पोस्ट्स

MB NEWS-मराठवाड्यातील एक बहुआयामी प्रतिभावंत साहित्यिक,विचारवंत, संग्राहक, निवेदक, अभ्यासु, 'अनंत छंदी' व्यक्तिमत्त्व हरवले

इमेज
  परळीकरांचे स्नेही व औरंगाबाद आकाशवाणीचे निवेदक 'अनंत छंदी' व्यक्तिमत्त्व अनंत काळे कालवश !     मराठवाड्यातील एक बहुआयामी प्रतिभावंत साहित्यिक,विचारवंत, संग्राहक, निवेदक, अभ्यासु, 'अनंत छंदी' व्यक्तिमत्त्व हरवले     प रळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         परळीत बालपण व शिक्षण झालेले सर्व परिचित परळीकरांचे स्नेही व औरंगाबाद आकाशवाणीचे निवेदक 'अनंत छंदी' व्यक्तिमत्त्व असलेले अनंत काळे कालवश झाले आहेत. आज दि.३० मे रोजी त्यांची पुणे येथे प्राणज्योत मालवली. मराठवाड्यातील एक बहुआयामी साहित्यिक,विचारवंत, संग्राहक,निवेदक, अभ्यासु व्यक्तिमत्त्व हरवले आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने परळीत सर्वस्तरातून शोकसंवेदना व्यक्त होत आहेत.          अनंत  काळे हे असं अनेकांच्या मनातलं आदराचं नाव. अनंत काळे हे १९८० पासून आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावर निवेदक म्हणून कार्यरत होते. कधीही कुणावर  रागावताना किंवा कुणाचा अपमान करताना त्यांना कुणी पाहिलेलं नाही. इतका उच्चकोटीचा संयम कदाचित कोणात असेल असे व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत.त्यामुळेच  प्रत्येकाला त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर वाटतो.

MB NEWS-खळबळजनक: बीडच्या अल्पवयीन मुलीवर कोल्हापूरात अत्याचार

इमेज
  खळबळजनक: बीडच्या अल्पवयीन मुलीवर कोल्हापूरात अत्याचार  बीड- बीडमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांच्या माहितीनुसार, बीड ग्रामीण ठाणे हद्दीतील १६ वर्षीय मुलीची वर्षभरापूर्वी समद महंमद तहसीलदार (१९,रा.खेबळी, ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर) याच्याशी फेसबुकवर ओळख झाली. त्याच्या प्रेमात वाहवत गेलेली मुलगी २४ मे रोजी घरात कोणाला न सांगता बीडहून कोल्हापूरला गेली. तेथील आग्रा येथे २५ मे रोजी एका बंद स्थितीतील विश्रामगृहात त्या दोघांनी मुक्काम केला. यावेळी समद तहसीलदारने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, २६ रोजी सकाळी त्या दोघांना स्थानिकांनी पकडून पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. बीड ग्रामीण ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर अपहरणाचा गुन्हा नोंद होता. आरोपीसह पीडितेला घेऊन पथक बीडमध्ये मुलगा व मुलगी कोल्हापुरात सापडल्याची माहिती मिळाल्यावर बीड ग्रामीण ठाण्याचे पो.नि. संतोष साबळे, सहायक निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.ए.बी.गायकवाड, किशोर राऊत हे २७ म

MB NEWS-परराज्यातील एकाकडून गोळीबार;एक जखमी

इमेज
परराज्यातील एकाकडून गोळीबार;एक जखमी माजलगाव, प्रतिनिधी...           माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास परराज्यातून आलेल्या एका व्यक्तीने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. यात एक जण जखमी झाला. गोळीबार करणाऱ्यास गावकऱ्यांनी कपडे काढून बेदम चोप दिला.          तालखेड या ठिकाणी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास साखर कारखान्याचे काम थांबल्याने काही युवक आनंदाने नाचत होते. तेवढ्यात परराज्यातील तीन ते चार जण असलेली एक जीप तिथे थांबली. त्यातील एक व्यक्तीने अचानक खाली उतरून रस्त्यावर नाचणाऱ्या युवकांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्या व्यक्तीने युवकांवर गोळीबार केला. यात एक युवक गंभीर जखमी झाला.  दरम्यान, ही घटना गावात कळताच गावातील युवक तिथे जमले. त्यांनी रस्त्यात ट्रॅक्टर आडवे लावून जीप अडवली. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीस गाडी खेचत जमावाने त्याचे कपडे काढून बेदम चोप दिला. दरम्यान, जीप मधील अन्य जण पळून गेले. गोळीबारात साहेबराव जाधव (35) गंभीर जखमी झालेला आहे. हे देखील वाचा/पहा🔸 खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇 ख

MB NEWS-परळीत शनैश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा; पालकमंत्री धनंजय मुंडेंसह सर्वस्तरीय भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन

इमेज
  परळीत शनैश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा; पालकमंत्री धनंजय मुंडेंसह सर्वस्तरीय भाविकांनी घेतले मनोभावे दर्शन परळीतील शनि जन्मोत्सवाची संपूर्ण व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी या ओळींवर क्लिक करा. परळी वैजनाथ दि.३० (प्रतिनिधी)           येथे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शनीमंदिर देवस्थान ट्रस्ट च्यावतीने रविवारी (ता.२९) शनैश्वर जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने गुलाल उधळून उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी अखंड शिवनाम सप्ताहा बरोबरच विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.                   येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या शनिमंदिरात गेल्या ३० ते ४० वर्षांपासून दरवर्षी श्री.शनैश्वर जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त धार्मिक कार्यक्रमाबरोबरच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार (ता.२३) ते सोमवार (ता.३१) आठ दिवस किर्तन, भजन, परमरस्य पारायण, रक्तदान शिबीर, अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबीरात ३५ महिला व युवकांनी रक्तदानात सहभाग नोंदवला. आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ शासकीय रक्तपेढ

MB NEWS-परळी- मिरज रेल्वे गाडी आषाढी वारीपुर्वी तरी सुरू व्हावी... यासाठी प्रयत्न गरजेचे

इमेज
  परळी- मिरज रेल्वे गाडी आषाढी वारीपुर्वी तरी सुरू व्हावी... यासाठी  प्रयत्न गरजेचे  प रळी वैजनाथ, प्रतिनिधी..... गेल्या अडीच वर्षांपासून सर्वांना उपयुक्त ठरणारी आणि प्रवाशांचा अत्यंत चांगला प्रतिसाद असलेली परळी- मिरज रेल्वे गाडी आषाढी वारीपुर्वी तरी सुरू व्हावी अशी अपेक्षा भाविक- प्रवाशांनी व्यक्त केली आहे.रेल्वे प्रशासनाकडून याबाबत तातडीने निर्णय होणे अपेक्षित आहे.             मार्च 2020 पासून बंद असलेली परळी -मिरज  पॅसेंजर रेल्वे गाडी अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे . शहरातील भाविक व व्यापाऱ्यांच्या सोयीची असलेली परळी- मिरज रेल्वे गाडी कधी सुरू होणार  असा प्रश्न  प्रवाशी व भावीकांतून उपस्थित केला जात आहे.कोरोना प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून परळी -मिरज रेल्वे गाडी रेल्वे प्रशासनाने बंद केली आहे.परळी रेल्वे स्टेशन मार्गे धावणाऱ्या सर्व गाड्या सुरळीत सुरू झाल्या आहेत. परळी रेल्वे स्टेशन मार्गे 13 रेल्वे गाड्या येतात व  13 रेल्वे गाड्या धावतात. परंतु परळी- मिरज रेल्वे गाडी अद्यापही पूर्वीप्रमाणे धावत नाही.ही रेल्वे  गाडी दोन वर्षापासून रेल्वे प्रशासनाने ब

MB NEWS- *व्यंकटेश्वरा (अंबासाखर) पुढील वर्षी प्रतिदिन 3500 टनाने क्रशिंग करणार - धनंजय मुंडे*

इमेज
  व्यंकटेश्वरा (अंबासाखर) पुढील वर्षी प्रतिदिन 3500 टनाने क्रशिंग करणार - धनंजय मुंडे *ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचा मोबदला देण्यात कमी पडणार नाही - मुंडेंचा शेतकऱ्यांना शब्द*  * व्यंकटेश्वरा (अंबासाखर) कारखान्याच्या गळीत हंगामाची धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत सांगता; 2 लाख 11 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण* अंबाजोगाई (दि. 29) - अंबाजोगाई तालुक्याच्या ग्रीन बेल्टची संजीवनी असलेला व्यंकटेश्वरा सर्व्हिसेस (पूर्वीचा अंबासाखर सह. साखर कारखाना) हा कारखाना मशीनारीची परिस्थिती अत्यंत भयावह असताना, रिस्क घेऊन चालवायला घेतला, तो पैसे कमावण्यासाठी नाही तर या भागातील शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी! उशिरा सुरू झाल्याने यावर्षी क्रशिंग कमी झाली असली तरी पुढील वर्षी मात्र कारखान्याचे अपग्रेडेशन करून याची गाळप क्षमता वाढवून 3500 मेट्रिक टन प्रतिदिन इतकी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.  जुने कर्ज, जुनाट मशिनरी, या गर्तेत बंद अवस्थेत असलेला अंबासाखर कारखाना व्यंकटेश्वरा कंपनीने मोठ्या धाडसाने चालवायला घेतला. परळी, अंबाजोगाई, क

MB NEWS-परळीचा बालगायक अद्वैत चौधरीने लातूरच्या स्पर्धेत पटकावला "टाॅप थ्री" क्रमांक

इमेज
  परळीचा बालगायक अद्वैत चौधरीने लातूरच्या स्पर्धेत पटकावला "टाॅप थ्री" क्रमांक 👉  अद्वैत चौधरीने लातूरच्या स्पर्धेत गायलेल्या गाण्याची झलक पाहण्यासाठी या ओळींवर क्लिक करा. परळी वैजनाथ, प्रतिनिधी.........     महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त लातूर येथे आयोजित जागर समतेचा या सोहळ्याअंतर्गत घेण्यात आलेल्या गायन स्पर्धेत परळीच्या चिमुकल्या गायकाच्या सुरेख गायनाने श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले होते.या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. यामध्ये परळीचा बालगायक अद्वैत कपील चौधरीने   "टाॅप थ्री" क्रमांक पटकावला आहे.त्याचे या यशाबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.         महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त लातूर येथे आयोजित जागर समतेचा या सोहळ्यात विविध उपक्रम राबविले गेले.या अंतर्गत गायन स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेत सहभागी परळीचा बालगायक अद्वैत कपील चौधरी याने सादरीकरणातच श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते.त्याच्या गायकीचे कौतुक होत होते.त्याला साथसंगत संगीत शिक्षिका मंगलताई लिंगाडे यांनी केली.लातूर येथे दयानंद सभागृहात या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या

MB NEWSराजमाता अहिल्यामाई होळकर जयंतीनिमित्त औष्णिक वीज केंद्र येथे हॉलीबॉल स्पर्धा मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते झाले उद्घाटन

इमेज
  राजमाता अहिल्यामाई होळकर  जयंतीनिमित्त औष्णिक वीज केंद्र येथे हॉलीबॉल स्पर्धा  मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते झाले उद्घाटन . परळी वै. (प्रतिनिधी) राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ व्या जयंती निमित्त औष्णिक वीज केंद्र परळी वै. येथे  दिनांक २७ मे रोजी हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस वंदन करून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उदघाटन संपन्न झाले. यावेळी विचारमंचावर उपमुख्य अभियंता शाम राठोड,डी जि इंगळे, कल्याण अधिकारी दिलीप वंजारी, हरिभाऊ मैंदाड,  जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष तथा कार्यकारी अभियंता अरविंद येळे, सचिव विशाल गिरे,  ज्ञानेश्र्वर बिडगर, डी. एन देवकते, , सुधीर मुंडे,मनोज जाधव,   कार्यकारी अभियंता कोकाटे, मोमीन, इंजिनीरिंग सोसायटी चे अध्यक्ष शाहु येवते यांच्यासह औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अहिल्यामाई होळकर जयंती उत्सव उत्कृषटरित्या अयोजन केल्या बद्दल अरविंद येळे यांचा

MB NEWS-सुरक्षितता अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता हरिभाऊ मैंदाड यांची पदोन्नती

इमेज
  सुरक्षितता अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता  हरिभाऊ मैंदाड यांची पदोन्नती उत्कृष्ट  कामगिरी बजावल्यामुळे  मुख्य अभियंता  मोहन आव्हाड यांच्या हस्ते मैंदाड यांचा सत्कार परळी  प्रतिनिधी मागील  बारा वर्षापासून औष्णिक विद्युत केंद्र परळी येथे कार्यरत असलेले हरिभाऊ मैंदाड सुरक्षितता अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता यांची पदोन्नती अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदावर पारस औष्णिक केंद्र येथे बदली झाली, या निमित्त त्यांना दिनांक 27मे रोजी परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रशासनातर्फे भाऊक वातावरणात निरोप देण्यात आला. सविस्तर माहिती अशी की, महानिर्मिती कंपनीमध्ये ऑगस्ट 2008 साली रुजू झालेले अभियंता  हरीभाऊ मैंदाड यांनी कोयना जलविद्युत केंद्र येथे दोन वर्ष तर परळी औष्णिक विद्युत केंद्र येथे गेली बारा वर्ष उत्कृष्ट अशी कामगिरी बजावल्यामुळे परळी औष्णिक विद्युत केंद्रचे मुख्य अभियंता  मोहन आव्हाड, उपमुख्य अभियंता एच. कें. अवचार, उपमुख्य अभियंता शाम राठोड, अधीक्षक अभियंता  दिनकर इंगळे, कल्याण अधिकारी  डी.जी.वंजारी यांनी पुढील जबाबदारीसाठी पारस येथील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. सोबतच सुरक्षितता व अग्निशम

MB NEWS-व्यंकटेश्वरा प्रा. लि. अंबासाखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा होणार धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत समारोप

इमेज
  व्यंकटेश्वरा प्रा. लि. अंबासाखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा होणार धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत समारोप अंबाजोगाई (दि. 28) - व्यंकटेश्वरा प्रा. लि. (अंबासाखर साखर कारखाना, अंबाजोगाई) या कारखान्याच्या सन 2021-22 या गळीत हंगामाचा समारोप राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 29)दुपारी 1 वाजता सांगता समारोप होणार आहे. अंबासाखर कारखान्याला अधिकचे ऊस क्षेत्र व यावर्षी ऊसाची झालेली अगतिक परिस्थिती लक्षात घेत धनंजय मुंडे यांच्या मार्फत व्यंकटेश्वरा या कंपनीने भाडे तत्वावर चालवण्यासाठी घेतले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील या कारखान्याने आजपर्यंत 2 लाख 11 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केल्याने, अंबाजोगाई, परळी, केज आदी तालुक्यांसाह या भागातील ऊसाच्या प्रश्नी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  व्यंकटेश्वरा ने ऊस गाळप बरोबरच 31 मार्च 2022 पर्यंत ची शेतकरी, वाहतूकदार, तोडणी या सर्वांची देयके देखील अदा केल्याने, या भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला. या कारखान्याचा या वर्षीचा गळीत हंगाम संपुष्टा

MB NEWS-दारावती तांडा येथील 11 वर्षांपासुन सर्वाधिक ऊसवाहतुक करणार्या प्रेमदास पवार यांचा डॉ.संतोष मुंडे यांच्याकडुन सन्मान

इमेज
  दारावती तांडा येथील 11 वर्षांपासुन सर्वाधिक ऊसवाहतुक करणार्या प्रेमदास पवार यांचा डॉ.संतोष मुंडे यांच्याकडुन सन्मान  परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-   सिध्दी शुगर साखर कारखान्यासाठी ऊस वाहतुक करणारे परळी तालुक्यातील दारावती तांडा येथील  प्रेमदास पवार यांनी आपल्या ट्रक,ट्रॅक्टर व मिनी ट्रॅक्टरद्वारे सर्वाधिक ऊस वाहतुक करुन विक्रम केला आहे.त्यांचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र मंडळाचे डॉ.संतोष मुंडे यांनी सन्मान केला.      तालुक्यातील दारावती तांडा येथील प्रेमदास पवार हे  सिध्दी शुगर कारखाण्यास ऊस वाहतुक करतात.गत 11 वर्षांपासुन  MH 22 AA 1111 ट्रक,MH 44 Z 1011 ट्रॅक्टर व MH 44 D 4134 या मिनी ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतुक करुन सर्वाधिक ऊस वाहतुक करुन विक्रम केल्याबद्दल राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र मंडळाचे डॉ.संतोष मुंडे यांच्या प्रेमदास पवार यांचा सन्मान करत पाठीवर कार्याची थाप दिली.            यावेळी डॉ.संतोष मुंडे,संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिध्देश्वर मुंडे, सचिन मुंडे, गुरूदत्त कराड,विठ्ठल साखरे, दहिफळ