MB NEWSराजमाता अहिल्यामाई होळकर जयंतीनिमित्त औष्णिक वीज केंद्र येथे हॉलीबॉल स्पर्धा मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते झाले उद्घाटन

 राजमाता अहिल्यामाई होळकर  जयंतीनिमित्त औष्णिक वीज केंद्र येथे हॉलीबॉल स्पर्धा 



मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते झाले उद्घाटन.


परळी वै. (प्रतिनिधी) राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ व्या जयंती निमित्त औष्णिक वीज केंद्र परळी वै. येथे  दिनांक २७ मे रोजी हॉलीबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस वंदन करून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उदघाटन संपन्न झाले. यावेळी विचारमंचावर उपमुख्य अभियंता शाम राठोड,डी जि इंगळे, कल्याण अधिकारी दिलीप वंजारी, हरिभाऊ मैंदाड,  जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष तथा कार्यकारी अभियंता अरविंद येळे, सचिव विशाल गिरे,  ज्ञानेश्र्वर बिडगर, डी. एन देवकते, , सुधीर मुंडे,मनोज जाधव,   कार्यकारी अभियंता कोकाटे, मोमीन, इंजिनीरिंग सोसायटी चे अध्यक्ष शाहु येवते यांच्यासह औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अहिल्यामाई होळकर जयंती उत्सव उत्कृषटरित्या अयोजन केल्या बद्दल अरविंद येळे यांचा विशेष सत्कार मुख्याभियांता आव्हाड यांनी केला. यावेळी पत्रकार भगवान साकसमुद्रे होते.

 


सदर स्पर्धेमध्ये एकूण आठ संघांनी सहभाग नोंदवला अंतिम सामना मॉर्निंग हॉलिबॉल विरुद्ध सी एच पी  ब्लॅक डायमंड यांच्यात झाला यामध्ये मॉर्निंग हॉलीबॉल हा संघ विजेता ठरला विजय संघाचे कप्तान मीटिंग स्वामी यांना चषक देण्यात आला तर उपविजेता संघाचे कप्तान मनोज तांबाटी यांना ट्रॉफी देण्यात आली पंच म्हणून सचिन शेळके आणि राजू घुले आणि अतुल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार