MB NEWS-व्यंकटेश्वरा प्रा. लि. अंबासाखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा होणार धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत समारोप

 व्यंकटेश्वरा प्रा. लि. अंबासाखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा होणार धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत समारोप



अंबाजोगाई (दि. 28) - व्यंकटेश्वरा प्रा. लि. (अंबासाखर साखर कारखाना, अंबाजोगाई) या कारखान्याच्या सन 2021-22 या गळीत हंगामाचा समारोप राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. 29)दुपारी 1 वाजता सांगता समारोप होणार आहे.


अंबासाखर कारखान्याला अधिकचे ऊस क्षेत्र व यावर्षी ऊसाची झालेली अगतिक परिस्थिती लक्षात घेत धनंजय मुंडे यांच्या मार्फत व्यंकटेश्वरा या कंपनीने भाडे तत्वावर चालवण्यासाठी घेतले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील या कारखान्याने आजपर्यंत 2 लाख 11 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केल्याने, अंबाजोगाई, परळी, केज आदी तालुक्यांसाह या भागातील ऊसाच्या प्रश्नी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


व्यंकटेश्वरा ने ऊस गाळप बरोबरच 31 मार्च 2022 पर्यंत ची शेतकरी, वाहतूकदार, तोडणी या सर्वांची देयके देखील अदा केल्याने, या भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला. या कारखान्याचा या वर्षीचा गळीत हंगाम संपुष्टात आला असून, रविवारी दुपारी 1 वाजता ना. धनंजय मुंडे यांच्यासह  

आमदार प्रकाश दादा सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार संदीप भैया क्षिरसागर, आमदार बाळासाहेब आजबे काका,आमदार संजय भाऊ दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, येडेश्वरी कारखान्याचे चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजकिशोर पापा मोदी, विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख, ज्येष्ठ नेते दत्ता आबा पाटील, विलास काका सोनवणे, बाळासाहेब देशमुख केज विधानसभा अध्यक्ष , वाल्मीक अण्णा कराड जिल्हा नियोजन समिती सदस्य,शेख मेहबूब राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष, बाबुराव पोटभरे सदस्य जिल्हा नियोजन समिती, बन्सी आण्णा  सिरसाट अध्यक्ष मजूर फेडरेशन, बबन भैय्या लोमटे उपनगराध्यक्ष न. प.अंबाजोगाई, ताराचंद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अंबाजोगाई ,लक्ष्मण तात्या पौळ तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी परळी, बाळासाहेब माले अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती,बालासाहेब गंगणे अध्यक्ष रोजगार हमी योजना समिती, शंकर उबाळे जिल्हा परिषद सदस्य, बाळासाहेब शेप जिल्हा परिषद सदस्य, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या गळीत हंगामाची सांगता होणार असून, या कार्यक्रमास सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी-कर्मचारी आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन व्यंकटेश्वरा प्रशासनाने केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !