सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

पंकजा मुंडेंबद्दल फेसबुकवर अक्षेपार्ह पोस्ट: परळीत पोलिसांनी एकाला केली अटक


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
       भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांच्या बद्दल निवडणूक निकालानंतर अतिशय आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी परळीतील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली आहे.
        याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार  परळी शहरातील गणेशपार भागात राहणारा गणेश हरिभाऊ सावंत या युवकाने फेसबुकवर निवडणूक निकालानंतर आक्षेपार्ह पोस्ट केली. आरोपीने फेसबुकवर काही कार्यकर्ते नाचत असलेला एक व्हिडिओ टाकून त्या व्हिडिओखाली पंकजा मुंडे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वाक्य लिहून ही पोस्ट व्हायरल केली.यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी सखोल चौकशी करत या युवकावर गुन्हा दाखल करून तात्काळ ताब्यात घेतले.   
        याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस कर्मचारी विष्णू उद्धवराव फड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सामाजिक सलोखा बिघडवला व दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने कृती केली म्हणून परळी शहर पोलीस ठाण्यात कलम 153अ 505(2)भादवि सह कलम 67 आयटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका-पो.नि.संजय लोहकरे

      दरम्यान नुकत्याच निवडणुका पार पडल्या असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सदैव प्रयत्नशील आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर व पोस्टवर पोलिसांची करडी नजर आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याची कृती करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. त्यामुळे सोशल मीडियातून व्यक्त होताना नागरिकांनी आक्षेपार्ह पोस्ट करू नयेत. सर्वांनी शांतता व सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे असे आवाहन परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !