जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

MB NEWS-मराठवाड्यातील एक बहुआयामी प्रतिभावंत साहित्यिक,विचारवंत, संग्राहक, निवेदक, अभ्यासु, 'अनंत छंदी' व्यक्तिमत्त्व हरवले

 परळीकरांचे स्नेही व औरंगाबाद आकाशवाणीचे निवेदक 'अनंत छंदी' व्यक्तिमत्त्व अनंत काळे कालवश !

 


 मराठवाड्यातील एक बहुआयामी प्रतिभावंत साहित्यिक,विचारवंत, संग्राहक, निवेदक, अभ्यासु, 'अनंत छंदी' व्यक्तिमत्त्व हरवले 

  

रळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

        परळीत बालपण व शिक्षण झालेले सर्व परिचित परळीकरांचे स्नेही व औरंगाबाद आकाशवाणीचे निवेदक 'अनंत छंदी' व्यक्तिमत्त्व असलेले अनंत काळे कालवश झाले आहेत. आज दि.३० मे रोजी त्यांची पुणे येथे प्राणज्योत मालवली. मराठवाड्यातील एक बहुआयामी साहित्यिक,विचारवंत, संग्राहक,निवेदक, अभ्यासु व्यक्तिमत्त्व हरवले आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने परळीत सर्वस्तरातून शोकसंवेदना व्यक्त होत आहेत.

         अनंत  काळे हे असं अनेकांच्या मनातलं आदराचं नाव. अनंत काळे हे १९८० पासून आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावर निवेदक म्हणून कार्यरत होते. कधीही कुणावर  रागावताना किंवा कुणाचा अपमान करताना त्यांना कुणी पाहिलेलं नाही. इतका उच्चकोटीचा संयम कदाचित कोणात असेल असे व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत.त्यामुळेच  प्रत्येकाला त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर वाटतो. त्यांचे बालपण व शिक्षण परळीत झाले होते.त्यामुळे परळी व परळीकरांशी त्यांचे भावनिक स्नेहसंबंध होते. काही दिवसांपूर्वीच ते औरंगाबादहून पुणे येथे स्थाईक झाले होते.आज दि.३० रोजी पहाटे च्या सुमारास ह्रदयविकाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे, २ भाऊ - वहिनी,  सुना, नातवंडे, १ बहिण असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी संस्कार पुणे येथे  करण्यात आला.पत्रकार अमृता काळे यांचे ते वडील होत.

 अनंत काळे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा थोडक्यात परिचय....

   मुळ धारुरचे असलेले अनंत काळे हे नोकरीच्या निमित्तानं ते औरंगाबाद आकाशवाणीत दाखल झाले आणि त्यांच्यातल्या सर्जनशीलतेचं रोपटं इथचं रूजलं. विविध कार्यक्रमांचं सूत्रसंचालन, कथाकथन, काव्यवाचन, व्याख्यानं, नाटक, गाणी, चारोळ्या निर्मिती या साऱ्या विशेष आवडी त्यांचा वेलू गगनावरी गेला. त्याचसोबत त्यांना अनेक छंद आहेत. जसे, नियतकालिकांचा संग्रह करण्याचा छंद, वृत्तपत्रीय पुरवण्यांचा संग्रह, स्मरणिकांचा संग्रह याचबरोबर १९७१ पासून हस्तलिखित वृत्तपत्र संकेत प्रकाशित करण्याचा छंद. संकेत या अभिनव हस्तलिखित वृत्तपत्राचं पस्तीस वर्षे  संपादक म्हणून काम पाहिले. या अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आशिया खंडातील हे एकमेव हस्तलिखत आहे. या आगळ्यावेगळ्या छंदाची दूरदर्शनच्या राष्ट्रीय ‘सुरभी’ कार्यक्रमानं दखल घेऊन त्यांची मुलाखत प्रक्षेपित केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमातून प्रक्षेपित होणारी मराठवाड्यातील ही पहिलीच मुलाखत होती.याच बरोबर दुर्मिळ मासिक, पुस्तकं, छायाचित्र, स्मरणिका, नाणी, तिकिट, किचेन्स, हस्ताक्षरपत्र, या सर्व गोष्टींचा संग्रह त्यांच्याकडे आहे. 

         बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अनंत काळे यांचा समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक पुरस्कार देवून सन्मान केलेला आहे त्यात मानव कल्याण पुनर्वसन सेवार्थ गौरव पुरस्कार, सिरॉक इंडिया सेवार्थ पुरस्कार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा भूषण गौरव पुरस्कार, मधुगंध काव्य पुरस्कार, लाहोटी प्रतिष्ठान-परळी वैजनाथ पुरस्कार तसेच शालेय व महाविद्यालयीन राज्य पातळीवरील विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अनेक छंदी व्यक्तिमत्त्व असलेल्या अनंत काळे यांचा ‘पत्रांकित द्वारकामाई’ हा लेखसंग्रह तर ‘शब्दपत्री’ हे पत्रसंग्रहाचं संकलन आणि खिडकी हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यासाठी त्यांना पुरस्कारांने गौरविण्यात आलेले आहे.

       1968 पासून पत्रकारितेत त्यांनी काम केले. महाराष्ट्रातील प्रतिथयश वृत्तपत्रांचे प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे. ज्यात आचार्य अत्रे  संपादित दै.' मराठा ' सोबतच दै.संचार, विश्व समाचार,गोदातीर समाचार, प्रजावाणी, झुंजारनेता, चंपावतीपत्र,आणि  काही साप्ताहिकं याशिवाय दै.लोकविजय आणि साप्ताहिक आंदोलन नियतकालिकांत काही वर्षे प्रत्यक्ष संपादकीय विभागात त्यांनी काम केले.1967 -- 68 दरम्यान दै.बोंबाबोंब ' हस्तलिखित वृत्तपत्राची निर्मीती,01 मे 1972 ला ' स्वप्नसुधा ' हस्तलिखित मासिकाची निर्मिती, फेब्रुवारी 1975 पासून स्वतंत्र ' संकेत ' हस्तलिखित अभिनव अनियतकालिक वृत्तपत्राचं संपादकत्व.1986 पासून मुद्रीत ' विश्वसंकेत ''दिवाळी वार्षिकांकाचं संपादन तसंच विशेषांकाचं प्रकाशन, 1994 पासून आकाशवाणी औरंगाबाद केंद्रासाठी ' उद्घोष ' या भित्तीपत्रकाचे संपादक म्हणून काही काळ काम.1979 -- 80 या कालावधीत मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागाच्या ' वृत्ताविष्कार 'आणि ' वृत्तसाधना ' नियतकालिकांचं संपादन त्यांनी केले. त्यांच्या वैयक्तिक ग्रंथ संग्रहात सुमारे 80 वर्षां पूर्वीच्या विविध वृत्तपत्रांच्या पुरवण्या असून त्यांच्या वर्गवारीप्रमाणे तारीखवार बाईंड करून ठेवल्या आहेत. ईतर नियतकालिकांचे जवळपास एकहजाराहून अधिक विशेषांक आहेत.स्वत:चं ग्रंथ संग्रहालय असून किमान दहा हजार पुस्तके त्यामध्ये आहेत. तसेच अनेक दुर्मिळ ग्रंथही आहेत.

        लेखक म्हणून ' कल्याणमस्तु ' कविता संग्रह,' वास्तव ' चारोळी संग्रह,' सर्वव्यापी ' लेखसंग्रह आणि संपादीत चार पुस्तकं आहेत. कथाकथन, काव्यवाचन, सूत्रसंचालन, असे कार्यक्रम करतो.नट्याभिनय, गायन , हस्तकौशल्य असेही छंद त्यांनी जोपासले.आकाशवाणी औरंगाबाद इथे  वरिष्ठ निवेदक म्हणून पस्तीस वर्षे नोकरी करून 2013 साली सेवानिवृत्त झाले.त्यानंतर साडेतीन वर्षे ' ज्ञानवाणी औरंगाबाद FM रेडिओ '  चं केंद्र संचालक म्हणून काम पाहिले.प्रकाशक या नात्यानं त्यांनी इतर साहित्यिकांची सुमारे सत्तर पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यांच्या निधनाने मराठवाड्यातील एक बहुआयामी साहित्यिक,विचारवंत, संग्राहक,निवेदक, अभ्यासु व्यक्तिमत्त्व हरवले आहे. त्यांच्या निधनाने काळे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

🏵️ *परळीत अभिनव पद्धतीने जयंती: राजमाता अहिल्यादेवींच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक व साडीचोळीने श्रृंगार...!*

 एकाकडून गोळीबार;एक जखमी*

• खळबळजनक: बीडच्या अल्पवयीन मुलीवर कोल्हापूरात अत्याचार*  

• 🏵️ *परळी- मिरज रेल्वे गाडी आषाढी वारीपुर्वी तरी सुरू व्हावी...... !* 👉 *_यासाठी सामुहिक प्रयत्न गरजेचे_*

• 🏵️ *परळीत पारंपरिक पद्धतीने शनैश्वर जन्मोत्सव; पालकमंत्री धनंजय मुंडेंसह भाविकांनी घेतले दर्शन.*

•  *तालुका आरोग्य अधिकारी कार्यालया समोर आशा आक्रमक;मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार.

• 🛑 विधान परिषदेत स्वपक्षाकडून बीडच्या "या" दिग्गजांना मिळेल संधी?

• *ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचा मोबदला देण्यात कमी पडणार नाही -धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांना शब्द

• *खा.सुप्रिया सुळे गोपीनाथ गडावर नतमस्तक!*

• *पंकजा मुंडेंचे मोठे महत्त्वपूर्ण 'विधान'.........!*

• 🛑 परळीचा बालगायक अद्वैत चौधरीने लातूरच्या स्पर्धेत पटकावला "टाॅप थ्री" क्रमांक

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• 🔘 दौऱ्यात भेटायला येणारांना खा. सुप्रिया सुळे यांनी केले 'हे' आवाहन

• ३ जून ची चाहूल..अन् पंकजाताई मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

• 🔘 तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !

• 🏵️ *भाशिप्र संस्थेत संघ विचारांचा पॅनल जिंकल्याचा मला आनंद - पंकजा मुंडे*

•  केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

• *परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक

• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• खड्डयात पडून युवकाचा मृत्यू

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• 🏵️ *राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!!:-भिवा बिडगर,परळी वैजनाथ.*


जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸
बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क- महादेव शिंदे 7709500179 , प्रा.रविंद्र जोशी 9850642717.





जाहीरात/Advertis

🔸 MB NEWS/माझी बातमी🔸


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?