नाकर्ते शासन व आडमुठेपणा करणार्‍या बँकेच्या धोरणाविरोधात शेतकरी रस्त्यावर


परळीत शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत धरणे आंदोलन!
● मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समिती रस्त्यावर ●


परळी वैजनाथ /प्रतिनिधी. ..


  •                शेतकर्‍यांच्या प्रश्नांबाबत  परळीच्या तहसिलदारांमार्फत शासनाला यापूर्वी  निवेदन देण्यात आले असून, यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या जिव्हाळ्याच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील शेतकर्‍यांच्या समितीने आज दि.28 ऑगस्ट रोजी विविध मागण्यांसाठी परळीच्या स्टेट बँक ऑफ इंडीया समोर धरणे आंदोलन केले.




            शेतकर्‍यांच्या समितीने यापूर्वीच  निवेदनाद्वारे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेला कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी करा, कर्जमाफीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करा, सर्व बँकांची कृषी कर्ज वाटपाचे करारपत्रक मराठी भाषेत करा, पीक कर्ज वाटपाचा लक्षांक 100% करा, पीक कर्ज वाटपाच्या प्रति हेक्टर स्केल ऑफ फायनान्समध्ये वाढ करण्यात यावी, आरबीआयच्या सुचनेप्रमाणे 1 लाखापर्यंतचा बोजा शेतकर्‍यांच्या सातबारावर टाकू नये व टाकण्यात आलेला बोजा तात्काळ कमी करण्यात यावा, कर्जमाफी जाहिर केलेल्या तारखेपासूनची व्याजआकारणी करू नये, पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, शासनाच्या सुचनेनुसार नोड्युज न घेता स्वयंघोषणापत्र घेवून कर्जवाटप योजना राबवावी, कृषी कर्ज वाटप योजनेबाबत बँकांनी सहकार्य न केल्यास त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी, पीकविमा योजनेसोबतच अनुदानाची रक्कम शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात जमा न करता बचत खात्यावर जमा करून ती होल्डवर ठेवू नये अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.निवेदनावर शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी उत्तमराव माने, अमोल राडकर, कैलास सोळंके आदींसह शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
@@@
 आंदोलन तीव्र करण्याचा इशारा....
     दरम्यान या आंदोलनानंतर नाकर्ते शासन व आडमुठेपणा करणार्‍या बँकेच्या धोरणात अपेक्षित बदल झाला नाही तर संपूर्ण शेतकरी रस्त्यावर उतरून यापेक्षा तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?