जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

MB NEWS- *व्यंकटेश्वरा (अंबासाखर) पुढील वर्षी प्रतिदिन 3500 टनाने क्रशिंग करणार - धनंजय मुंडे*

 व्यंकटेश्वरा (अंबासाखर) पुढील वर्षी प्रतिदिन 3500 टनाने क्रशिंग करणार - धनंजय मुंडे



*ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचा मोबदला देण्यात कमी पडणार नाही - मुंडेंचा शेतकऱ्यांना शब्द* 


*व्यंकटेश्वरा (अंबासाखर) कारखान्याच्या गळीत हंगामाची धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत सांगता; 2 लाख 11 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण*



अंबाजोगाई (दि. 29) - अंबाजोगाई तालुक्याच्या ग्रीन बेल्टची संजीवनी असलेला व्यंकटेश्वरा सर्व्हिसेस (पूर्वीचा अंबासाखर सह. साखर कारखाना) हा कारखाना मशीनारीची परिस्थिती अत्यंत भयावह असताना, रिस्क घेऊन चालवायला घेतला, तो पैसे कमावण्यासाठी नाही तर या भागातील शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी! उशिरा सुरू झाल्याने यावर्षी क्रशिंग कमी झाली असली तरी पुढील वर्षी मात्र कारखान्याचे अपग्रेडेशन करून याची गाळप क्षमता वाढवून 3500 मेट्रिक टन प्रतिदिन इतकी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. 


जुने कर्ज, जुनाट मशिनरी, या गर्तेत बंद अवस्थेत असलेला अंबासाखर कारखाना व्यंकटेश्वरा कंपनीने मोठ्या धाडसाने चालवायला घेतला. परळी, अंबाजोगाई, केज आदी तालुक्यांसह  संपूर्ण बीड जिल्ह्यातील ऊस गाळप होण्यासाठी प्रशासन व विविध कारखान्यांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न केले. व्यंकटेश्वराने सन 2021-22 सिझन मध्ये 2 लाख 11 हजार मेट्रिक टन उसाचे यशस्वी गाळप केले, हा कारखाना चालु होईल, असे कुणालाही वाटत नव्हते, परंतु या भागातील शेतकऱ्यांच्या ऊसाचे प्रश्न लक्षात घेऊन हे धाडस केले, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.


 व्यंकटेश्वरा मार्फत अंबासाखर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा आज धनंजय मुंडे यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता समारंभ संपन्न झाला. यावेळी कारखान्याने गाळप झालेल्या उसापैकी 31 मार्च 2022 पर्यंतची संपूर्ण देयके, ऊस तोडणी, वाहतूकदार यांचेही देयके अदा केली असून, 15 एप्रिल पर्यंतची देयके देखील येत्या आठवड्यात जमा करणार असल्याचे सांगितले; तसेच कारखाना प्रशासन शेतकऱ्यांच्या श्रमाचे मोल देण्यात कुठेही कमी पडणार नाही, आलेल्या साखर उताऱ्याच्या प्रमाणात एफ आर पी पेक्षा एक रुपया का असेना पण अधिक दिला जाईल, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.


*...तर वैद्यनाथही चालवायला घेऊ!*


दरम्यान अंबासाखर कारखाना उभारणीत स्व. डी एन पाटील, बाबुराव आडसकर आदींचे तसेच स्व. पंडित अण्णा मुंडे, स्व. गोपीनाथराव मुंडे यांचेही योगदान आहे. त्यांच्या कामाच्या प्रेरणेतूनच आपण हा कारखाना चालऊ शकलो आहोत, असेही धनंजय मुंडे म्हणाले.


व्यंकटेश्वरा ने शेतकऱ्यांना 31 मार्च पर्यंतचे पैसे दिले, वैद्यनाथ कारखान्याने मात्र हे पाहून आता शेतकऱ्यांना 1500 रुपये प्रति टनाने पैसे द्यायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे थकवून तथाकथित लोकनेत्यांना झोप कशी लागत असेल असा सवाल धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ कारखान्याच्या कारभारावर उपस्थित केला. ज्या वैद्यनाथ कारखान्यात स्व. अण्णा व स्व. मुंडे साहेबांचा घाम आणि रक्त आहे, त्या कारखान्याला गत वैभव आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देऊ तसेच शेतकरी हितार्थ कारखाना चालवून दाखवू, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ कारखान्याची आगामी निवडणूक ताकतीने लढणार असल्याचे संकेत दिले. 


यावेळी आ. प्रकाश सोळंके, आ. संजय भाऊ दौंड, बजरंग बप्पा सोनवणे, राजेश्वर आबा चव्हाण, राजकिशोर मोदी यांनीही आपले मनोगत मांडत धनंजय मुंडे यांचे शेतकरी वर्गाच्या वतीने आभार मानले. 


धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून अंबाजोगाई तालुक्यात सुमारे 370 कोटी रुपयांची विकास कामे हाती घेण्यात आली असल्याचे सांगत, सर्वच सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांचा उल्लेख करून दाखवला.


यावेळी कारखान्याच्या गव्हाणीची सांगता पूजा धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ऊसतोडणी व वाहतूकदारांचे सन्मानही करण्यात आले. व्यासपीठावर ना. धनंजय मुंडे यांच्या सह, आ. प्रकाशदादा सोळंके, मा.आ.संजयभाऊ दौंड, मा. आ. पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मिकआण्णा कराड, येडेश्वरी चे चेअरमन बजरंगबप्पा सोनवणे, मा.राजकिशोर मोदी, दत्ता (आबा) पाटील, बाळासाहेब देशमुख, बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे, बन्सीआण्णा सिरसाट, शिवाजीराव सिरसाट, युवा नेते अभय मुंडे, बबनभैय्या लोमटे, विलासकाका सोनवणे, रा. कॉ. चे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे, परळीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणतात्या पौळ, बाळासाहेब माले, बालासाहेब गंगणे, शंकर उबाळे, बालासाहेब शेप, विष्णुपंत सोळंके, माऊली गडदे, मनोज लखेरा, तानाजी देशमुख, रणजित चाचा लोमटे, विलासबापु मोरे, व्यंकटेश चामनर, बाळासाहेब देशमुख, बी.सी.गंगणे, बंडु भारजकर, बालाजी शेरेकर, सुनिल व्यवहारे,  नागनाथ मुरकूटे, ह.भ.प.लालासाहेब पवार, संगिताताई तुपसागर, बालाजी मुंडे, सुर्यभान मुंडे,  प्रभाकर पौळ, नंदुदादा मोराळे, कांता फड, बंडू भारजकर, बालाजी शेरेकर, सुनील व्यवहारे, नागनाथ महाराज मुरकुटे, सौ. संगीताताई तुपसागर तसेच कारखाण्याचे संचालक, सभासद, शेतकरी, खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

खळबळजनक: बीडच्या अल्पवयीन मुलीवर कोल्हापूरात अत्याचार*  

• *खा.सुप्रिया सुळे गोपीनाथ गडावर नतमस्तक!*

• *पंकजा मुंडेंचे मोठे महत्त्वपूर्ण 'विधान'.........!*

• 🔘 दौऱ्यात भेटायला येणारांना खा. सुप्रिया सुळे यांनी केले 'हे' आवाहन

• ३ जून ची चाहूल..अन् पंकजाताई मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

• 🔘 तुम्हाला आता परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना कधीही जाउन भेटता येणार नाही !

• 🏵️ *भाशिप्र संस्थेत संघ विचारांचा पॅनल जिंकल्याचा मला आनंद - पंकजा मुंडे*

•  केज-कळंब रस्त्यावर एसटी व मोटारसायकल अपघातातील जखमीचा मृत्यू

• *परळीतील निराधारांच्या मेळाव्यात चोरट्यांनी शोधला 'आधार' !* _खिसेकापुंनी चार जणांचे पैसै पळवल्याची पोलीसात नोंद_

• १४ लाखाची फसवणुक प्रकरणी 'त्या' भामट्यांना अटक

• 🔸 भाशिप्र निवडणुकीत पत्की-मस्के गटाचा दणदणीत पराभव • हिरा चमकला, 20 पैकी 19 जाग्यावर उत्कर्ष झाला

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• खड्डयात पडून युवकाचा मृत्यू

• थरारक घटना:धावत्या दुचाकीवर चाकूने वार करून बहिणीच्या प्रियकराची हत्या

•  अपघात: धारुर- केज रस्त्यावर शिक्षक ठार

• मोंढ्यातील कृषी सेवा केंद्र फोडलं; तिजोरीसह ७१ हजारांवर डल्ला

• जमीन नावावर करुन दे म्हणत सख्खा मुलगा व नातवाने केली ८०वर्षिय वृद्धाला मारहाण

• परळीतील डॉ.रजत लक्ष्मिनारायण लोहिया बनले शल्यविशारद (एम. एस.)

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• पाण्यात बुडुन मृत्यू पावलेल्या "त्या" युवकाचा मृतदेह २४ तासानंतर लागला हाती

• परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

• *ऊसतोड कामगारांचे श्रम कमी व्हावेत यासाठी बॅटरीवर चालणारा कोयता आणण्यासाठी प्रयत्नशील - धनंजय मुंडे*

• *धनंजय मुंडेंचे परळीत उद्या (रविवार) पासून 'राष्ट्रवादी आपल्या दारी' अभियान*

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?