीर चौघुले, वनिता खरात, दत्तू मोरे ,शिवाली परब अशा दिग्गज कलाकारांसोबत काम करत आहे. 


या मालिकेचे प्रसारण गुरवार ते शनिवार रात्री 9.00 वाजता केले जात आहे. या मालिकेला महाराष्ट्रभरातुन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आपणही आपल्या परळीच्या सुपुत्राचा अभिनय पाहण्यासाठी ही मालिका नक्की पाहाल याची आम्हाला खात्री आहे. आपल्या शहराच्या लाडक्या कलाकाराला त्याच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.....!

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार