MB NEWS-सुरक्षितता अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता हरिभाऊ मैंदाड यांची पदोन्नती

  सुरक्षितता अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता  हरिभाऊ मैंदाड यांची पदोन्नती



उत्कृष्ट  कामगिरी बजावल्यामुळे  मुख्य अभियंता  मोहन आव्हाड यांच्या हस्ते मैंदाड यांचा सत्कार


परळी  प्रतिनिधी



मागील  बारा वर्षापासून औष्णिक विद्युत केंद्र परळी येथे कार्यरत असलेले हरिभाऊ मैंदाड सुरक्षितता अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता यांची पदोन्नती अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदावर पारस औष्णिक केंद्र येथे बदली झाली, या निमित्त त्यांना दिनांक 27मे रोजी परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रशासनातर्फे भाऊक वातावरणात निरोप देण्यात आला.

सविस्तर माहिती अशी की, महानिर्मिती कंपनीमध्ये ऑगस्ट 2008 साली रुजू झालेले अभियंता  हरीभाऊ मैंदाड यांनी कोयना जलविद्युत केंद्र येथे दोन वर्ष तर परळी औष्णिक विद्युत केंद्र येथे गेली बारा वर्ष उत्कृष्ट अशी कामगिरी बजावल्यामुळे परळी औष्णिक विद्युत केंद्रचे मुख्य अभियंता  मोहन आव्हाड, उपमुख्य अभियंता एच. कें. अवचार, उपमुख्य अभियंता शाम राठोड, अधीक्षक अभियंता  दिनकर इंगळे, कल्याण अधिकारी  डी.जी.वंजारी यांनी पुढील जबाबदारीसाठी पारस येथील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. सोबतच सुरक्षितता व अग्निशमन विभागाचे  एस बी उदार-उप कार्यकारी अभियंता, एम एम पाटील-सहाय्यक अग्नीशमन अधिकारी, सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कर्मचारी कंत्राटी कामगार यांनी पुढील जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार